शेतकुंपणाकरिता स्वतंत्र योजना तयार करा – सहकारमंत्री पाटील

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे – वन्यप्राण्यापासून शेतकऱ्यांची पिके आणि फळबागांचे संरक्षण होण्यासाठी शेतकुंपण करण्याकरीता स्वतंत्र योजना तयार करुन शासनास सादर करावी, अशी सूचना राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गुरुवारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळास केली.
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या साखर संकुल येथे झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये श्री. पाटील बोलत होते.

केंद्र शासनाच्या प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी “सहकार से समृध्दी” या अभियानाअंतर्गत विविध व्यवसाय सुचविण्यात आले आहेत. त्यातील “जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना” प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्थांकरीता प्राधान्याने राबविण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाने प्रयत्न करावेत. या योजनेमध्ये केंद्र शासनामार्फत देण्यात येत असलेल्या अर्थसहाय्य व्यतिरिक्त राज्य शासनातर्फे प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्थांना जादाचे अर्थसहाय्य देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा. या योजनेतून निर्माण होणाऱ्या गोदामांचा वापर धान्य साठवूणक, शेतमाल तारण योजना तसेच निविष्ठा विक्री व्यवसायासाठी प्राधान्याने होईल याबाबीकडे लक्ष दयावे अशा सूचना श्री. पाटील यांनी यावेळी केल्या.

  महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सहकार विकास महामंडळास नॅशनल कोऑपरेटीव ऑर्ग्रनिक लिमीटेड, (NCOL) आणि नॅशनल कोऑपरेटीव एक्सपोर्ट लिमीटेड (NCEL) या केंद्र शासनाच्या कंपन्यांच्या राज्यातील कामकाजासाठी नोडल एजन्सी नियुक्त केले असून या केंद्र शासनाच्या कंपन्यांमार्फत जास्तीतजास्त व्यवसाय राज्यातून होईल यासाठी महामंडळाने वरील कंपन्यासोबत आवश्यक सांमजस्य करार आणि ॲग्रीमेंट करावे अशी सूचना यावेळी मा.श्री. बाबासाहेब पाटील यांनी केली.   

 पाटील यांनी सहकार मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर सहकार खात्याअंतर्गत सहकार आयुक्त, साखर आयुक्त, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्या कामकाजाचा विस्तृत आढावा यावेळी घेतला.      

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »