तावरेंसह, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बळीराजा पॅनेलचा दारुण पराभव

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अजितदादांच्या श्री निळकंठेश्वर पॅनेलला बहुमत

Chandrakant Bhujbal, PRAB
Chandrakant Bhujbal, PRAB

चंद्रकांत भुजबळ

राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी निकाल स्पष्ट झाले असून या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अवघ्या १०२ मतांच्या गटातून म्हणजेच ब वर्ग संस्था मतदार संघ या गटातून झालेल्या १०१ मतांमध्ये ९१ मते प्राप्त केली तर १० मते विरोधात पडली.

या मतांसाठी दादांना खूप आटापिटा करावा, जिल्हा बँकेचे दार रात्री-अपरात्री सताड उघड ठेवावे लागल्याचा आरोप झाला, मात्र स्वतःच चेअरमन होणार असल्याचे जाहीर करुन माझं पॅनेल निवडून द्या, माळेगावला ५०० कोटी देतो असे आश्वासन मतदारांना दिल्याने मतदारांनी देखील दादांच्या श्री निळकंठेश्वर पॅनेलला मत देताना हात आखडला नाही आणि मग काय बहुमताने पॅनेलचा दणदणीत विजय मिळवला.

मात्र या निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बळीराजा पॅनेलचा दारुण पराभव केला. कारखान्याच्या निवडणुकीत बळी पडलेले उमेदवार व त्यांचे समर्थक मतदार हे आपल्या पॅनेलचे नाव बळीराजा का ठेवले ते आता ध्यानात येत आहे अशी खमंग चर्चा सुरु आहे. तर कारखान्याचे माजी अध्यक्ष, भाजपचे नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनेलला देखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रंजन तावरे यांचा देखील पराभव झाला आहे. 

अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ मधून रतनकुमार साहेबराव भोसले (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8670 मते प्राप्त करुन विजयी झाले असून प्रतिस्पर्धी उमेदवार बापूराव आप्पा गायकवाड (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 7183 यांचा 1487 मताने पराभव झालेला आहे.

या दोन्हीही उमेदवारांच्या स्पर्धेत बळीराजा पॅनलचा उमेदवाराला अत्यल्प मते मिळाली आहेत. इतर मागासवर्गीय प्रवर्ग या मतदारसंघ मधून नितीन वामनराव शेंडे (श्री निळकंठेश्वर पॅनल)  8494 मते  मते प्राप्त करुन विजयी झाले असून प्रतिस्पर्धी उमेदवार रामचंद्र कोंडीबा नाळे (सहकार बचाव पॅनल) 7341 यांचा 1153 मतानी पराभव झालेला आहे.

भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग या मतदारसंघ मधून विलास ऋषिकांत देवकाते(श्री निळकंठेश्वर पॅनल) विजयी झाले असून प्रतिस्पर्धी उमेदवार सूर्याजी तात्यासो देवकाते (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 2227 मतांनी पराभव झालेला आहे.

महिला राखीव मतदारसंघ या मतदारसंघ मधून संगीता बाळासाहेब कोकरे(श्री निळकंठेश्वर पॅनल) 8440 मते व ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले(श्री निळकंठेश्वर पॅनल) 7576  मते प्राप्त करुन दोन्हीही उमेदवार विजयी झाले असून प्रतिस्पर्धी उमेदवार राजश्री बापूराव कोकरे(सहकार बचाव शेतकरी पॅनल) 7485 यांचा अवघ्या 91 मतांनी पराभव झालेला आहे. 

माळेगाव गट क्रमांक एक सर्वसाधारण ऊस उत्पादक या मतदारसंघातून आनुक्रमे शिवराज जाधवराव (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8388 मते, बाळासाहेब तावरे (श्री निळकंठेश्वर पॅनल)7772 मते, राजेंद्र बुरुंगले ( श्री निळकंठेश्वर पॅनल) 7929 मतांनी तीनही उमेदवार विजयी झालेले आहेत. तर प्रतिस्पर्धी उमेदवार रंजनकुमार शंकरराव तावरे (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 7410 आणि संग्रामसिंह काटे (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 6731 तसेच रमेश गोफणे (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 6277 मते मिळवून या तिघांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 

(लेखक चंद्रकांत भुजबळ हे वरिष्ठ पत्रकार असून, नामवंत निवडणूक विश्लेषक आहेत. त्यांची निवडणुकीवर अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) या संस्थेचे ते संस्थापक आहेत.)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »