प्र . के. अत्रे

आज शुक्रवार, जून १३, २०२५युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ दिनांक २३ , शके १९४७
सूर्योदय : ०६:०१ सूर्यास्त : १९:१७
चंद्रोदय : २१:१८ चंद्रास्त : ०७:२७
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : ज्येष्ठ
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : द्वितीया – १५:१८ पर्यंत
नक्षत्र : पूर्वाषाढा – २३:२१ पर्यंत
योग : शुक्ल – १३:४८ पर्यंत
करणगर – १५:१८ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – ०३:३५, जून १४ पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : धनु – ०५:३८, जून १४ पर्यंत
राहुकाल : १०:५९ ते १२:३९
गुलिक काल : ०७:४० ते ०९:२०
यमगण्ड : १५:५८ ते १७:३७
अभिजित मुहूर्त : १२:१२ ते १३:०५
दुर्मुहूर्त : ०८:४० ते ०९:३३
दुर्मुहूर्त : १३:०५ ते १३:५८
अमृत काल : १८:१६ ते १९:५७
वर्ज्य : ०८:०६ ते ०९:४८
विनोदी लेखक प्र . के अत्रे – आदर्शांची पायमल्ली, मनाविरुद्ध मते मांडली की तुटून पडणे, चारित्र्यहनन, माहितीची शहानिशा करून न घेता प्रहार करणे, अशा अत्र्यांच्या काही उणिवांवर बोट ठेवले जाते. असे असले तरी त्यांच्या काही निष्ठा पक्क्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे सामाजिक बांधिलकी. समाजातील दुर्बल घटक, गोरगरीब, तळागाळातील माणसे, अज्ञजन, उपेक्षित, दलित यांचा आपल्या सामर्थ्यानिशी अत्र्यांनी सतत कैवार घेतला.
प्रल्हाद केशव अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. फार काय, आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते.
जून १९२४ साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बी.टी. परीक्षेत वर्गात प्रथम आले व त्यानंतर १९२७ ते १९२८ सालच्या दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला. पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना केली. प्राथमिक शाळेसाठी “नवयुग वाचनमाला” व दुय्यम शाळेसाठी “अरुण वाचनमाला” ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. १९३७ साली पुणे नगरपालिकेत निवडून आल्यानंतर शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले.
अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या “श्यामची आई” चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या “राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार” सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले “सुवर्ण कमळ” मिळाले होते.
• १९६९: विनोदी लेखक, नाटकाकर, कवी, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ, टीकाकार, प्रभावी वक्ता, राजकारणी केशवकुमार उर्फ प्रल्हाद केशव अत्रे यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १८९८)
शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर – आधुनिक काळातील एक प्रख्यात महाराष्ट्रीय शिल्पकार. बालवयातच कलांची आवड निर्माण झाली. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे जी. डी. आर्ट ही पदविका घेतली (१९१३). रॉयल ॲकॅडमी ऑफ आर्ट, लंडन येथे उच्च शिल्पशिक्षण. १९१६ पासून कलकत्ता, गोंडल (सौराष्ट्र), बडोदे व अखेरीस मुंबई येथे शिल्पव्यवसाय. तैलचित्रण हा त्यांचा आवडता छंद. ओटो रॉथफील्ड यांच्या उत्तेजनाने ते शिल्पव्यवसायाकडे वळले.
इंग्लंड, फ्रान्स, इटली, हंगेरी व अमेरिका या देशांत शिल्पविषयक अधिक अभ्यास व शिल्पव्यवसाय या निमित्तांनी प्रवास केला. अखिल भारतीय शिल्पकार संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष, ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ चे अध्यक्ष, ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’ चे उपाध्यक्ष, लोकसभेतील सजावटीसाठी नेमलेल्या तज्ञ समितीचे सदस्य आदी विविध पदांवर त्यांनी कार्य केले.
१९६४ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब मिळाला. त्याच वर्षी ललित कला अकादमीचे फेलो म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
करमरकरांना पुणे येथील शिवाजी महाराजांच्या ब्राँझच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे (१९२८) दिगंत कीर्ती लाभली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, विठ्ठलभाई पटेल, चित्तरंजनदास, रविंद्रनाथ टागोर इ. त्यांची व्यक्तिशिल्पे प्रख्यात आहेत. त्यांच्या अन्य शिल्पांत ‘धीवरकन्या’, ‘कोकरू’ ‘भक्ती’, ‘संघर्ष’, ‘विसावा’, ‘नमस्ते’, ‘गवळण’, ‘कंबुवादिनी’, ‘प्रवासी’, ‘तल्लीनता’, ‘बकर्यास घास देणारी स्त्री’, ‘ग्रीष्म ऋतू’ इ. उल्लेखनीय आहेत. शिल्पांमधील लय व सजीवपणा यांमुळे ती वैशिष्ट्यपूर्ण ठरली.
• १९६७: पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १८९१)
- घटना :
१८८१: यू. एस. एस. जीनेट आर्क्टिक समुद्रात नष्ट.
१८८६: कॅनडातील व्हॅनकूवर शहर आगीत बेचिराख.
१९३४: व्हेनिसमध्ये अॅडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी यांची भेट.
१९५६: पहिली युरोपियन चॅम्पियन कप फूटबॉल स्पर्धा रियल माद्रिदने जिंकली.
१९७८: इस्त्रायली सैन्याने लेबनॉनमधुन माघार घेतली.
१९८३: पायोनियर १० हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.
१९९७: दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीत ५९ जण मृत्युमुखी पडले, तर सुमारे १०० जण जखमी झाले.
२०००: स्पेन मधील माद्रिद येथे एकाच वेळी १५ स्पर्धकांविरुद्ध खेळताना ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने बारा लढतीत विजय मिळविला.
• मृत्यू :
- जन्म :
१८७९: कट्टर हिंदुत्त्ववादी आणि अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च, १९४५)
१९०५: इंग्लंडचे क्रिकेटपटू कुमार श्री दुलीपसिंहजी यांचा जन्म., यांच्या स्मरणार्थ भारतात दुलीप ट्रॉफी खेळली जाते. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५९ – मुंबई)
१९०९: केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते इ. एम. एस. नंबूद्रीपाद यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च, १९९८)
१९२३, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित गीतकार प्रेम धवन यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे, २००१ )
१९६५: भारतीय क्रिकेटपटू मनिंदर सिंग यांचा जन्म.