कर्नाटकात एफआरपीपेक्षा दोनशे ते तीनशे रुपये जादा

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा दोनशे ते तीनशे रुपये जादा दर दिला आहे. काही कारखान्यांनी तर साडेतीन हजारांपेक्षा अधिक दर देऊन विक्रम केला आहे.
या भागातील कारखाने पहिला हप्ता तीन हजार रुपयांप्रमाणे जमा करीत आहेत. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांपेक्षा उतारा कमी असूनही ते एफआरपीपेक्षा दीडशे ते दोनशे रुपये अधिक देत आहेत. उसाचे क्षेत्र कमी असल्याने उसाची पळवापळवी होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील उसाचेही गाळप ते करीत आहेत,
हंगाम सुरू होण्यापूर्वी बेळगाव जिल्ह्यातील २७ साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम जाहीर केली आहे. मात्र, त्यांनी जाहीर करताना तोडणी, ओढणीसह दर जाहीर केला आहे. जाहीर केलेल्या एफआरपीच्या रकमेतून तोडणी, ओढणी वजा केली तर २,८०० ते २,९०० रुपयांपर्यंत पहिला हप्ता मिळतो; पण घटलेले उसाचे क्षेत्रामुळे एफआरपीच्या रकमेवर १५० ते २०० रुपये अधिकचे देत आहेत.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील उसाला उतारा चांगला असल्याने येथील कारखानदारांनी एफआरपीवर दोनशे रुपये अधिक दिले तर टनाला ३,३०० ते ३,४०० पहिला हप्ता देणे शक्य आहे, असे शेतकरी नेत्यांना वाटते.
सीमा भागातील कारखान्यांचे जाहीर दर रुपयात असे
- बेळगाव शुगर्स प्रा.लि. हुदली – ३,६५७
- दूधगंगा कृष्णा, चिकोडी – ३,५८६
- धनलक्ष्मी, रामदुर्ग – ३.६५७
- घटप्रभा, संगनकेरी (ता. गोकाक) – ३,३४६
- गोकाक शुगर्स, कोळवी – ३.६४१
- हालसिद्धनाथ, निपाणी – ३,६११
- हर्षा शुगर्स लि. सौदत्ती – ३.३७१
- हिरण्यकेशी, संकेश्वर – ३,४८८
कृष्णा, संकोनट्टी (ता. अथणी)- ३,५२८ - लैला शुगर्स लि. खानापूर ३.३९६
- मलप्रभा, एम.के. हुबळी – ३,१६५
- रेणुका शुगर्स लि. रायबाग ३,४४८
- रेणुका शुगर्स लि. बुट्टी (ता. अथणी) ३.५३४
- रेणुका शुगर्स मुन्नोळी (ता. सौदत्ती)- ३,७७३
- सतीश शुगर्स, हुनशाळ – ३.६३५
- संगम, हिडलक डॅम (ता. हुक्केरी) – ३.५८९
- शिरगुप्पी शुगर्स लि. कागवाड – ३.४९१
- शिवशक्ती शुगर्स लि. सौंदत्ती ३.६२३
- शिवसागर शुगर्स उदपुडी – ३,४५८
- सोमेश्वर, बैलहोंगल – ३,६५७
- सौभाग्यलक्ष्मी हिरेनंदी ३,०८९
- दि मार्कडेय, काकती – ३,४७५
- दि उगार शुगर्स वर्क्स लि. ३.५६४
- वेंकटेश्वर प्रोजेक्ट लि. बेडकिहाळ – ३,६९३
- विश्वराज शुगर्स इंडस्ट्रिज लि. बेल्लद बागेवाडी – ३.६३२
- अरिहंत शुगर्स जैनापूर – ३,६०१
- अथणी शुगर्स प्रा.लि., अथणी – ३.५१८