नॅचरल शुगरकडून २५ टक्के लाभांश

आवडल्यास ही बातमी शेअर करा

संस्थापक अध्यक्ष ठोंबरे यांची घोषणा

धारशिव – नॅचरल शुगरच्या उत्तम व्यवस्थापनामुळे कारखान्याला चांगला नफा झाल्याने 25 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे.

 कळंब तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगरला उपपदार्थांच्या माध्यमातून चालू आर्थिक अहवाल वर्षात साखर व स्टील विभागातील तोटा भरून काढून ७६.२९ कोटी रूपये नफा झाला आहे. त्यामुळे सभासदांना लाभांश दिला जात आहे, अशी घोषणा नॅचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केली.

कारखान्याची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले, दुष्टचक्रात सापडलेला साखर निर्मिती उद्योग यशस्वी करून दाखवण्याचे काम नॅचरल शुगरने केले आहे. करखण्याने विक्रमी गाळप करूनही साखर उत्पादन तोटयात होते. नॅचरल शुगरने उपपदार्थ निर्मिती’ मधून कारखाना नफ्यात आणला. या उद्योगाला उर्जितावस्था आणावयाची असेल उपपदार्थ निर्मिती उद्योगाशिवाय पर्याय नाही.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »