रिग्रीन एक्सेलवर नरेंद्र मोहन यांची नेमणूक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : साखर उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठित इंजिनिअरिंग कंपनी रिग्रीन एक्सेल ईपीसी इंडिया लि.वर प्रो. डॉ. नरेंद्र मोहन यांच्यासह नव्या अतिरिक्त संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची रचना खालीलप्रमाणे असेल.

श्री. संजय देसाई – व्यवस्थापकीय संचालक (एमडी), श्री. तुषार पाटील – संचालक, जयंत गोडबोले – अति. संचालक, श्री. दिलीप आपटे – अति. संचालक, श्री. नरेंद्र मोहन – अति. संचालक,  डॉ. अपूर्वा जोशी – अति. संचालक.
कंपनीचे प्रमोटर सागर राऊत, किरण गवळी, रोकेश मस्कारेंहस, अलिमुद्दीन सय्यद, पल्लवी देसाई हे कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनात पूर्वीप्रमाणेच सक्रिय राहतील, असे रिग्रीन एक्सेलने कळवले आहे.

नवे अति. संचालक डॉ. नरेंद्र मोहन हे नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक होते. प्रदीर्घ कारकीर्दीनंतर ते अलीकडेच निवृत्त झाले आहेत. त्यांच्या नेमणुकीमुळे रिग्रीन एक्सेलचे संचालक मंडळ आणखी मजबूत झाले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »