मकाई कारखान्यावर बागल पॅनलचे वर्चस्व

सोलापूर : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीत लोकनेते दिगंबरराव बागल पॅनलने पुन्हा सत्ता मिळवत वर्चस्व कायम राखले आहे. विरोधी पॅनल मकाई परिवर्तन आघाडीला एकही जागा मिळवता आली नाही. बागल पॅनलचे यापूर्वी आठ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत.
करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी रविवारी पार पडली. सुरवातीपासूनच बागल गटाची आघाडी होती. पहिल्या फेरीपासून बागल गटाचे सर्व उमेदवार आघाडीवर होते. विरोधी झोळ यांच्या पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही.
या निकालानंतर बागल गटाच्या उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यासहित जल्लोष केला. मकाई कारखान्यावर स्थापनेपासून बागल गटाची सत्ता आहे. पण यंदाच्या निवडणुकीत कारखान्याचे विद्यमान चेअरमन दिग्विजय बागल, माजी आमदार शामल बागल वा रश्मी बागल यांच्यापैकी कोणीही निवडणूक रिंगणात नव्हते.
बागल पॅनलचे नऊ उमेदवार विजयी उमेदवार व मते
महिला राखीव गट : कोमल करगळ, मते ८२५१, अश्विनी झोळ (८२३२)
ऊस उत्पादक मांगी गट: दिनेश भांडवलकर (८२५६) अमोल यादव (८१६६),
ऊस उत्पादक भिलारवाडी गट : अजित झांजुर्णे (८२६७), रामचंद्र हाके (८१२९)
ऊस उत्पादक पारेवाडी गट: रेवननाथ निकत (८३९०), संतोष पाटील (८३८३),
उत्तम पांढरे (८०९४)
..
बिनविरोध विजयी उमेदवार-
ऊस उत्पादक चिकलठाण गट: सतीश नीळ, दिनकर सरडे
ऊस उत्पादक वांगी गट: सचिन पिसाळ व युवराज नाना रोकडे
संस्था प्रतिनिधी गट: नवनाथ बागल
अनुसूचित जाती गट: आशिष गायकवाड
अनुसूचित जमाती गट : बापू चोरमुले
इतर मागासवर्गीय गट : अनिल अनारसे