निफाड कारखान्याच्या विक्रीविरुद्ध महामोर्चा

निफाड : निफाड सहकारी साखर कारखान्ऱ्याची १२७एकर जमीन व अन्य मालमत्तेची विक्री प्रक्रिया त्वरित थांबवावी, कामगारांची थकीत देणी देण्यात यावी. मशिनरी दुरुस्तीच्या नावाखाली विक्री केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मौल्यवान सामग्री विक्रीची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, आदी मागण्यासाठी ‘निसाका‘ संघर्ष समिती व सभासद, कामगारांतर्फे निफाड तहसील व प्रांताधिकारी कार्यालयावर मंगळवारी धडक मोर्चा काढण्यात आला.
‘निसाका‘ची विक्री रद्द करा, निसाका आमच्या हक्काचा, नाहो कुणाच्या बापाचा‘ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.निफाड कारखान्याचे कोट्यवधी रुपयांचे भंगार विकणाऱ्यावर गुन्हे दाखल करा, सभासद व कामगार एकजुटीचा विजय असो अशाघोषणा देत सर्वपक्षीय कार्यकत्यांनी धडक मोर्चात एल्गार पुकारला, मोचविळी तहसील प्रांगणात बोलताना अनिल कदम म्हणाले, निसाका हा कर्मवीरांच्या त्याग आणि सभासदांच्या कष्टातून उभा राहिला आहे. त्यामुळे हा कारखाना पुन्हा चालू झाला पाहिजे यासाठी कामगार, शेतकऱ्यांनी पोटतिडकीने हा उभा केलेला लढा यापुढेही सुरूच ठेवण्याचा इशारा जिल्हा बँक व सरकारला दिला आहे. निफाडचे माजी आमदार अनिल पाटील कदम यांनी नेतृत्व केले.

जिल्हा बँकेतर्फे निफाड कारखान्याची जमीन विक्री करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सभासद, कामगारांना समजताच सभासद कामगार यांच्यामध्ये तीव्र नाराजी पसरली होती. साहजिकचकामगार सभासदांच्या भावनांचा आदर करीत माजी आमदार अनिल कदम यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेत त्यांना निसाकाची वस्तुस्थिती समजावून सांगितली. ओ. राऊत यांनीही केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवत याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली होती. यानंतरही मालमत्ता विक्रीची प्रक्रिया सुरूच आहे.