मंडलिक कारखान्यासाठी २५ जूनला मतदान

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : हमीदवाडा येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, 25 जूनला मतदान होणार आहे. 22 मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

दरम्यान, विद्यमान चेअरमन खा. संजय मंडलिक यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

२१ संचालकांच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. मुरगूड, बोरवडे, कागल, सांगाव व सेनापती कापशी या पाच गटांतून प्रत्येकी तीन संचालक असे 15 व संस्था गटातून एक, अनुसूचित जाती किंवा जमाती या गटातून एक, महिला दोन, इतर मागास प्रवर्गातून एक व भटक्या विमुक्त यामधून एक अशी एकूण 21 संचालक संख्या आहे.

दि. . 26 मे पर्यंत उमेदवारी अर्ज सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत दाखल करता येणार आहेत. 29 मे रोजी सकाळी 11 वाजता छाननी प्रक्रिया होईल. छाननीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी 30 मे रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध होईल.

उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत 30 मे ते 13 जून अशी आहे. उमेदवारांची अंतिम यादी 14 जून रोजी जाहीर होईल. रविवार, दि. 25 जून रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 दरम्यान मतदान होईल, तर मतमोजणी 27 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होईल. कागल-राधानगरीचे प्रांताधिकारी सुशांत बनसोडे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »