नानासाहेब परुळेकर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज बुधवार, जानेवारी ८, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष १८ , शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:१४ सूर्यास्त : १८:१७
चंद्रोदय : १३:१२ चंद्रास्त : ०२:३१, जानेवारी ०९
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : पौष
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : नवमी – १४:२५ पर्यंत
नक्षत्र : अश्विनी – १६:२९ पर्यंत
योग : सिद्ध – २०:२३ पर्यंत
करण : कौलव – १४:२५ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – ०१:२४, जानेवारी ०९ पर्यंत
सूर्य राशि : धनु
चंद्र राशि : मेष
राहुकाल : १२:४५ ते १४:०८
गुलिक काल : ११:२२ ते १२:४५
यमगण्ड : ०८:३७ ते १०:००
अभिजितमुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:२३ ते १३:०७
अमृत काल : ०९:४१ ते ११:१२
वर्ज्य : १२:४३ ते १४:१३
वर्ज्य : ०१:३२, जानेवारी ०९ ते ०३:०३, जानेवारी ०९

सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक नानासाहेब परुळेकर – एकट्याच्या हिंमतीवर त्यांनी १ जानेवारी, इ.स. १९३२ रोजी ‘सकाळ’ चा पहिला अंक प्रकाशित केला. सुरुवातीची काही वर्षे नानासाहेबांसाठी खडतर गेली. आर्थिक मंदी आणि आर्थिक ओढाताण यांमुळे सर्व व्यवहार काटकसरीने करावे लागत. आर्थिक विवंचनेतून कुठे सुटका होते, तोपर्यंत संपादकीय आणि व्यवस्थापकीय समस्या डोकं वर काढत. पण नानासाहेब या सर्वांना पुरून उरले. सचोटीने व्यवहार करून त्यांनी ‘सकाळ’ ला यशाचा मार्ग दाखवला आणि त्यातून मिळणार्या पैशाचा उपयोग आपला व्यवसाय संगीत, कीर्तनप्रचार सभा, नाट्यवाचन, ग्रंथपुरस्कार यासंबंधीच्या बातम्यांमुळे `सकाळ’ लवकरच सर्वसामान्यांपासून आणखी वाढवण्यासाठी केला.

सकाळ सुरू केल्यानंतर वर्षभरातच नानासाहेबांनी ‘साप्ताहिक सकाळ’ हे स्वतंत्र साप्ताहिक सुरू केले, आणि ते सुरू करून काही दिवस होतायत तोवरच ‘तेज’ नावाचे एक कमी किंमतीचे दैनिकही सुरू केले. एकदा पुण्यातली वृत्तपत्रे मार्गी लावल्यावर आता मुंबईमध्येही वृत्तपत्र सुरू करण्याचे विचार नानासाहेबांच्या डोक्यात घोळू लागले.

मुंबईतील दैनिकाचा विचार पक्का होताच नानासाहेबांनी २१ मार्च, इ.स. १९३६ रोजी ‘स्वराज्य’ दैनिक सुरू केले. पुढे ‘स्वराज्य’ चे दैनिक स्वरूप बदलून ते साप्ताहिक करण्यात आले आणि कालांतराने तर त्याची मुंबईतूनही उचलबांगडी झाली.

‘तेज’ दैनिक तर बंद पडलेच पण ‘सकाळ’लाही आर्थिक तूट भरून काढावी लागली. नानासाहेबांना तीस -चाळीस खटल्यांना तोंड द्यावे लागले. मानसिक क्लेशही सहन करावे लागले. पुण्यातील रूढीप्रिय, परंपरावादी गटाला नानासाहेबांची मुक्त धोरणे आवडत नव्हती. त्याबद्दल ते नानासाहेबांची टवाळीही करत असत. पण आता या अपयशामुळे नानासाहेबांना त्यांचा रोषही सहन करावा लागला.

पत्रकारितेतील कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविले होते. ‘निरोप घेता’ नावाचे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.

•१९७३: सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक ना. भि. परुळेकर उर्फ नानासाहेब परुळेकर यांचे निधन. (जन्म : २० सप्टेंबर ,१८९७ )

लेखिका आशापूर्णा देवी – परंपरेच्या जोखडात बांधलेल्या स्त्रीच्या स्थितीचं, तिच्या प्रश्नाचं एकूणच समस्त बंगाली भावजीवनाचं दर्शन, अत्यंत सहज, सरळ पण प्रभावी शैलीत आपल्या साहित्यातूनत्यांनी घडवलं आहे. कोलकात्याला एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात आशापूर्णादेवींचा जन्म झाला. तत्कालीन सामाजिक स्थितीमुळे त्या शाळेत कधीच गेल्या नाहीत. पण घरात त्यांना अक्षर ओळख करून दिली होती. वडील हरेंद्रनाथ गुप्त चित्रकार होते.
रूढार्थाने शालेय शिक्षण झालेले नसले, तरी अशाप्रकारे अक्षर ओळख घरातच झाली होती. बंगाली व्यतिरिक्त कोणतीही भाषा त्यांना येत नव्हती. इंग्रजीचा तर त्यांना गंधही नव्हता. भगवद्गीतेवर त्यांनी नितांत श्रद्धा होती. अशाप्रकारे घरातील वाचन वेड आणि विवाहानंतर पती कालीदास बाबू नाग यांच्या प्रोत्साहनामुळे त्या अविरत लिहित राहिल्या. सारं घरकाम उरकून रात्रीच्या निवांतवेळी, घरातच असलेल्या पतीच्या टाईपराटरवर त्या साहित्यनिर्मिती करू लागल्या.

वयाच्या १३ व्यावर्षी त्यांची ‘बाइ देर डाक’ ही पहिली कविता शिशूसाथी मासिकात प्रसिद्ध झाली. त्यांची दोनशेहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १७८ कादंबऱ्या, ३० कथासंग्रह, ४७ बालवाङ्मय स्वरूपातील पुस्तके, शिवाय इतर २५ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. प्रेम ओ प्रयोजन (१९४४), अग्नि-परिक्षा (१९५२), छाड़पत्र (१९५९), प्रथम प्रतिश्रुति (१९६४), सुवर्णलता (१९६६), मायादर्पण (१९६६),बकुल कथा (१९७४),उत्तरपुरूष (१९७६),जुगांतर यवनिका पारे (१९७८) या काही महत्त्वपूर्ण कादंबऱ्या तर जल और आगुन (१९४०) और एक दिन (१९५५),सोनाली संध्या (१९६२),आकाश माटी (१९७५),एक आकाश अनेक तारा (१९७७),सागर सुखाचे जाय, श्रेष्ठ गल्प, स्वनिर्वाचित गल्प, छायासूर्यग्रहणे, पूर्ण-पत्र, किर्चिया, आकाशमाटी, ये जीवन है हे काही महत्त्वाचे कथासंग्रह होत.

बंगाली एकत्र कुटुंबपद्धतीतील एकूण व्यवहारावर त्यांनी व्यवस्थित टीका केली आहे.याशिवाय त्यांच्या सागर, सुकाम जाय, कल्याणी (१९५४), वो बडे हो गए, काल का प्रहार, दोलना, तपस्या इ. अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रथम प्रतिश्रुति (१९६४) ही कादंबरी आणि सुवर्णलता (१९६६) व बकुलकथा (१९७३) या दोन कादंबऱ्या मिळून साधलेली त्रयी या कालखंडातील त्यांची एक महत्त्वाची सिद्धी ठरते. प्रथम प्रतिश्रुति ही एक विशाल महाकाव्यस्वरुप कादंबरी आहे. १०० वर्षांपूर्वीच्या मध्यमवर्गीय परिवाराची रामकहाणी या कादंबरीत शब्दांकित केली आहे.
पुरोगामी विचारांच्या या लेखिकेला लीला पुरस्कार,कोलकाता विद्यापीठ (१९५४), भूटान मोहिनी दासी स्वर्ण पदक (१९६६), पद्मश्री (१९७६), ज्ञानपीठ पुरस्कार(प्रथम प्रतिश्रुति या कृतीसाठी – १९७६), हरनाथ घोष पदक, बंगीय साहित्य परिषद (१९८८), जगतरानी स्वर्ण पदक, कोलकाता विद्यापीठ (१९९३) इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

१९०९: ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिल्या लेखिका आशापूर्णा देवी यांचा जन्म. ( मृत्यू : १३ जुलै १९९५ )

  • घटना :

१८३५: अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.
१८८०: सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय. ब्राम्हणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करु शकतात हे न्यायालयाने मान्य केले.
१८८९: संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले.
१९४०: दुसरे महायुद्ध – ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.
१९४७: राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली.
१९५७: गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली.
१९६३: लिओनार्डो डा व्हिन्सि यांच्या मोनालिसा चे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट, वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.
२००१: भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.

•मृत्यू :

•१८८४: ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक केशव चंद्र सेन यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर, १८३८)
•१९६७: प्राच्यविद्या पंडित श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर , १८८० )
•१९७३: तत्वज्ञ आणि विचारवंत स. ज. भागवत यांचे निधन.
••१९८४: पहिल्या भारतीय महिला वैमानिक सुषमा मुखोपाध्याय यांचे निधन.
•१९९२: आनंद मासिकाचे माजी संपादक दं. प्र. सहस्रबुद्धे यांचे निधन.
•१९९४: ६८वे शंकराचार्य परमाचार्य श्री. चंद्रशेखर सरस्वती यांचे निधन. (जन्म : २० मे , १८९४ )
•१९९५: समाजवादी विचारवंत मधु लिमये यांचे निधन. (जन्म: १ मे , १९२२)

  • जन्म :
    १९२४: स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य गीता मुखर्जी यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च, २०००)
    १९२५: हिंदी नाटककार राकेश मोहन यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी, १९७२)
    १९२६: प्रसिद्ध ओडिसी नर्तक केलुचरण महापात्रा यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल, २००४)
    १९२९: अभिनेता सईद जाफरी यांचा जन्म. ( मृत्यू: १५ नोव्हेंबर, २०१५ )
    १९३६: परराष्ट्रसचिव, मुत्सद्दी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ज्योतिंद्रनाथ दिक्षीत यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी, २००५)
    १९४१ : अभिनेत्री नंदा यांचा जन्म. ( मृत्यू:२५ मार्च, इ.स. २०१४)
    १९४५: मराठी लेखिका प्रभा गणोरकर यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »