महेश कारखाना सुरू होण्याआधीच मोठा धक्का!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

माजी आ. भीमराव धोंडे यांचा खुलासा; संशयितांची नावे समोर

आष्टी ; कडा येथील महेश सहकारी साखर कारखान्यातून कोट्यवधी रुपयांची महागडी मशिनरी चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच ही घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणातील संशयितांची नावे निष्पन्न झाल्याचे सांगितले असून, लवकरच पोलिसांत गुन्हे दाखल होणार असल्याचा गौप्यस्फोट केला. त्यांनी कारखाना पुन्हा सुरू करण्याची गरज अधोरेखित करत शेतकरी, वाहतूकदार आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, मशिनरी चोरीमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. चोरीमुळे कामाच्या गतीवर काहीसा परिणाम होण्याची शक्यता असली तरी नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे धोंडे यांनी स्पष्ट केले.

“कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरू होणारच,” असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »