जय जय महाराष्ट्र माझा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज गुरुवार, मे १, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक ११ , शके १९४७
सूर्योदय : ०६:१० सूर्यास्त : १९:०१
चंद्रोदय : ०९:०८ चंद्रास्त : २३:१०
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : वैशाख
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : चतुर्थी – ११:२३ पर्यंत
नक्षत्र : मृगशीर्ष – १४:२१ पर्यंत
योग : अतिगण्ड – ०८:३४ पर्यंत
क्षय योग : सुकर्मा – ०५:३९, मे ०२ पर्यंत
करण : विष्टि – ११:२३ पर्यंत
द्वितीय करण : बव – २२:१३ पर्यंत
सूर्य राशि : मेष
चंद्र राशि : मिथुन
राहुकाल : १४:१२ ते १५:४८
गुलिक काल : ०९:२३ ते १०:५९
यमगण्ड : ०६:१० ते ०७:४७
अभिजित मुहूर्त : १२:१० ते १३:०१
दुर्मुहूर्त : १०:२७ ते ११:१९
दुर्मुहूर्त : १५:३५ ते १६:२७
अमृत काल : ०६:१६ ते ०७:४४
अमृत काल : ०३:३६, मे ०२ ते ०५:०७, मे ०२
वर्ज्य : २२:१८ ते २३:४९

आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो.

१८९० मध्ये जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला.

आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे.

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा …
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

१९६०: मुंबईसह मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य आणि गुजरात या स्वतंत्र राज्यांचा निर्माण झाला.

स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी कार्यकर्ते, लेखक, वक्ते आणि विचारवंत- नानासाहेब ( नारायण गणेश ) गोरे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड तालुक्यामधील हिंदळे गावचे . शिक्षणासाठी पुण्यात येऊन बी.ए. एल्एल्.बी. झाले.

पर्वती मंदिर अस्पृश्यतानिवारण सत्याग्रहापासून त्यांनी सार्वजनिक कार्यात भाग घ्यावयास सुरुवात केली. १९३० मध्ये महाराष्ट्र यूथ लीगचे ते चिटणीस झाले. १९३६– ३९ मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ते सदस्य होते. काँग्रेस समाजवादी पक्षाच्या संस्थापकांपैकी नानासाहेब हे एक होत. १९४८–५३ मध्ये समाजवादी पक्षाचे ते सहचिटणीस होते. पुढे १९५७–६२ मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे प्रजासमाजवादी पक्षाचे ते खासदार होते. ह्याच काळात ह्या पक्षाचे ते सरचिटणीसही होते. १९६४ मध्ये ह्याच पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९६७-६८ मध्ये ते पुणे महापालिकेचे महापौर होते. १९७० पासून ते राज्यसभेचे सदस्य होते.

भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय भाग घेऊन नानासाहेबांनी अनेकवार तुरुंगवास भोगला. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर पोर्तुगीज सत्तेपासून गोवा मुक्त करण्यासाठी १९५५ मध्ये झालेल्या गोवा विमोचन सत्याग्रहाचा त्यांनी प्रारंभ केला. त्याबद्दल त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती परंतु १९५७ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली.

नानासाहेबांनी बरेच लेखनही केले आहे. समाजवादाचा ओनामा (१९३५) हे त्यांचे पहिले पुस्तक. जुन्या हैदराबाद संस्थानातील गुलबर्गा तुरुंगात शिक्षा भोगत असताना फेब्रुवारी ते डिसेंबर १९४२ पर्यंत त्यांनी लिहिलेली दैनंदिनी कारागृहाच्या भिंती ह्या नावाने १९४५ मध्ये प्रसिद्ध झाली. तुरुंगातील भेदक अनुभवांचे प्रत्ययकारी चित्रण तीत आढळते. डाली (१९५६) हा त्यांचा ललितनिबंधसंग्रह. शंख आणि शिंपले (१९५७) मध्ये त्यांच्या आठवणी आहेत. सीतेचे पोहे (१९५३) आणि गुलबशी (१९६२) मध्ये त्यांच्या कथा संगृहीत केलेल्या आहेत. आव्हान आणि आवाहन (१९६३), ऐरणीवरील प्रश्न (१९६५) ह्या पुस्तकांत त्यांचे वैचारिक लेख अंतर्भूत आहेत. कालिदासाच्या मेघदूताचा त्यांनी समछंद अनुवाद केला आहे.

त्यांनी केलेल्या अन्य अनुवादांपैकी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आत्मचरित्राचा अनुवाद विशेष उल्लेखनीय आहे. बेडूकवाडी (१९५७) आणि चिमुताई घर बांधतात (१९७०) ही त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तके. त्यांनी लिहिलेल्या अन्य पुस्तकांत विश्वकुटुंबवाद (कम्यूनिझम) (१९४१) आणि अमेरिकन संघराज्याचा इतिहास (१९५८) ह्यांचा समावेश होता. मुरारीचे साळगांव (१९५४) हे त्यांनी प्रौढ साक्षरांसाठी लिहिलेले पुस्तक. जनवाणी, रचना, जनता ह्यांसारख्या नियतकालिकांचे त्यांनी संपादन केले. त्यांतून, तसेच अन्य इंग्रजी, मराठी आणि हिंदी नियतकालिकांतून त्यांनी लेखन केले आहे. उत्तम वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. रेखीव मांडणी, स्पष्ट विचार आणि अभ्यासपूर्ण विवेचन ही त्यांच्या वैचारिक लेखनाची आणि भाषणांची वैशिष्ट्ये. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

• १९९३: स्वातंत्र्यसैनिक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते ना. ग. गोरे यांचे निधन. (जन्म: १५ जून१९०७)

• डॉ. रामेश्वर शुक्ल उर्फ अंचल – एक आधुनिक हिंदी कवी, उपन्यासकार (कादंबरीकार), काहनीलेखक (कथाकार) व निबंधकार. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील किशनपूर (जि. फत्तेपूर) येथे झाला. त्यांचे शिक्षण लखनौ व नागपूर विद्यापीठांतून एम. ए. पर्यंत झाले. हिंदीतील ‘छायावादी’ (स्वच्छंदतावादी) काव्याचा बहर ओसरू लागण्याच्या सुमारास ‘अंचल’ यांनी काव्यरचनेस सुरूवात केली. छायावादाच्या प्रभावाखाली असलेली त्यांची सुरुवातीची कविता पुढे स्वतंत्र झाली आणि ते प्रेम आणि सौंदर्याचे पूजक बनले. नंतर मात्र मार्क्सवादी विचारांचा प्रभाव पडून मानवाचे कल्याण, सामाजिक विषमता, बंड क्रांती इ. त्याचे काव्यविषयक बनले. या दृष्टीने किरण वेला (१९४१) आणि करील (१९४२) हे त्यांचे काव्यसंग्रह उल्लेखनीय होत.

पुढे अरविंदबाबू घोष यांच्या आध्यात्मिक विचारांचा प्रभाव पडून ते तत्त्वचिंतनपर कविता लिहू लागले. त्यांच्या विचारांत आणि तदनुरोधाने काव्यात सतत परिवर्तन झालेले आढळते. मधूलिका (१९३८), अपराजिता (१९३९), लाल चूनर (१९४२), वर्षोंतक के बादल (१९५४) आणि विरामचिन्हे (१९५७) हे त्यांचे काव्यसंग्रह होत.
काव्याव्यतिरिक्त त्यांनी कहानी (तारे-१९३७ आणि ये वे बहुतेरे-१९४१) उपन्यास (चढती धूप-१९४५, नयी इमारत-१९४६,उल्का-१९४७ आणि मरुप्रदीप-१९५१), निबंध (समाज और साहित्य-१९४४ आणि रेखा लेखा-१९५७) समीक्षा (हिंदी साहित्येअनुशीलन—१९५२) इ. वाङ्मयप्रकारही हाताळले आहेत. तथापि ते कवी म्हणूनच विशेष प्रसिद्ध आहेत.

• १९१५: हिन्दी साहित्यिक डॉ. रामेश्वर शुक्ल उर्फ अंचल यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९९५)

  • घटना :
    १७०७: किंगडम ऑफ इंग्लंड व किंगडम ऑफ स्कॉटलंड मिळून किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन बनवण्यात आले.
    १७३९: चिमाजी अप्पाने पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या वसईवर निकराचा हल्ला केला. तीन महिन्याच्या युद्धानंतर वसई मराठ्यांच्या ताब्यात आली.
    १८४०: द पेनी ब्लॅक हे पहीले अधिकृत पोस्टेज स्टॅम्प युनायटेड किंगडममध्ये जारी केले गेले.
    १८४४: हाँगकाँग पोलिस फोर्स हे जगातील दुसरे आणि आशियातील पहिले आधुनिक पोलिस दल स्थापन झाले.
    १८८२: आर्य महिला समाजा ची पं. रमाबाई यांच्या पुढाकाराने पुणे येथे स्थापना झाली.
    १८८४: अमेरिकेत कामगारांना एका दिवसात ८ तास कामकाज असावे ह्या मागणीची घोषणा.
    १८९७: रामकृष्ण मिशन ची सुरूवात स्वामी विवेकानंद यांनी केली.
    १९२७: जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.
    १९३०: सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.
    १९४०: युद्ध सुरू असल्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या.
    १९६१: क्युबाचे पंतप्रधान फिदेल कॅस्ट्रो यांनी क्यूबा देश समाजवादी राष्ट्र घोषित करून निवडणुका रद्द केल्या.
    १९७८: जपान चे नामी उमुरा हे एकटे उत्तर ध्रुवावर पोहोचणारे पहिले मनुष्य आहेत.
    १९९८: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला.

• मृत्यू :

• १९५८: नाटककार गणेश शिवराम उर्फ नाना जोग यांचे नागपुर येथे निधन.
• १९७२: उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी, १९१५)

  • जन्म :
    १८६७ : कासीनाधुनी नागेश्वरराव , नागेश्वर राव पंतुलु या नावाने ओळखले जाते , (१ मे १८६७) हे भारतीय पत्रकार , राष्ट्रवादी , राजकारणी , व्यापारी आणि खड्डर चळवळीचे कट्टर समर्थक होते . [१] [२] त्यांनी मिठाच्या सत्याग्रहाद्वारे महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंग चळवळीसह भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात भाग घेतला . त्यांना आंध्र प्रदेशातील जनतेने देशबंधू (जनतेचा मित्र) ही पदवी बहाल केली होती . ते आंध्र आणि चेन्नईमधील काँग्रेसच्या क्रियाकलापांचे प्रमुख फायनान्सर होते आणि अमृतांजन पेटंटसाठी देखील ओळखले जाते . [३] त्यांना आंध्र महासभेने देसद्धारका (जनतेचे उत्थान करणारा) ही पदवी बहाल केली . [४] १९३५ मध्ये आंध्र विद्यापीठाने त्यांना कलापूर्णा ही मानद डॉक्टरेट ऑफ लिटरेचर देऊन सन्मानित केले. (मृत्यू: १ मे १८६७)
    १९१३: अभिनेता पद्मश्री बलराज साहनी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल , १९७३)
    १९१९: भारतीय भाषेतील प्रतिभासंपन्न पार्श्वगायक पद्मभूषण मन्ना डे यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर, २०१३)
    १९२२: स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि समाजवादी नेते मधु लिमये यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी, १९९५)
    १९३२: कर्नाटकचे १६ वे मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांचा जन्म.
    १९४३: नृत्यांगना पद्म विभूषण सोनल मानसिंह यांचा जन्म.
    १९४४: माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचा जन्म.
    १९७१: भारतीय अभिनेते आणि रेस कार ड्रायव्हर अजित कुमार यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »