नळेगाव कारखाना सुरू करण्यासाठी हालचाली

आवडल्यास ही बातमी शेअर करा

शेतकऱ्यांचे आ. अभिमन्यू पवारांना साकडे

औसा: चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील ‘जय जवान जय किसान’ सहकारी साखर कारखाना गेल्या २५ वर्षांपासून अवसायानात (बंद) आहे. हा कारखाना पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी परिसरातील शेतकरी प्रतिनिधी मंडळाने आमदार अभिमन्यू पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

अहमदपूर, चाकूर, शिरूर अनंतपाळ आणि उदगीर या चार तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला हा कारखाना हजारो शेतकरी आणि कामगारांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. याप्रकरणी शासनस्तरावर सकारात्मक पाठपुरावा करून कारखाना पुन्हा कार्यान्वित करण्याचे आश्वासन आ. पवार यांनी दिले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »