‘शुगरटुडे’च्या विशेषांकाचे नितीन गडकरी यांच्याकडून कौतुक

पुणे : ‘शुगरटुडे’ मासिकाने गेल्या दिवाळी निमित्त प्रकाशित केलेल्या ‘शतकोत्तर सहकाराची वाटचाल’ या विशेषांकाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांनी कौतुक केले. या अंकामध्ये श्री. गडकरी यांचा सहकारावर सखोल चिंतन करणारा खूप उत्तम लेख आहे.
पुणे येथे विविध कार्यक्रमांसाठी आणि राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकारणाच्या बैठकीसाठी आलेल्या गडकरी यांनी पुणे परिसरात सुरू असलेल्या रस्ते विकास कामांचा उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला.
या दौऱ्यात ‘शुगरटुडे’चे मुख्य संपादक नदंकुमार सुतार यांनी श्री. गडकरी यांची भेट घेऊन ‘शुगरटुडे’चा विशेषांक भेट दिला, तसेच या ‘शुगरटुडे’च्या उपक्रमांबाबत माहिती दिली. यापुढे ग्रीन फ्यूल हा जगातील परवलीचा शब्द राहील आणि तेच भवितव्य राहील, असे गडकरी यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या विविध समस्यांबाबतही मा. गडकरी यांच्याशी साधला. साखर उद्योगाकडे माझे नेहमीच लक्ष आहे, तो प्रथमपासून माझ्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे, असे प्रतिपादन श्री. गडकरी यांनी केले.
‘शुगरटुडे’च्या वतीने लवकरच आयोजित केल्या जाणाऱ्या ‘साखर उद्योग महाविचारमंथन परिषदे’ला प्रमुख मार्गदर्शक म्हणून येण्याचे त्यांनी यावेळी मान्य केले.
‘शुगरटुडे’च्या या विशेषांकामध्ये केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इ. मान्यवरांचेही लेख आहेत. ‘सहकारातून देशाचा शाश्वत विकास’ या विषयावर नितीन गडकरी यांचा लेख आहे.
(अंकासाठी ८९९९७७६७२१ या क्रमांकावर व्हॉट्सॲप संदेश पाठवावा)






