पी. सावळाराम

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शुक्रवार, जुलै ४, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक १३, शके १९४७
सूर्योदय : ०६:०६ सूर्यास्त : १९:२०
चंद्रोदय : १३:५३ चंद्रास्त : ०१:२९, जुलै ०५
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : आषाढ़
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : नवमी – १६:३१ पर्यंत
नक्षत्र : चित्रा – १६:५० पर्यंत
योग : शिव – १९:३६ पर्यंत
करण : कौलव – १६:३१ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – ०५:४५, जुलै ०५ पर्यंत
सूर्य राशि : मिथुन
चंद्र राशि : तूळ
राहुकाल : ११:०४ ते १२:४३
गुलिक काल : ०७:४५ ते ०९:२४
यमगण्ड : १६:०२ ते १७:४१
अभिजित मुहूर्त : १२:१६ ते १३:०९
दुर्मुहूर्त : ०८:४४ ते ०९:३७
दुर्मुहूर्त : १३:०९ ते १४:०२
अमृत काल : ०९:३८ ते ११:२६
वर्ज्य : २३:०८ ते ००:५६, जुलै ०५

हे वीर विवेकानंद
हे वीर विवेकानंद हिंदुयशमूर्ती
हे युवक प्रवर तू युवहृदयांची स्फूर्ती।।धृ।।
दास्यात पाहुनी विश्वधर्मजननी ही
तू क्षुब्ध सिंहसा व्याकुळ अंतर्यामी
मुक्तीचा तिचिया ध्यास तुला दिनराती।।१।।
शत-आघातांनी कुंठीत मूर्च्छित झाली
ती हिंदुचेतना फिरूनी तू चेतविली
तिज उन्नत मस्तक निर्भय केले जगती।।२।।
स्मरतात तुझे ते घनगर्जितसे शब्द
मन वज्र हवे अन मनगट ते पोलाद
जग जिंकायाची ईर्षा दाटो चित्ती।।३।।
तव अमृतवाणी हाक देत आम्हाते
रे अतुलबलस्वी करू हिंदुराष्ट्राते
युवशक्ती हवी मज कार्य शरण पुरूषार्थी।।४।।
जी जीवनपुष्पे सतेज नवरक्ताची
स्थापावा त्यांनी धर्म-आत्म अर्पुनी
त्यानेच अर्चना होत राष्ट्रदेवाची।।५।।

•१९०२: भारतीय तत्त्वज्ञानी स्वामी विवेकानंद यांनी देहत्याग केला. (जन्म: १२ जानेवारी , १८६३)

भावगीत लेखक पी सावळाराम ‘लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची’
कविवृत्तीच्या या सावळारामांवर कविवर्य माधव ज्युलियन ऊर्फ प्रा. माधव पटवर्धन यांचे साहित्यसंस्कार झाले. कारण कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात प्रा. माधवराव पटवर्धन त्यांना शिकवायला होते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून ‘बीए. बी. टी.’ व्हायचं, हे त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं. या ध्येयरस्त्याचा त्यांचा आदर्श आचार्य अत्रे होते. परंतु १९४२ मध्ये ‘चले जाव’ चळवळीच्या धामधुमीत त्यांचं बी. टी. होणं मागे पडलं आणि रेशनिंग इन्स्पेक्टरची नोकरी करतानाच पुन्हा जोमाने गीतलेखन सुरू झालं. त्यांचं पहिलं गीत १९४८ साली प्रकाशित झालं. ‘राघू बोले मैनेच्या कानात गं’ या पहिल्या गीताने त्यांची काव्यगंगा जोमाने प्रवाहीत झाली.

पी. सावळाराम यांची काव्यलेखनाची भाषा साधी व सोपी आहे. त्यामुळेच मराठी माणसांच्या जीवनातील घडामोडींना सर्वांगीण स्पर्श करणारी त्यांची गाणी अजरामर झाली. शेत, रान, नदी, तळे, सागर, देव, आई, लहान बाळ, वृक्ष, पाऊल, संसार इत्यादी सर्वपरिचित शब्द त्यांनी आपल्या काव्यात वापरून सोप्या तालबद्ध भाषेत काव्यरचना केली.
गीतरचनेचं वैशिष्ट्य लोकमानसाशी निगडित असणं होय, हे त्यांनी ओळखलं होतं. त्यातूनच पुढे हे प्राकृतिक वैशिष्ट्य अर्वाचीन मराठी कवितेच्या कालखंडात थोडं वेगळं वळण घेऊन ‘भावगीत’ बनलं. त्यांची अशी ७२ भावगीतं अतिशय लोकप्रिय झाली. त्यापैकी कित्येक गीतांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. त्यांत भक्तिपर, स्त्रीमनाच्या विविध भावभावना उलगडणाऱ्या अनेक गीतांचा समावेश दिसेल.

स्त्री मनाची हळुवाररूपं साकारणारा कवी सावळारामांच्या गीतांतून दिसतो. स्त्रीचं अवघं भावविश्व ज्या एका महत्त्वाच्या घटनेवर आधारित असतं, तो प्रसंग म्हणजे तिचं लग्न. यावर आधारित सावळारामांनी लिहिलेली गाणी आठवून पाहा.

‘लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची’ असं म्हणणारी अवखळ मुलगी, ‘गोड गोजिरी लाज लाजरी, ताई तू होणार नवरी’ असं चिडवणारी धाकटी बहीण, ‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का?’ म्हणत आपल्या लाडक्या लेकीला निरोप देणारी वत्सल माता, ‘लिंबकोण उतरता अशी का झालीस तू बावरी, मुली तू आलीस अपुल्या घरी’ म्हणणारी प्रेमळ सासू, ‘हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशिला का?’ असं विनवणारी प्रिया, ‘जिथे सागरा धरणी मिळते, तिथे तुझी मी वाट पाहाते’ म्हणणारी आतुर प्रेयसी,
‘माझिया नयनांच्या कोंदणी उमलते शुक्राची चांदणी’ म्हणत लाजणारी यौवनातील मुग्धा, ‘हसले गं बाई हसले अन् कायमची मी फसले’ म्हणत प्रेमबंधात हरवून बसलेली यौवना, ‘गंध फुलांचा गेला सांगून’ मधील मीलनाची आस बाळगणारी ललना, ‘कोकीळ कुहू कुहू बोले’ म्हणत प्रीतीला साद घालणारी प्रिया, ‘सप्तपदी मी रोज चालते’ म्हणणारी कृत्यकृत्य पत्नी, ‘बाळ होऊ कशी उतराई? तुझ्यामुळे मी झाले आई’ असं म्हणत आपल्या मुला-बाळांसाठी आपल्या आयुष्याचंही दान देऊ पाहणारी ममताळू माता… अशा विविध स्त्री-रूपांतून स्त्रीमनाचे विविध पैलू त्यांनी उलगडले. आजही त्या गीतांचे सूर कानी पडले तरी कान टवकारले जातात, कारण शब्दांमधून होणारी अर्थप्रतीती, उत्कट भाव, चित्रमयता, संवेदनप्रधानता ही सर्व वैशिष्ट्यं त्या गीतांमध्ये एकवटलेली आहेत. त्यामुळेच ती आजही आपलं लक्ष वेधून घेतात.

त्याच्या भावगीतांबरोबरच सावळारामांची भक्तिरसयुक्त गीतंही लोकांच्या ओठी नेहमी असतात.

’ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता’, ’धागा धागा अखंड विणू या’, ’रघुपती राघव गजरी गजरी’, ’देव जरी मज कधी भेटला’, ‘पंढरीनाथा झडकरी आता’… अशी अनेक भक्तिगीतं त्यांनी लिहिली. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथील प्रत्येक संताचं अलौकिक कार्य कवीना माहीत असल्यामुळे भक्तिरसांनी ओतप्रोत अशी अनेक भक्तिगीतं लिहून त्यांनी नैतिक मूल्यांचा पाया आपल्या रसिकांसाठी घातला.

त्यांनी लिहिलेल्या गवळणीसुद्धा लक्षवेधक ठरल्या. उदा. ‘घट डोईवर घट कमरेवर’, ‘राधा कृष्णावरी भाळली’, ‘वेड लागले त्या राधेला’, रा’धा गौळण करिते मंगल’, ‘रिमझिम पाऊस पडे सारखा’, ‘सखी गं मुरली मोहन मोही मना’… राधा-कृष्ण या अजरामर जोडीचं परस्परांत गुंतणं हा सावळारामांना लुभावून टाकणारा काव्यविषय. राधेचं कृष्णरूप होणं, चराचर सृष्टीने त्यावर माना डोलावणं, हे लाघवी रूप या त्यांच्या सर्वच गाण्यांनी घेतलं आहे. चित्रपट हे लोकमाध्यम आहे. त्याच्या दृश्यश्राव्य रूपाचा लोकमानसावर प्रभावी परिणाम होतो, हे लक्षात घेऊन त्यांनी ही संस्कारी गाणी लिहिल्याचं जाणवतं. कौटुंबिकता ही त्यांच्या गीतलेखनाची मर्यादा आणि तेच त्यांचं सामर्थ्यही होतं. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी त्यांना ‘जनकवी’ ही यथार्थ उपमा देऊन गौरवलं, ते उगाच नव्हे!

१९१४: भावगीत लेखक निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ पी. सावळाराम यांचा जन्म. (मृत्यू: २२ डिसेंबर १९९७)

  • घटना :
    १०५४: वृषभ राशीत क्रॅब नेब्यूला दिसत असल्याचे चिनी लोकांना समजले. नंतर जॉन बेव्हिसने इ. स. १७३१ मधे त्याचे निरीक्षण केल्याची नोंद आहे.
    १७७६: अमेरिकेने स्वत:ला इंग्लंडपासून स्वतंत्र्य घोषित केले.
    १९०३: मोटर रेस स्पर्धे मध्ये भाग घेणारी डॉरोथी लेव्हिट ही पहिली इंग्लिश महिला ठरली.
    १९११: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमान निकोबार बेटावरून कारावासास प्रारंभ झाला.
    १९३६: अमरज्योती हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
    १९४६: फिलिपाइन्सला अमेरिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.
    १९४७: भारत पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.
    १९९७: नासाचे पाथफाइंडर हे मानवविरहित यान मंगळावर उतरले.
    १९९९: लष्कराच्या १८व्या बटालियनने कारगिलमधील द्रासमधील टायगर हिल्स हा महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला.

• मृत्यू :

  • १९६३: भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकय्या यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८७६)
  • १९८२: ‘ऐ मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम…’ या गाण्यातला एक एक शब्दामुळे मनाला शांतता लाभते.
    ‘मेरी छोटीसी बहन देखो गहने पहन…’, ‘पिया ते कहाँ गये…’, ‘मेरी आन भगवान…’, ‘आँखो में आँखे डाल के…’, ‘दिल तुमने लिया है…’, ‘आया रे आया रे भज्जीवाला…’ आणि ‘यह कहानी है दिये और तुफान की…’ ही पं. व्यास यांची गाणी गाजली होती.
    भक्तिप्रधान, पौराणिक चित्रपटांचे गीतकार भरत व्यास यांचे निधन.
  • जन्म :
    १८९८: भारताचे २रे पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी, १९९८)
    १८९७: भारतीय कार्यकर्ते अलारी सीताराम राजू यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे १९२४)
    १९१२: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९९४)
    १९२६: विनोदी साहित्यिक विनायक आदिनाथ तथा विनायक आदिनाथ बुवा यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल, २०११)
    १९८३: भारतीय-इंग्लिश पत्रकार अमोल राजन यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »