‘आजरा’च्या अध्यक्षपदी मुकुंदराव देसाई

आजरा : येथील वसंतराव देसाई आजरा साखर अध्यक्षपदी उदयसिंह ऊर्फ मुकुंदराव बळीराम देसाई यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, देसाई यांनी आपल्या समर्थकांसह ग्रामदैवत असलेल्या रवळनाथ व चाळोबा देव यांचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
अध्यक्षपदासाठी देसाई यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. प्रादेशिक सहसंचालक (साखर) जी. जी. मावळे निवड सभेच्या अध्यक्षस्थानी होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बंद लखोट्यातून अध्यक्षपदासाठी देसाई यांचे नाव सुचविले होते. संचालक वसंतराव धुरे हे सूचक, तर विष्णुपंत केसरकर यांनी अनुमोदन दिले. यानंतर देसाई यांची एकमताने अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अध्यक्ष देसाई यांचा सत्कार करण्यात आला.
उपाध्यक्ष सुभाष देसाई यांनी आभार मानले. उदयराज पवार, एम. के. देसाई, जिल्हा बँकेचे प्रतिनिधी सुधीर देसाई, मारुती घोरपडे, संभाजी दत्तात्रय पाटील, अनिल फडके, संभाजी पाटील, गोविंद पाटील, राजू मुरुकटे, राजेश जोशिलकर, काशिनाथ तेली, अशोक तर्डेकर, हरिबा कांबळे, रचना होलम, मनीषा देसाई, दिगंबर देसाई, रशीद पठाण, नामदेव नार्वेकर, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, सचिव व्यंकटेश ज्योती आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आजरा कारखाना अडचणीतून बाहेर काढणार : देसाई
आजरा कारखाना अडचणीत आहे. संचालक मंडळ, कामगार यांच्या सहकार्याने कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सभासद, ऊस उत्पादक शेतकरी यांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी नूतन अध्यक्ष देसाई यांनी केले आहे.