माळेगाव कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाचे राजीनामे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे व उपाध्यक्ष सागर जाधव यांनी बुधवारी अचानक राजीनामे दिले.

‘माळेगाव’चे नवीन कारभारी कोण, याबाबत उत्सुकता वाढली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा सभासदानी 8 रोजी माळेगाव येथे अडवून राजीनामे नामंजूर करण्याची विनंती केली.

अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी राजीनामा देण्यामागची भूमिका स्पष्ट करताना, वाढते वय आणि प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिले आहे. .

कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे हे विविध कालखंडात सुमारे १८ वर्षे चेअरमनपदी राहिले.
भावी अध्यक्ष पदासाठी प्रामुख्याने संचालक योगेश जगताप, नितीन सातव, मदनराव देवकाते, ॲड. केशवराव जगताप, सुरेश खलाटे, ज्येष्ठ संचालक तानाजी कोकरे इच्छुक आहेत. कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीत अजित पवार यांचा निर्णय अंतिम राहील.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »