पी. जी. मेढे यांना मानाचा *भारतीय शुगर*चा पुरस्कार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : ज्येष्ठ साखर उद्योग अभ्यासक आणि छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक पी. जी. मेढे यांची भारतीय शुगरतर्फे ‘’पृथ्वीराज शिंदे बेस्ट मॅनेजमेंट पेपर अवॉर्ड” या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

भारतीय शुगरचा १२ वा पुरस्कार समारंभ येत्या १८ जुलै कोल्हापूर येथे होणार आहे. यावेळी ९० हून अधिक पात्र पुरस्कार विजेत्यांना सन्मानित केले जाणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. रोख ३,००० रुपये, चषक आणि प्रमाणपत्र असे श्री. मेढे यांना मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप आहे.

श्री. मेढे यांना साखर उद्योगातील योगदानाबद्दल आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »