सदाशिवराव मंडलिक कारखान्याची निवडणूक बिनविरोध
कोल्हापूर : लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत १८ संचालकांची बिनविरोध निवड झाली.
एकूण २१ जागांसाठी शिल्लक राहिलेल्या ४७ उमेदवारांपैकी १९ जणांनी माघार घेतल्याने १८ जणांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. आता महिला गटातील 2 आणि इतर मागास वर्ग १ अशा तीन जागांकडे लक्ष आहेत. अर्ज माघारीची अंतिम तारीख १३ जून आहे.
बिनविरोध झालेल्या १८ जागांमध्ये विद्यमान ८ संचालकांना पुन्हा संधी मिळाली आहे. तर ९ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या संचालकामध्ये विद्यमान चेअरमन, खासदार संजय मंडलिक, संभाजी ढोले, तुकाराम ढोले, आनंदा फराकटे, कुष्णा शिंदे, सत्यजित पाटील, धनाजी बाचणकर, शिवाजीराव इंगळे, महेश घाटगे, कैलास जाधव, प्रकाश पाटील, मंगल तुकान, पुंडलिक पाटील, विश्वास कुराड, प्रदीप चव्हाण, विरेंद्र मंडलिक, चित्रगुप्त प्रभावळकर, विष्णू बुवा यांचा समावेश आहे.
या निवडणुकीत कृष्णा दत्तात्रय शिंदे गुरुजी (वय 91) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, स्वर्गीय माजी खासदार सदाशिव मंडलिक यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासून श्री शिंदे हे निष्ठावंत आहेत. त्यांनी आजवर कोणत्याही पदाची अपेक्षा गटाकडून केलेली नव्हती. मात्र खासदार संजय मंडलिक यांनी गुरुजी यांना साखर कारखान्याच्या निवडणुकीत बिनविरोध निवड करून निष्ठेचे मोल किती असते हे दाखवून दिले.