कृषी व साखर उद्योगाच्या भारतातील मातृसंस्था -NSI, ICAR
ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा काय आहे, या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था……. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी आणि साखर क्षेत्रावरील अनेक पुस्तकांचे लेखक श्री. मंगेश तिटकारे लिहिताहेत ‘शर्करायन’ या नव्या सदरातून….या लेखात त्यांनी साखर उद्योगाशी संबंधित दोन प्रमुख संस्थांबाबत लिहिले आहे…
- नॅशनल शुगर इन्स्टिट्युट (NSI), कल्याणपूर (कानपूर, उत्तरप्रदेश)
देशात ऊस, साखरेचा अभ्यास करण्यासाठी केंद्र शासनाने नॅशनल शुगर इन्स्टिट्युटची स्थापना 1957 साली केली. कानपूर, उत्तर प्रदेश स्थित असलेली देशातील ती महत्वाची साखर संशोधन संस्था आहे. डॉ. सौ. सीमा परोहा यांची एन.एस.आय. च्या गेल्या 88 वर्षाच्या इतिहासात पहिल्या महिला संचालक म्हणून नेमणूक झालेली आहे. त्या संस्थेमध्ये बायोकेमिस्ट्री हा विषय शिकवतात. संस्था केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालय, अन्नआणि सार्वजनीक वितरण विभागाच्या प्राथमिक नियंत्राणाखाली कार्यरत आहे. संस्थेचे बोधवाक्य “तमसो मा जोर्तिगमय” अर्थात अंधाराकडून प्रकाशाकडे हे आहे. संस्था 9001-2015 ISO सर्टिफाईड इन्स्टिट्यूट आहे.
• NSI चा उद्देश/कामकाज
साखर निर्माण शास्त्राच्या सर्व शाखातील संशोधनासाठी साखर रसायनशास्त्र, साखर तंत्रज्ञान, साखर अभियांत्रिकी व अनुषंगिक विषयाबाबत तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण पुरवणे.
ऊस व साखर निर्मितीशी संबंधीत अडचणींशी निगडीत साखर तंत्रज्ञान, ऊस व साखर रसायनशास्त्र, साखर अभियांत्रिकी, साखर कारखान्यांमध्ये वापरले जात असलेले तंत्रज्ञान, साखर उद्योगाशी संबंधीत उद्योगातून निर्माण होणारे उपपदार्थ निर्मिती तंत्रज्ञान याबाबत संशोधन करणे, तसे कार्यक्रम हाती घेणे.
साखर कारखान्यांना तंत्रिक सल्ला व सहायता पुरवणे. साखर कारखान्यांना रोजच्या व्यवहारात येणाऱ्या अडचणी सोडवणे व त्यांच्या साखर व उपपदार्थांच्या निर्मितीत सुधारणा करणे हा त्यामागचा मूळ उद्देश आहे.
केंद्र व राज्य सरकारांना ऊस व साखरेबाबत निर्णय घेताना येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन, सल्ला व सहायता पुरविणे.
• संस्थेत घेतले जाणारे अभ्यासक्रम
- साखर तंत्रज्ञानामधील (Sugar Technology) डिप्लोमा कोर्स ऑफ असोसिएटशिप ऑफ नॅशनल शुगर इन्स्टिट्युट
- साखर तंत्रज्ञानातील ANSI कोर्स घेणारे उमेदवार साखर कारखान्यांमध्ये केमिस्ट, प्रयोगशाळा प्रमुख, प्रमूख रसायनशास्त्रज्ञ, तंत्रज्ञ म्हणून नियूक्त होऊ शकतात.
- 2 ½ वर्ष कालावधी आहे (1 जुलै ते 31 मे असे अभ्यासक्रमाच्या वर्षाचा कालावधी)
- जागा – 69 व जास्तीत जास्त 35 वर्ष वय
- पात्रता – बी.एस्सी. (BSc) रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित विषय घेऊन किंवा केमिकल इंजिनिअरींगमधील पदवी 45% गुणासहित.
- साखर अभियांत्रिकीमधील डिप्लोमा कोर्स ऑफ असोसिएटशिप ऑफ नॅशनल शुगर इन्स्टिट्युट साखर अभियांत्रिकीमधील A.N.S.I. (शुगर इंजिनिअरींग) डिप्लोमा घेणारे उमेदवार साखर कारखान्यात सहाय्यक/शिफ्ट इंजिनियर, मुख्य इंजिनियर, उत्पादन इंजिनियर या पदावर नियुक्त होऊ शकतात.
- 1 ½ वर्ष कालावधी आहे, वय 28 वर्ष
- बी.एस्सी. (केमिस्ट)
- इंडस्ट्रियल फर्मेंटेशन अँड अल्कोहोल टेक्नालॉजीमधील पदव्युत्तर पदवी (DIFAT)
DIFAT पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उमेदवारास चिफ केमिस्ट, सुपरवायझरी केमिस्ट वर्क्स मॅनेजर, डिस्टीलरी मॅनेजर या पदावर आसवणी, ब्रुअरी येथे काम करण्याची संधी मिळू शकते. - शुगर इंजिनिअरींगमधील सर्टिफिकेट कोर्स (SECC)
साखर अभियांत्रिकीमधील विविध प्रक्रियांची, तंत्राची माहिती यामध्ये आहे. साखर कारखान्यात काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी हा उपयोगी कोर्स आहे. जुलै ते नोव्हेंबर अशा 2 ऑफ सिझनमध्ये हा कोर्स करता येऊ शकतो. त्यामुळे साखर कारखान्यात काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी इंजिनियर यांना याचा निश्चित उपयोग करुन घेता येऊ शकतो. 15 जागा, 35 वर्ष, अभियांत्रिकीमधील सर्व पदविकाधारक अर्हता आहे. - शुगर बॉयलिंगमधील सर्टिफिकेट कोर्स
पॅन बॉयलिंग व संबंधित कार्यपद्धती विषयक माहिती व तंत्रज्ञान याची ओळख यात होते. साखर तयार होण्याचे तंत्रज्ञान विवेचन होते. साखर कारखान्यातील पॅनमन, हेड पॅनमन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ इ. जागेवर काम मिळू शकते. ऑफ सिझन जुलै ते नोव्हेंबर अशी 5 महिने मुदत असून साखर कारखान्यात प्रात्यक्षिक प्रशिक्षणाची व्यवस्थाही यात आहे. 57 जागा प्रत्येक ऑफ सिझनला असून 90 दिवस साखर कारखान्यांत पॅन ऑपरेशचा अनुभव व्हॅक्युमपॅन साखर कारखान्यातील आवश्यक आहे. दहावी ही पात्रता या कोर्ससाठी आहे. 35 वर्ष कमाल वयोमर्यादा आहे. - शुगरकेन प्रॉडक्टीव्हीटी अँड मॅच्युरीटी मॅनेजमेंट (C.C.S.P.M.M.) मधील प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) कोर्स
ऊस शेतील अनुभव, केन सँम्पलिंग, टेस्टिंग, ऊसाच्या फिल्डवर्कबाबत मुलभूत ज्ञान या कोर्समध्ये मिळते. साखर कारखान्यांच्या शेती खात्यांमध्ये नोकरी मिळू शकते. दिड महिना कालावधी, 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर असतो. 18 जागा असून 12 वी विज्ञान/कृषी किंवा तत्सम समकक्ष पात्रता धारण करणारी व 1 वर्ष साखर कारखान्यांतील प्रयोगशाळेत किंवा फिल्डवर्कमधील अनुभव आवश्यक आहे. 35 वर्ष कमाल वयोमर्यादा आहे. - इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन प्रोसेस ॲटोमेशनमधील प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) कोर्स
साखर कारखान्यातील इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंट इंजिनिअरींगचे ज्ञान मिळते. जुलै ते नोव्हेंबर अशी 5 महिने ऑफ सिजनमध्ये हा कोर्स असून 15 जागा आहेत. मान्यताप्राप्त कॉलेज, संस्थेतील इलेक्ट्रॉनिक/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरींगमधील पदविका किंवा इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, ॲप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स अँउ इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकीमधील पदविका ही पूर्ण अट असून 35 वर्ष कमाल वयोमर्यादा आहे. - क्वालिटी कंट्रोलमधील सर्टिफिकेट कोर्स (CCQC)
प्रमाणपत्र धारकांना साखर कारखान्यांमधील प्रयोगशाळेत, केमिस्ट, क्वालिटी कंट्रोल केमिस्ट व लॅब इनचार्ज म्हणून नोकरी मिळू शकते. जुलै ते ऑक्टोबर अशा 4 महिन्यांचा ऑफसिजनमधील कोर्स आहे. 15 जागा आहेत. विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित हे विषय घेऊन 12 पास ही अर्हता आहे. 50% किमान गुण व कमाल वयोमर्यादा 35 वर्षे. - संशोधन/सहाय्यक ट्रेनिंगबाबत संशोधनपर निबंध तयार करण्यासाठी मदत.
• फेलोशिप डिप्लोमा ऑफ द इन्स्टिट्युट (F.N.S.I.)
कोर्सचे नांव | अर्हता |
F.N.S.I. इन शुगर टेक्नोलॉजी शुगर केमिस्ट्री | F.N.S.I. (शुगरटेक) |
F.N.S.I. इन शुगर इंजिनियरींग | F.N.S.I. (शुगर इंजिनियर) |
F.N.S.I. इन फर्मेंटेशन टेक्नोलॉजी | D.I.F.A.T. |
• Ph. D. डिग्री – अर्हता एम.एस्सी. रसायनशास्त्र/बायोकेमिस्ट्री/ॲग्रीकल्चर केमिस्ट्री/ ॲडव्हान्स रिसर्च करण्यासाठी केंद्र म्हणून मान्यता मिळालेल्या विद्यापिठातील पदवी अर्हता आहे. अधिक व सुयोग्य माहितीसाठी NSI चे वेबसाईटला nsi.gov.in भेट द्यावी.
केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या ॲडव्हायजरी बोर्डकडून संस्थेचे काम चालते. बोर्डाची रचना दि. 21.08.2021 च्या अधिसुचनेद्वारे स्थापित केली आहे. N.S.I. सल्लागार मंडळाची रचना खालील प्रमाणे आहे.
सहसचिव (शुगर व शुगर ॲडमिनिस्ट्रेशन), ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय, अन्न व सार्वजनिक वितरण विभाग. | अध्यक्ष |
संचालक, शुगर व व्हेजीटेबल, ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय, अन्न व सार्वजनिक वितरण विभाग. | पदसिध्द सदस्य |
संचालक, (शुगर ॲडमिनिस्ट्रेशन), ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय, अन्न व सार्वजनिक वितरण विभाग. | पदसिध्द सदस्य |
चिफ डायरेक्टर, डायरेक्टर ऑफ शुगर, ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय, अन्न व सार्वजनिक वितरण विभाग | पदसिध्द सदस्य |
अध्यक्ष, शुगर टेक्नॉलॉजीस्टस असोसिएशन ऑफ इंडीया, नवी दिल्ली | सदस्य कारखान्यांचे प्रतिनिधी |
डायरेक्टर, इंडियन शुगरकेन रिसर्च इन्स्टिट्युट, लखनौ, उत्तरप्रदेश | सायंटीफीक एक्सपर्ट |
संचालक, उ.प्र. कौंन्सील ऑफ शुगरकेन रिसर्च शहाजाननगर, उत्तर प्रदेश | सदस्य शासन / PSU |
तांत्रिक सल्लागार (शुगर), हरियाणा स्टेट फेडरेशन ऑफ शुगर मिल्स, | सदस्य शासन / PSU’s प्रतिनिधी |
प्रोफेसर व हेड ऑफ केमिकल इंजिनियरींग – I.I.T. कानपूर | सदस्य |
अध्यक्ष, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन(ISMA). | अपेक्स बॉडी प्रतिनिधी |
अध्यक्ष, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर मिल्स, दिल्ली. (NFCSM). | अपेक्स बॉडी प्रतिनिधी |
मॅनेजींग डायरेक्टर, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखना संघ लि., मुंबई | सदस्य शासन / PSU’s प्रतिनिधी |
अध्यक्ष, ऑल इंडिया डिस्टीलरीज असोसिएशन, मुंबई. | अपेक्स बॉडी अल्कोहोल उद्योग |
अध्यक्ष, शुगरकेन ब्रिडींग इन्सिटीट्युट, कोईमतुर, तामिळनाडू. | सदस्य |
डायरेक्टर, NSI | सदस्य सचिव |
संस्थेने दि. 29.05.2024 च्या प्रकटनाद्वारे एम. एस. सी. (रसायनशास्त्र) / एम. एस. सी. (ॲप्लाईड केमिस्ट्री) / एम. एस. सी. (इंडस्ट्रीयल केमिस्ट्री) / एम. एस. सी. (मायक्रोबायोलॉजी) / एम. एस. सी. (बायोटेक्नॉलॉजी) / एम. एस. सी. (बायोकेमिस्ट्री) / बी. टेक (बायोटेक्नॉलॉजी)/ बी. टेक (फुड टेक्नॉलॉजी) ही अर्हता असलेल्या विद्यार्थांकडून डेसर्टेशन/ पी. एच. डी./ प्रोजेक्ट कामासाठी जुलै 2004 शैक्षणीक वर्षासाठी अर्ज मागवले आहेत. त्याचा तपशिल N.S.I. च्या nsi.gov.in या वेबसाईटवर पहावा.
1 जूलै ते 31 मे हे संस्थेचे सर्व पदवी, पदवीका कोर्सेससाठीचे शैक्षणीक वर्ष असून दर वर्षी एप्रिल/मे महिन्यात प्रत्येक कोर्ससाठी असलेल्या जागा, आरक्षण यांची माहिती देवून अर्ज मागविले जातात. संस्थेच्या कोर्सेसचे सविस्तर प्रोस्पेक्ट्स nsi.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
2) भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली , (Indian Council of Agricultural Reaserch (ICAR), New Delhi :
शेतीविषयी संशोधन करणारी ही केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या आधिन कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाच्या अधिन काम करणारी स्वतंत्र संस्था आहे. भारतातील प्रमुख संस्था असून जगातील मोठ्या कृषी संशोधन संस्थांपैकी ती एक आहे.
ही संस्था ‘पुसा इन्स्टिट्यूट’ या नावाने किंवा आयएआरआय (I A R I) या आद्याक्षरांनी ओळखली जाते. संस्थेचे जुने नाव Impirical Council of Agricultural Research होते. हेन्री फिल्स या अमेरिकन गृहस्थांनी दिलेल्या देणगीतून ही संस्था प्रथम बिहारमधील पुसा येथे १९०५ मध्ये सुरू झाली. देशातील शेतीबाबत रॉयल कमिशनने लिहीलेल्या अहवालातील शिफारशीनुसार 16 जुलै 1989 रोजी सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 खाली संस्था विधीवत स्थापन झाली. त्यानंतर १९३४ मध्ये भूकंपामुळे संस्थेच्या इमारतीचे फार नुकसान झाल्याने ही संस्था १९३६ साली नवी दिल्ली येथे हलविण्यात आली.
सैद्धांतिक व अनुप्रयुक्त कृषी संशोधनासाठी विविध अत्याधुनिक उपकरणांनी व साधनांनी सुसज्ज प्रयोगशाळा, शेतावर प्रयोग करण्यासाठी २९६ हेक्टरचे विस्तृत क्षेत्र व उत्तम प्रशिक्षण घेतलेले शास्त्रज्ञ ही या संस्थेची वैशिष्ठे आहेत. १९५८ साली ह्या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा मिळाला. या संस्थेची देशात १४ प्रादेशिक संशोधन केंद्रे असून १९८१ साली संस्थेतील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ५,००० होती आणि त्यात एम्. एस्सी. व पीएच्. डी. या पदव्या घेतलेल्या १,५०० व्यावसायिक शास्त्रज्ञांचा अंतर्भाव होता.
संस्थेचे महासंचालक (ICAR) डॉ. ए.के.सिंग, मत्स्योत्पादन आहेत. परिषद संपुर्ण देशात फलात्पादन, मत्सोत्पादन आणि प्राणी विज्ञान यासह कृषी क्षेत्रातील संशाधन आणि शिक्षणाचे समन्वय, मार्गदर्शन आणि व्यवस्थापन करणारी सर्वोच्च संस्था आहे. देशभरात पसरलेल्या 111 ICAR संस्था व 71 कृषी विद्यापीठांना मार्गदर्शन करणारी ही जगातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय कृषी प्रणालीपैकी एक आहे.
सध्या संस्थेत 21 विभाग आहेत :
कृषिविद्या, कृषी विस्तार, कृषी अर्थशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, आनुवंशिकी (जैव आनुवंशिक लक्षणांचा अभ्यास करणारे शास्त्र), उद्यानविद्या, भाजीपाल्याची पिके व पुष्पसंवर्धन, वनस्पतिप्रवेशन (वनस्पतीच्या नवीन जाती प्रचारात आणणे), बीज तंत्रविद्या, सूक्ष्मजीवविज्ञान, मृदाविज्ञान व कृषी रसायनशास्त्र, मृदा व भूमी उपयोगिता सर्वेक्षण, कृषी भौतिकी, कीटकविज्ञान, सूक्ष्मकृमिविज्ञान, कवकविज्ञान व वनस्पतिरोगविज्ञान, कृषी रसायने, वनस्पती जीवरसायनशास्त्र, अणुकेंद्रीय संशोधन प्रयोगशाळा व जल तंत्रविद्या केंद्र.
यांतील शेवटच्या दोन विभागांत बहुविध विद्याशाखांतर्गत संशोधनासाठी अत्याधुनिक सुविकसित उपकरणांनी व साधनांनी सुसज्ज अशा प्रयोगशाळा आहेत.
कृषिक्षेत्रीय क्रिया व व्यवस्थापन विभागातर्फे प्रयोगासाठी राखून ठेवलेल्या २९६ हेक्टर शेताची व शेतीसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीची देखभाल केली जाते. नवी दिल्ली येथे होणाऱ्या संशोधनाबरोबरच ही संस्था गहू, मका, कापूस, ज्वारी, तृणधान्ये, गळिताची पिके (तेलबिया), कडधान्ये, सातू (बार्ली), भाजीपाल्याची पिके, सुगंधी व औषधी वनस्पतींची पिके, पुष्पसंवर्धन, मृदेची भौतिकी संरचना, शैवाळे, सूक्ष्मकृमी इ. विषयींच्या अखिल भारतीय समन्वय संशोधन प्रकल्पांचे मुख्यालय म्हणून काम पाहते. तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील समन्वय कृषिविद्या प्रयोग, मृदापरीक्षण व पीक प्रतिसाद यांतील सहसंबंध आणि इतर कित्येक कृषी संशोधन कार्यक्रमांचे संयोजन या संस्थेतूनच करण्यात येते.
वरील 21 विभागांशिवाय गहू, कापूस, कडधान्ये, गळिताची पिके व समशीतोष्ण कटिबंधीय भाजीपाल्याची पिके, बीजोत्पादन, वनस्पतीप्रवेशन आणि विषाणू यांवर संशोधन करणारी केंद्रे पुढील ठिकाणी आहेत.
पुसा (बिहार), सिमला व काट्रेन (हिमाचल प्रदेश), सिर्सा व कर्णाल (हरियाणा), भोवाली व कानपूर (उत्तर प्रदेश), इंदूर (मध्य प्रदेश), वेलिंग्टन व कोईमतूर (तमिळनाडू), कालींपाँग (प. बंगाल), पोर्ट ब्लेअर (अंदमान), पुणे व अमरावती (महाराष्ट्र) याशिवाय नागपूर, बँगलोर व कलकत्ता येथे प्रत्येकी एक मृदा सहसंबंध केंद्र आहे.
भारतातील इतर कृषी संघटना व संस्था, तसेच रॉकफेलर फाउंडेशन, फोर्ड फाउंडेशन, अमेरिकेचे शेती खाते, संयुक्त राष्ट्रांची अन्न व शेती संघटना, इंटरनॅशनल अटॉमिक एनर्जी एजन्सी इ. आंतरराष्ट्रीय संस्थांच्या व संघटनांच्या सहकार्याने ही संस्था संशोधन व प्रशिक्षणाचे प्रकल्प हाती घेते.
या संस्थेत संशोधन व प्रशिक्षणाची उत्तम सोय असून येथे भारतातील विद्यार्थ्यांशिवाय आशिया, आफ्रिका, यूरोप व अमेरिका या विविध प्रदेशांतील विद्यार्थी येतात. एकाच वेळी ४५० ते ५०० विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेतात आणि दर वर्षी ९५ ते ११० नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. या संस्थेतील शिक्षण पद्धती अमेरिकन विद्यापीठात अनुसरलेल्या क्रेडिट कोर्स पद्धतीसारखी आहे.
संस्थेच्या ग्रंथालयात १९८१ साली २,७५,००० ग्रंथ होते व दरवर्षी या ग्रंथालयात १,५०० नियकालिके येतात. भारतातील कृषिविषयक सर्वांत मोठे ग्रंथालय म्हणून या ग्रंथालयाची ख्याती असून संस्थेतील शिक्षक व विद्यार्थी यांच्या खेरीज भारतातील इतर शास्त्रज्ञही या ग्रंथालयाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात.
किटक, कवके, व्हायरस, सूक्ष्मकृमी, पिकांच्या प्रकारांची व जातींची आनुवंशिकीय सामग्री यांचा गेली ६० – ७० वर्षे संस्थेने जमविलेला संग्रह अद्वितीय आहे. येथील कीटकसंग्रहाची कीटकांच्या वर्गीकरणविषयक संशोधनात फारच मदत होते. पौर्वात्य देशांतील कवकांचा अनन्यसाधारण संग्रह संस्थेने जमविला असून त्यात ५,००० जातींच्या कवकांचे २७,००० नमुने आहेत.
येथील सूक्ष्मजीव संग्रहात सूक्ष्मजीवांचे १,२०० नमूने आहेत व तो भारतातील अशा प्रकारचा सर्वांत मोठा संग्रह आहे. यात सूत्रकृमी, रायझोबियम वंशातील सूक्ष्मजंतू, नीलहरित शैवाळे यांचेही नमूने आहेत. या दोन्ही संग्रहांमूळे वनस्पतींच्या रोगाचे अध्ययन व त्यांचे नियंत्रण करण्याच्या तंत्रात सुधारणा करण्याच्या कामी फारच मदत होते. वनस्पती – प्रजननाच्या मार्गाने जास्त उत्पन्न देणारे प्रकार निर्माण करण्यासाठी वनस्पतींच्या देशी व विदेशी प्रकारांचा विस्तृत संग्रह करण्यात आला आहे. गहू, मका, ज्वारी, बाजरी व इतर तृणधान्यांच्या जननद्रव्याची पेढी संस्थेने उभारली असून तिचा उपयोग अन्य पुष्कळ देशांनाही होतो.
कृषि विज्ञानात अणुऊर्जेचा वापर करण्याच्या दृष्टीने विविध प्रकारच्या किरणोत्सर्गी (अतिशय भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) समस्थानिकांचा (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांचा) तसेय अणुऊर्जेचा शांततामय उपयोग करण्यासाठी संशोधन करणारी एक प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे.
त्याच बरोबर २०० क्यूरी कार्यप्रवणतेच्या किरणोत्सर्गी उद्गम असलेले ‘गॅमा उद्यान’ व २,००० क्यूरी कार्यप्रवणतेच्या किरणोत्सर्गी कोबाल्ट (६०) उद्गमाचा उपयोग करणारी कोठी यांचीही उभारणी करण्यात आलेली आहे. वनस्पतीवर गॅमा किरणांचा मारा करून (गॅमा किरण टाकून) उत्परिवर्तन प्रजनन (ज्यात आनुवंशिक लक्षणांत आकस्मिक बदल होतो असे प्रजनन) करण्याकरिता व इतर संशोधन करण्यासाठी या अत्याधुनिक उपकरणे आणि साधने यांनी युक्त असलेल्या सुविधांचा देशातील अनेक संशोधक शास्त्रज्ञ उपयोग करीत आहेत. ही अणुकेंद्रीय संशोधन प्रयोगशाळा संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाच्या आर्थिक मदतीने उभारण्यात आली आहे.
या संस्थेच्या कोईमतूर येथील पूर्वीच्या उपकेंद्राने (सध्याच्या ऊस पैदास व संशोधन केंद्राने) कोईमतूर येथे ऊसाच्या नवनवीन जाती प्रचारात आणण्यासाठी केलेले संशोधन भारतातील उत्क्रांतीस फारच महत्वाचे ठरले. कोईमतूर (co) या नावाने या केंद्राने या जाती वेळोवेळी प्रसारात आणल्या. हे उल्लेखनीय कार्य आहे. त्यामुळे साखर उद्योगात क्रांती झाली आहे. याशिवाय अन्नधान्य, चारा, भाजीपाला, फळे व उद्योगधंद्यांत कच्चा माल म्हणून उपयोगी पडणारी पिके यांचे सुधारित प्रकार संस्थेने शोधून काढले आहेत. या प्रकारांमध्ये जास्त उत्पादन देणे, अवर्षणाचा ताण सहन करणे आणि रोग व किडींचा प्रतिकार करणे यांपैकी एक किंवा अधिक गुण आहेत.
संस्थेतील सूक्ष्मजीवविज्ञान विभागाने कडधान्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी रायझोबियम वंशातील जास्त कार्यक्षम सूक्ष्मजंतूंचा शोध लावला आहे. या सूक्ष्म जंतूंचे मोठ्या प्रमाणावर संवर्धन करुन त्याचा वापर भाताचे उत्पन्न वाढविण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या नीलहरित शेवाळाच्या जास्त कार्यक्षम वाणांचा शोध लावण्यात आला आहे. त्याचा वापर कंपोस्ट खत निर्मितीमध्ये वनस्पतींच्या अवशेषांतील तुलीर (सेल्युलोज) व काष्ठीर ही ऊतके (पेशीसमूह) जलद रीतीने कुजण्यास साहाय्य करणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या जास्त कार्यक्षम वाणांचा शोधही लावला आहे.
संस्थेने दिल्लीच्या जवळपासच्या भागात १९४९ पासून सधन शेती योजनेखाली शेतकऱ्यांच्या शेतात प्रात्यक्षिके व नवे प्रयोग केले आहेत. १९६५ पासून संस्थेने सुरू केलेल्या राष्ट्रीय प्रात्यक्षिक कार्यक्रमामुळे शेतीचे शास्त्रीय व तांत्रिक ज्ञान खेडोपाडी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जात आहे. संस्थेतील संशोधनातून उपलब्ध होणाऱ्या उपयुक्त माहितीचा प्रसार विविध शास्त्रीय नियतकालिकांतून तसेच इंग्रजी, हिंदी व इतर प्रादेशिक भाषांतून लोकप्रिय स्वरूपाच्या लेखांद्वारे, आकाशवाणी व दूरदर्शनवरील कार्यक्रमांद्वारे करण्यात येतो.
• ICAR मध्ये Assistants at ICAR Havs level 7- Rs. 44900-142400 Prerevised PB-2 GP 4600 या श्रेणीत 70 जागा भरावयाच्या आहेत. तसेच Assistants at ICAR & KVKS level 6- Rs.44900-142400 Prerevised PB-2 GP 4200 या श्रेणीत 736 जागा देशभरातील 103 संस्थांमध्ये भरण्यासाठी दि. 10.06.2024 चे नोटीफिकेशनने अर्ज मागविले आहेत. यात महाराष्ट्रामध्ये CIRCOT, मुंबई, CIFE मुंबई, DFR पुणे, DOGR पुणे, NRC Gropes पुणे, NRC प्रोमोग्रेनेड, सोलापूर, NBSS & LUP नागपूर, NIASM बारामती या संस्थेत रिक्त जागांचाही समावेश आहे. तसेच Assistants at KVK’S व ICAR Pay level 6- Rs. 35400-112400 Prerevised PB-+ GP 4200 या श्रेणीत 56 जागा देशभरातील 30 संस्थांमध्ये भरावयाच्या आहेत.
• ऊस पिक, त्याची वाढ, नवीन जाती, खते, किटाणू, किड संरक्षण, टिश्युकल्चर, संशोधन व विकास करण्यासाठी देशभर प्रत्येक राज्यात साखर संशोधन संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत त्यांचा तपशिल खालीलप्रमाणे.
साखर संशोधन संस्था (शुगरकेन रिसर्च इन्स्टिट्युट)
आंध्रप्रदेश | 1 | रिजनल ॲग्रीकल्चर रिसर्च स्टेशन, विशाखापट्टणम्. |
2 | ॲग्रीकल्चर रिसर्च स्टेशन, चिन्नोर. | |
3 | शुगरकेन रिसर्च स्टेशन, जि.कृष्णा | |
आसाम | 4 | शुगरकेन रिसर्च स्टेशन, आसाम कृषी विद्यापीठ, जि.गोलघाट. |
बिहार | 5 | शुगरकेन रिसर्च स्टेशन, RAU, पुमा, जि.समस्तीपूर. |
6 | शुगरकेन रिसर्च स्टेशन, मिलापूर फार्म, पटणा. | |
7 | इंडियन इन्स्टिट्युट ऑफ शुगरकेन रिसर्च रिजनल सेंटर, मोतीपूर, मुझफ्फरनगर. | |
8 | डिस्ट्रिक्ट ॲग्रीकल्चरल फार्म, सेपाया, गोपाळगंज | |
गुजरात | 9 | मेन शुगरकेन रिसर्च स्टेशन, जुनागढ ॲग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी, कोडीनार, जि.गिर सोमनाथ. |
10 | ॲग्रीक्लचरल रिसर्च स्टेशन (इरिगेटेड) आनंद, ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी, थासुउ, जि.खेडा. | |
11 | मेन शुगरकेन रिसर्च स्टेशन, नवसारी कृषी विद्यापीठ, जि.नवसारी. | |
हरियाणा | 12 | CCS हरियाणा ॲग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी, रिजनल रिसर्च स्टेशन, जि.कर्नाल. |
13 | शुगरकेन रिसर्च सबस्टेशन, बुरीया (जगधरी), जि.अंबाला. | |
14 | डिपार्टमेंट ऑफ प्लांट पॅथॉलॉजी, कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, CCS हरियाणा ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी, जि.हिसार. | |
15 | शुगरकेन ब्रिडींग इन्स्टिट्युट, रिजन सेंटर (ICAP) जि.कर्नाल. | |
केरळ | 16 | ॲग्रीकल्चर रिसर्च स्टेशन (KAU), कलुंकल पठाणामथिट्टा |
17 | शुगरकेन ब्रिडींउ इन्स्टिट्युट अँड रिसर्च स्टेशन, कन्नुर. | |
कर्नाटक | 18 | झोनल ॲग्रीकल्चर रिसर्च स्टेशन, V.C. फार्म मंड्या युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रीकल्चर,सायन्सेस, बेंगलुरु. |
19 | ॲग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्युट (U.A.S.धारवाड) संकेश्वर, जि.बैगालुरा. | |
20 | ॲग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्युट, गंगावरी, जि.कोप्पाल. | |
मध्यप्रदेश | 21 | मेन शुगरकेन रिसर्च स्टेशन, झोनल ॲग्रीकल्चरल रिसर्च स्टेशन, पोवरखेडा, जि.होशंगाबाद. |
22 | शुगरकेन रिसर्च स्टेशन, (जवाहरलाल नेहरु कृषी विश्व विद्यालय) जामोर, जिा.रतलाम. | |
23 | रिजनल ॲग्रीकल्चर रिसर्च स्टेशन (राजमाता विजयराजे शिंदे कृषी विश्व विद्यापीठ, जि.ग्वाल्हेर. | |
महाराष्ट्र | 24 | सेंट्रल शुगरकेन रिसर्च इन्स्टिट्युट, पाडेगाव, ता.फलटण, जि.सातारा. |
25 | रिजनल शुगरकेन अँड जॅगरी रिसर्च स्टेशन, मार्केटयार्ड, जि.कोल्हापूर. | |
26 | शुगरकेन रिसर्च सेंटर डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ, जि.अकोला. | |
27 | रिजनल शुगरकेन रिसर्च स्टेशन, बसमतनगर, जि.हिंगोली. | |
28 | शुगरकेन रिसर्च स्टेशन, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, जि.रत्नागिरी. | |
ओरिसा | 29 | रिजनल रिसर्च अँड टेक्नोलॉजी ट्रान्स्फर स्टेशन (U.U.A.T.), चिपलीमा, जि.संबलपूर. |
30 | डिस्ट्रिक्ट ॲग्रीकल्चर ऑफिस, रायगाडा, जि.रायगाडा. | |
पंजाब | 31 | पंजाब ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी, रिजनल रिसर्च स्टेशन, कपुरथाळा. |
32 | पंजाब ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी, रिजनल रिसर्च स्टेशन, गुरुदासपूर. | |
राजस्थान | 33 | ॲग्रीकल्चरल रिसर्च स्टेशन (ॲग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी कोटा), उमेदगंज फार्म, कोटा. |
34 | ॲग्रीकल्चरल रिसर्च स्टेशन (स्वामी केशवानंद राजस्थान, ॲग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी, कर्नी, श्रीगंगानगर. | |
35 | डायरेक्टर ऑफ रिसर्च, महाराणा प्रताप युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रीकल्चर अँड टेक्नॉलॉजी, RCA कॅम्पस, उदयपूर. | |
तेलंगाणा | 36 | रिजनल शुगरकेन अँड रिसर्च स्टेशन, रुद्रुर, जि.निझामाबाद. |
तामिळनाडू | 37 | शुगरकेन ब्रिडींग इन्स्टिट्युट (I.C.A.R.), कोइमतूर. |
38 | शुगरकेन रिसर्च स्टेशन, तामिळनाडू ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी सेमांडलम, कुडल्लुर. | |
39 | शुगरकेन रिसर्च स्टेशन, (तामिळनाडू ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी) मेलालाथुर, जि.वेल्लोर. | |
40 | शुगरकेन रिसर्च स्टेशन, (तामिळनाडू ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी) सिरुगामनी, जि.त्रिची. | |
41 | ॲग्रीकल्चर कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्युट, डिपार्टमेंट ऑफ ॲग्रोनॉमी, जि.मदुराई. | |
42 | शुगर रिसर्च स्टेशन (युनिट ऑफ साउथ इंडिया शुगर रिसर्च फाऊंडेशन) असुंडी, जि.वेल्लोर. | |
उत्तरप्रदेश | 43 | यु.पी.कौन्सिल ऑफ शुगरकेन रिसर्च, जि.शहाजहानपूर. |
44 | शुगरकेन रिसर्च इन्स्टिट्युट (यु.पी.कौन्सिल ऑफ शुगरकेन रिसर्च) मुझफ्फरनगर, जि.शहाजहानपूर. | |
45 | शुगरकेन रिसर्च इन्स्टिट्युट (यु.पी. कौन्सिल ऑफ शुगरकेन रिसर्च) कुनराघाट, जि.गोरखपूर. | |
46 | शुगरकेन रिसर्च अँड सीड मल्टीप्लीकेशन (यु.पी. कौन्सिल ऑफ शुगरकेन रिसर्च) गोलगोरखनाथ, जि.लखीमपूर. | |
47 | शुगरकेन रिसर्च अँड सीड मल्टीप्लीकेशन (यु.पी. कौन्सिल ऑफ शुगरकेन रिसर्च) लक्ष्मीपूर, जि.लखीमपूर. | |
48 | इंडिययन इन्स्टिट्युट ऑफ शुगरकेन रिसर्च, रायबरेली रोड, लखनऊ. | |
49 | गेंडासिंह शुगरकेन ब्रिडींग अँड रिसर्च इन्स्टिट्युट, (यु.पी. कौन्सिल ऑफ शुगरकेन रिसर्च) सेवराही, जि.कुशीनगर. | |
50 | शुगरकेन रिसर्च अँड सीड मल्टीप्लीकेशन स्टेशन (यु.पी. कौन्सिल ऑफ शुगरकेन रिसर्च), घुघुलपूर, जि.बलरामपूर. | |
51 | शुगरकेन रिसर्च अँड सीड मल्टीप्लीकेशन स्टेशन (यु.पी. कौन्सिल ऑफ शुगरकेन रिसर्च) अमहट, जि.सुलतानपूर. | |
52 | शुगरकेन रिसर्च अँड सीड मल्टीप्लीकेशन स्टेशन (यु.पी. कौन्सिल ऑफ शुगरकेन रिसर्च), कआया सदात. जि.गाझियापूर. | |
उत्तराखंड | 53 | शुगरकेन रिसर्च सेंटर, वाझपूर रोड, काशिपूर, जि.उधमसिहंनगर. |
54 | डिपार्टमेंट ऑफ जेनेटिक्स ॲन्ड प्लांट ब्रिडींग, जी.बी.पंत युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रीकल्चर ॲन्ड टेक्नॉलॉजी, जि.उधमसिंहनगर. | |
पश्चिम बंगाल | 55 | शुगरकेन रिसर्च स्टेशन, जि.नाडिया. |