नवरात्र (सहावी माळ)– कात्यायनी
आज मंगळवार, ऑक्टोबर ८, २०२४ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन १६ शके १९४५
सूर्योदय : ०६:३१ सूर्यास्त : १८:२१
चंद्रोदय ११:०४ चंद्रास्त : २२:०४
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतू : शरद्
चंद्र माह : आश्विज
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : पञ्चमी – ११:१७ पर्यंत
नक्षत्र : ज्येष्ठा – ०४:०८, ऑक्टोबर ०९ पर्यंत
योग : आयुष्मान् – ०६:५१ पर्यंत
करण : बालव – ११:१७ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – २३:५० पर्यंत
सूर्य राशि : कन्या
चंद्र राशि : वृश्चिक – ०४:०८, ऑक्टोबर ०९ पर्यंत
राहुकाल : १५:२३ ते १६:५२
गुलिक काल : १२:२६ ते १३:५४
यमगण्ड : ०९:२८ ते १०:५७
अभिजित मुहूर्त : १२:०२ ते १२:४९
दुर्मुहूर्त : ०८:५३ ते ०९:४०
दुर्मुहूर्त : २३:१३ ते ००:०२, ऑक्टोबर ०९
अमृत काल : १८:४२ ते २०:२५
वर्ज्य : ०८:२५ ते १०:०८
नवरात्र (सहावी माळ)
दिवस ६ – कात्यायनी
कात्यायन ऋषींच्या पोटी जन्मलेली, ती दुर्गेचा अवतार आहे आणि ती लाल रंगाने दर्शविलेले धैर्य दाखवते. योद्धा देवी म्हणून ओळखली जाणारी कात्यायनी ही देवीच्या सर्वात हिंसक रूपांपैकी एक मानली जाते. या अवतारात कात्यायनी सिंहावर स्वार होते आणि तिला चार हात आहेत. ती पार्वती, महालक्ष्मी, महासरस्वती यांचे रूप आहे. ती षष्ठमीला (सहाव्या दिवशी) पूजली जाते. पूर्व भारतात या दिवशी महाषष्ठी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गा पूजा सुरू होते.
नभ:स्पृशं दीप्तम्। – भारतीय वायुदलाचे घोष वाक्य
नभ:स्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो॥ ….भगवद्गीता ११.२४
—भारताचे भूतपूर्व राष्ट्रपति राधाकृष्णन् ह्यांनी हे वाक्य सुचविले.
अर्थ :- हे विष्णो, आकाशस्पर्शी ज्योतीसारख्या आणि अनेकवर्णयुक्त, उघडया मुखाच्या आणि प्रज्वलित विशाल नेत्रांच्या तुला पाहून भयभीत झालेल्या मजमध्ये धैर्य आणि शांती नाहीसे झाले आहेत. ८ ऑक्टोबर, इ.स. १९३२ मध्ये भारतीय वायुसेनेची स्थापना झाली. सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलातले प्रमुख होते. १२ मार्च इ.स. १९४५ रोजी रॉयल इंडियन एअर फोर्स चे नाव बदलून भारतीय वायुसेना असे झाले.
आज भारतीय वायुसेना दिन आहे
मिल्खा सिंग- हे भारतातील सर्वश्रेष्ठ एथलिट्समधील एक मानले जातात. त्यांना ‘Flying Sikh’- फ्लाईंग सिख म्हणजेच उडन सिख या नावानेही ओळखले जाते. Flying Sikh हे नाव त्यांना त्यांच्या वेगवान धावण्यामुळे मिळाले होते.
आज तु धावला नाहीस तर हवेत उडत होतास. म्हणूनच आम्ही तुला फ्लाइंग सिख असा किताब देतो. त्यानंतर मिल्खा यांना द फ्लाइंग सिख असे म्हटले जाऊ लागले. – पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती फिल्ड मार्शल अयूब खान त्यांना इ.स.१९५८ मध्ये च्या एशियाई खेळामध्ये २०० मी व ४०० मी मध्ये सुवर्ण पदक., इ.स.१९५८ मध्ये राष्ट्रमंडळ खेळात सुवर्ण पदक., भारत सरकारद्वारे त्यांना १९५९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.
१९३५: पद्मश्री पुरस्कार सन्मानित १९५८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक विजेते, द फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांचा जन्म. (मृत्यू : १८ जून, २०२१)
*जगप्रसिद्ध जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन-सर्व शिक्षणकाळात त्यांना गणित विषयात शंभरपैकी शंभर गुण पडले होते. त्यावेळी असलेल्या इंटरमिजिएट परीक्षेत मद्रास राज्यात ते पहिले आले होते. त्रिचि येथील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन ते मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये भौतिकशास्त्रातील पदवी परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूरू, या संस्थेत त्यांनी विद्युत अभियांत्रिकी विभागात प्रवेश घेतला. परंतु आपला कल मूलभूत विज्ञानाकडे, विशेषत: भौतिकीकडे आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे उपयोजित शाखा सोडून ते भौतिकशास्त्रात एम.एस्सी. झाले. प्रसिद्ध शास्त्रज्ञ सी. व्ही.रामन हे त्यांचे मार्गदर्शक होते. रामचंद्रन यांनी बंगळूरूतून मद्रास विद्यापीठात प्रबंध सादर केला. त्यांना त्या काळच्या ‘मद्रास’ आताच्या चेन्नई, विश्वविद्यालयाने स्फटिक भौतिकी आणि प्रकाशशास्त्र यातील संशोधन कामाबद्दल डी.एससी. पदवी प्रदान केली. मद्रास विश्वविद्यालयाबरोबरचे त्यांचे साहचर्य नंतरही जीवभौतिकी आणि क्ष किरण पंक्तिदर्शी (X-Ray spectroscopy) विभागाचे संचालक म्हणून कायम राहिले. नंतर ते इंग्लंडमधील केंब्रिज विश्वविद्यालयात गेले. तेथे क्ष-किरण पंक्तिदर्शन तज्ज्ञ वूस्टर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानी संशोधन केले. क्ष-किरणांमुळे होणारे विसरित विकीर्णन आणि त्याचे क्ष-किरण पंक्तिदर्शनात उपयोजन यासंबंधी संशोधनाबद्दल रामचंद्रन यांना पीएच्.डी. मिळाली. कालांतराने त्यांना रुडकी, हैदराबाद आणि वाराणसी विश्वविद्यालयांनीही डी.एससी. पदवी प्रदान केली.
नंतर ते भारतात परतले. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएस्सी) मध्ये भौतिकशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यभार स्वीकारला. १९७१ ते १९७८ च्या दरम्यान ते आयआयएस्सीच्या रेण्वीय जीवभौतिकी विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख होते. त्यानंतरची तीन वर्षे गणितीय तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून ते आयआयएस्सीत कार्यरत होते. पुढे ते सीएसआयआर या भारतातील विज्ञान प्रयोगशाळा समूहाशी विशेष सन्मानित संशोधक म्हणून निगडीत होते. १९५१ मध्ये केंब्रिज विश्वविद्यालयातील कॅव्हेन्डिश प्रयोगशाळेत त्यांना विल्यम लॉरेन्स ब्रॅग यांच्या बरोबर संशोधन करण्याची संधी मिळाली. विल्यम लॉरेन्स ब्रॅग यांना केवळ पंचविसाव्या वर्षी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता. रामचंद्रन यांचे पूर्वीचे मार्गदर्शक वूस्टरदेखील या संशोधन प्रकल्पात सहभागी झाले होते. या संशोधनांती स्फटिक रचनेत स्थितिस्थापकतेचा स्थिरांक निश्चित करण्यास उपयुक्त अशी गणितीय उपपत्ती रामचंद्रन यांनी मांडली. रामचंद्रन आलेखामुळे संकल्पित प्रथिन रेणूंची रचना अचूक आणि सुबकपणे, महागड्या यंत्रांविना, कमी मनुष्यबळात साकारणे शक्य झाले. या कामाचे फळ म्हणून रामचंद्रनना केंब्रिज विद्यापीठाची आणखी एक पीएच्.डी. मिळाली.
रामचंद्रन शिकागो विद्यापीठाच्या जीव भौतिकशास्त्र विभागात एक वर्षासाठी अतिथी प्राध्यापक म्हणून गेले. तेथे त्यांनी द्विमित विदा (2-D data) वापरून त्रिमित प्रतिमा घडविण्याच्या पद्धतीचा पाया रचला. त्यातून संगणक प्रतिमा रेखनतंत्र (computerized imaging) आकाराला आले. केंब्रिज विद्यापीठात त्यांना विख्यात नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ लायनस पॉलिंग (Linus Pauling) यांची व्याख्याने ऐकायला मिळाली. त्यातील आशय त्यांना अमिनो आम्लांचे रेणू एकमेकांशी पेप्टाईड बंधांनी नेमके कसे जोडले जातात आणि अमिनो आम्लांच्या रेणूसाखळ्या कशा बनतात या घडणीचे बारीक तपशील समजण्यास उपयोगी पडले.
रामचंद्रन यांनी गणितीय प्रतिमानांचा उपयोग करून प्रस्तावित केलेल्या आलेखामुळे कोलॅजेन प्रथिन रेणूची रचना त्रिसर्पिल असते हे कळले. कोलॅजेन हे संयोजी ऊतीमधील प्रथिन विविध अवयव आणि स्थिरता (Structural protein) देते. रामचंद्रन यांच्या संशोधनातून मायोग्लोबीन या स्नायू प्रथिनाची रचना उलगडली. बर्नालना यांच्या सल्ल्याने त्यांनी कोलॅजेन प्रथिनाच्या रचनेवर संशोधन केले. शरीरातील स्नायूबंध व अस्थिबंध कोलॅजेनने बनलेले असतात. कांगारूंच्या शेपटीच्या स्नायूपुच्छातील (tendon) कोलॅजेनची रेणूस्तरावरील रचना यावर रामचंद्रन आणि त्यांचे सहकारी, गोपीनाथ कार्थ यांनी संशोधन केले. या दोघांचा शोधनिबंध नेचर या मासिकात प्रकाशित झाला.
रामचंद्रन यांनी शोधून काढलेला फी-साय आलेख प्रथिन रचना समजण्यासाठी अत्यावश्यक मानला जातो.
प्रथिने जीवधारणेसाठी महत्त्वाचे रेणू आहेत. प्रथिन रचनेसंबंधी रामचंद्रन यांनी काम केले. त्यांना ‘पॉल पीटर इवाल्ड पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार इंटरनॅशनल युनियन ऑफ क्रिस्टॅलोग्राफीतर्फे दर तीन वर्षांनी पंक्तिदर्शन (spectroscopy) क्षेत्रातल्या सर्वोत्तम वैज्ञानिकाला दिला जातो. रामचंद्रन यांना विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च, असा भौतिकशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दलचा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंडियन नॅशनल सायन्स अकादमी, रॉयल सोसायटी आणि रॉयल सोसायटी ऑफ लंडन, काउन्सिल ऑफ इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाईड बायोफिजिक्स अशा अनेक प्रतिष्ठित संस्थांचे ते सन्मानयीय सदस्य होते.
रामचंद्रन यांच्या आमंत्रणाला मान देऊन जगातील अनेक अव्वल दर्जाचे शास्त्रज्ञ आंतरराष्ट्रीय जीवभौतिकी अभ्यासक व्याख्यानांसाठी मद्रास येथे येऊन गेले. त्यात लायनस पॉलिंग, सेवेरो ओछोआ, मॉरीस विल्किन्स, पॉल फ्लोरी, डोरोथी हॉज्किन, लॉरेन्स ब्रॅग यांचा समावेश होतो. रामचंद्रन यांना भारतीय आणि पाश्चात्य संगीतात गती होती. रामचंद्रन यांचे कंपवाताच्या दीर्घकालीन आजाराने चेन्नईमध्ये निधन झाले.
- २००१: जगप्रसिद्ध जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन यांचा जन्म. (मृत्यू : ७ एप्रिल २००१)
घटना :
१९३२: इंडियन एअर फोर्स अॅक्ट द्वारे भारतीय वायूदलाची स्थापना झाली.
१९३९: दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडचा पश्चिम भाग ताब्यात घेतला.
१९५९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय डी-लिट पदवी घरी येऊन दिली.
१९६२: अल्जीरीयाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
१९६२: नाट्य निकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित तो मी नव्हेच या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे झाला.
१९७८: ऑस्ट्रेलियाच्या केन वॉर्बीने पाण्यावर ३१७.६० तशी मैल वेगाचा विक्रम केला.
१९८२: पोलंडने सॉलिडॅरिटी व इतर सर्व कामगार संघटनांवर बंदी घातली.
२००१: सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची (Department of Homeland Security) स्थापना केली.
२००५: काश्मीर मध्ये झालेल्या ७.६ रिश्टर भूकंपा मुळे सुमारे ८६,००० – ८७,५०० लोक मृत्युमुखी पडले, ६९,०००- ७२,५०० जण जखमी झाले आणि २.८ दशलक्ष लोक बेघर झाले.
- मृत्यू :
- १८८८: कवी व संस्कृतचे प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर, १८३५ – माहुली, सांगली, महाराष्ट्र)
- १९३६: हिन्दी साहित्यिक धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ मुन्शी प्रेमचंद यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १८८०)
- १९९६: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका गोदावरी परुळेकर यांचे निधन. (जन्म: १४ ऑगस्ट १९०७)
- १९९८: देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका, कोकणच्या मदर तेरेसा इंदिराबाई हळबे ऊर्फ मावशी यांचे निधन.
- २०१२: केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल नवल किशोर शर्मा यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९२५)
- २०१२: पत्रकार व पार्श्वगायिका वर्षा भोसले यांचे निधन.
जन्म :
१८९१: उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १९७५)
१९२२:संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल २००१ – चेन्नई, तामिळनाडू)
१९२४: भारतीय कवि आणि स्कॉलर थिरूनलूर करुणाकरन यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै २००६)
१९२६: जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार ऊर्फ जानी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १९९६)
१९३०: भारतीय इंग्रजी दिग्दर्शक आणि निर्माता अलेसदैर मिल्ने यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी २०१३)