डॉ. नरेंद्र मोहन यांची कृष्णा कारखान्यास भेट

कराड – नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे माजी संचालक डॉ. नरेंद्र मोहन अग्रवाल यांनी नुकतेच यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याला भेट दिली आणि कारखान्याच्या कामगिरीचे कौतुक केले.
यावेळी डॉ. नरेंद्र मोहन यांचे स्वागत कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले डॉक्टर नरेंद्र मोहन यांनी कारखान्याच्या विविध उपक्रमांची आणि प्रयोगांची माहिती घेतली.
यंदाच्या हंगामात आमचा साखर कारखाना साडेतेरा हजार मॅट्रिक टन प्रतिदिन क्षमतेने आम्ही चालवत आहोत, कारखान्याची स्थापित क्षमता 12000 मेट्रिक टन प्रतिदिन आहे असे असताना आमचा सर्व स्टाफ आमचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि अतुल भोसले आणि संचालक मंडळाच्या यांच्या मार्गदर्शनाखाली झोकून देऊन काम करत आहे. आमच्या कारखान्याने यंदाचा गळीत हंगाम अभूतपूर्व अशा पद्धतीने यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे, असे सुतार यांनी सांगितले






