‘महा-सहकार’ त्रैमासिकाचे प्रकाशन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मुंबई : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘महा-सहकार’ या त्रैमासिकाचे प्रकाशन  महामंडळाचे अध्यक्ष, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते मुंबईत झाले. त्रैमासिकाचा हा पहिलाच अंक असून, तो आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाला समर्पित आहे.

या निमित्ताने सहकार चळवळीच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. मंत्रालयात मंगळवारी (दि. ४)  पार पडलेल्या या छोटेखानी प्रकाशन समारंभावेळी साखर आयुक्त आणि महामंडळाचे सदस्य डॉ. संजय कोलते, महामंडळाचे एमडी आणि संपादक मंगेश तिटकारे, साखर संचालक यशवंत गिरी, तसेच अधिकारी वर्ग उपस्थित होता.

ही फक्त एका त्रैमासिकाची सुरुवात नसून, सहकाराच्या विचारांची, मूल्यांची आणि निष्ठेची नव्या उर्जेने सुरू प्रेरणादायी वाटचाल सुरू झाली आहे. “महा-सहकार” हे त्रैमासिक निश्चितच सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारे ठरावे, अशी अपेक्षा याप्रसंगी सहकारमंत्र्यांनी व्यक्त केली आणि या अंकाच्या उज्ज्वल प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या..

MCDC Tri Monthly Magazine Pune
आवडल्यास ही बातमी शेअर करा

2 Comments

Leave a Reply to dilip p.Cancel reply

Select Language »