आज शहीद दिन
आज गुरुवार, मार्च २३, २०२३ रोजीचे
पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२५
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर चैत्र ०२, शके १९४५
सूर्योदय : ०६:४० सूर्यास्त : १८:५०
चंद्रोदय : ०७:४५ : चंद्रास्त : २०:३४
शक सम्वत : १९४५
संवत्सर : शोभन
उत्तरायण
ऋतू : वसंत
चंद्र माह : चैत्र
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : द्वितीया – १८:२० पर्यंत
नक्षत्र :रेवती – १४:०८ पर्यंत
योग : इन्द्र – ०३:४३, मार्च २४ पर्यंत
करण : बालव – ०७:१६ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – १८:२० पर्यंत
क्षय करण : तैतिल – ०५:३५, मार्च २४ पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : मीन – १४:०८ पर्यंत
राहुकाल : १४:१६ ते १५:४८
गुलिक काल : ०९:४३ ते ११:१४
यमगण्ड : ०६:४० ते ०८:१२
अभिजित मुहूर्त : १२:२१ ते १३:१०
दुर्मुहूर्त : १०:४४ ते ११:३२
दुर्मुहूर्त : १५:३५ ते १६:२४
अमृत काल : ११:५३ ते १३:२३
अमृत काल : ०६:२४, मार्च २४ ते ०७:५७, मार्च २४
निःशंक हो, निर्भय हो, मना रे
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे
अतर्क्य अवधूत हे स्मर्तू गामी
अशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।।
श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी (प्रकटकाल : इ.स. १८५६-१८७८) हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशीही बर्याच भक्तांची श्रद्धा आहे. “मी नृसिंह भान असून श्रीशैलम्जवळील कर्दळी वनातून आलो आहे” हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले.
आज अक्कलकोट – स्वामी समर्थ प्रगट दिन आहे
चेटीचंड हा सिंधीभाषक बांधवांचा नववर्ष स्वागताचा सण आहे.सिंधी भाषेत चेट हा शब्द चैत्र महिना या अर्थी येतो. ग्रेगोरिअन कालदर्शिकेनुसार हा सण मार्च किंवा एप्रिल महिन्यात गुढी पाडव्याच्या दिवशी येतो. चैत्रीचांद या मूळ शब्दाचा चेटीचंड हा अपभ्रंश आहे. आज संत झुलेलाल जयंती तसेच सिंधी बांधवांचा नववर्ष दिन आहे
• आज जागतिक हवामान दिवस आहे.
स्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही आनंदाने कवटाळणारे थोर क्रांतीकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव ख्रिस्ताब्द १९२८ मध्ये भारतीय घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडहून सायमन कमीशन’ नावाचे शिष्टमंडळ भारतात आले. भारतात सर्वत्र या शिष्टमंडळाचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. त्या वेळी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.
सायमन परत जा’ च्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. जमाव पांगवण्यासाठी आरक्षकांनी केलेल्या अमानुष लाठीआक्रमणात लाला लजपतराय घायाळ झाले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. देशभक्तीने भारावलेल्या क्रांतीकारकांना हे सहन झाले नाही. क्रांतीकारकांनी लालाजींच्या मृत्यूला कारणीभूत असणार्या लाहोर आरक्षक ठाण्यातील इंग्रज अधिकारी सँडर्स याला ठार मारण्याचे ठरवले. त्याप्रमाणे लालाजींच्या पहिल्या मासिक श्राद्धाच्या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे तिघेही वेष पालटून आरक्षक अधिकारी यांच्या निवासस्थानापाशी गेले. सँडर्स दिसताच सुखदेव याने संकेत केला. भगतसिंग आणि राजगुरू यांनी एकाच वेळी गोळया झाडून त्याचा बळी घेतला आणि तेथून पलायन केले. इंग्रज सरकारने तिघांना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. तसेच त्यांना पकडून देणार्याला पारितोषिक देण्यात येईल, अशी घोषणाही केली; परंतु बरेच दिवस आरक्षकांना हुलकावणी देत ते तिन्ही क्रांतीकारक भूमिगत राहिले. पुढे फितुरीमुळे ते पकडले गेले. शेवटी २३.३.१९३० या दिवशी भारतमातेच्या या तिन्ही सुपुत्रांना फाशी देण्यात आली.
भगतसिंग – जन्म : भगतसिंग याचा जन्म २७.९.१९०७ या दिवशी पंजाब राज्यातील एका सरदार घराण्यात झाला.
शिवराम हरी राजगुरू – जन्म : २४.८.१९०८
सुखदेव थापर – सुखदेव यांचा जन्म पंजाब राज्यामध्ये, १५.५.१९०७ या दिवशी झाला.
१९३० : आज शहीद दिन हुतात्मा राजगुरू, भगतसिंग व सुखदेव यांचा बलिदान दिन आहे.
आज शहीद दिन आहे
प्रसिद्ध उद्योजिका- किरण मजूमदार शॉ भारतातील एकट्या अशा बिझिनेसवुमन आहेत, ज्या आपल्या हिमतीवर अब्जाधीश झाल्या आहेत. देशातील सगळ्यात मोठी बायोफार्मा कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजूमदार शॉ यांची गोष्टी खुप प्रेरणादायी आहे. त्या आज FORBES च्या जगातील १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत सामील आहेत, पण एक वेळ अशी होती की, त्यांना दुसऱ्या कंपन्यांनी नोकरी देण्यास नकार दिला होता. नोकरी न देण्याचे कारण होते त्या महिला असणे. पण निराश न होता त्यांनी १२०० रूपयांपासून स्वत:ची कंपनी सुरू केली आणि आज त्या 37 हजार कोटींच्या कंपनीच्या मालकिण आहेत.
बेंगळुरूमध्ये जन्म झालेल्या किरण यांनी १९७८ मध्ये ऑस्ट्रेलियामधून BREWING(ब्रूइंग) दारू बनवण्याच्या प्रक्रियेत मास्टर्सची डिग्री घेऊन भारतात वापस आल्या होत्या तेव्हा त्यांनी अनेक दारू बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये अप्लाय केले होते पण सगळ्या कंपन्यांनी त्या महिला असल्याचे कारण देउन त्यांनी नकार दिला होता. योग्यता असून देखील त्यांनी नोकरी मिळाली नाही त्यामुळे त्या स्कॉटलंडला गेल्या. तेथे त्यांनी ब्रूवरची नोकरी केली. तिथेच त्यांचे नशीब बदलले आणि बायोकॉनची सुरूवात झाली.
स्कॉटलंडमध्ये काम करताना त्यांची भेट आयरिश उद्योगपती लेस्ली औचिनक्लॉससोबत झाली. लेस्ली यांना भारतात फार्मास्युटिकल्स व्यवसाय सुरू करायचा होता. त्या किरण यांच्या कामातून खुप प्रभावित झाल्या आणि त्यांनी किरण यांना भारतात कंपनी सुरू करून पार्टनर होण्याची ऑफर दिली. सेस्ली यांचा प्रस्ताव पाहून किरण खुप हैराण झाल्या, कारण त्यांना व्यवसायाचा कोणताही अनुभन नव्हता आणि त्यांच्याकडे गुंतवण्यासाठी पैसेही नव्हते. पण तरीही लेस्ली यांनी किरण यांना पार्टनर होण्यास तयार केले आणि अशा रितीने १९७८ ला बायोकॉनची सुरूवात झाली.
किरण यांनी भारतात आपल्या व्यवसायाची सुरूवात 1200 रूपयांची गुतंवणुक करून एका गॅरेजमधून केली. नंतर त्यांना माणसे जोडायला खुप अडचणी आल्या कारण त्यावेळस एका महिलेसोबत काम करण्यास कोणीही तयार होत नसे, फक्त पुरूषच नाही तर महिलांनादेखील अशा कंपनीत काम करायचे नव्हेत ज्याची बॉस एक महिला आहे. अनेक लोकांनी इंटरव्ह्यू दिला पण कोणीही नोकरी देण्याच्या लायकीचा नव्हता त्यामुळे शेवटी त्यांनी एका रिटायर्ड गॅरेज मॅकेनिकला आपला पहिला कर्मचारी बनवले.
पैसे जमा करण्यात आल्या अडचणी – व्यवसायासाठी पैशांची जुळवाजुळव करणेदेखील कठिण होते. बँके पण एका २५ वर्षांच्या मुलीवर विश्वास ठेवायला तयार नवह्ती. काही काळानंतर एका महिलेने त्यांना कर्ज दिले आणि त्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर बायोकॉनला देशातील सगळ्यात मोठ्या फार्मा कंपनीच्या यादीत नेले. आज कंपनीचा मार्केट कॅप 37000 कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. किरण मजूमदार शॉ भारतातील एकट्या अशा बिझइनेसवुमन आहेत, ज्या आपल्या हिमतीवर अब्जाधीश झाल्या आहेत.
किरण मजूमदार शॉ आणि पति जॉन शॉ यांनी यूकेच्या ग्लासगो विद्यापीठाला जुलै २०१९ मध्ये ७५ लाख डॉलर (५२.५ कोटी रुपये) देणगी दिली आहेत. २०२० मध्ये किरण मजूमदार शॉ यांना ऑस्ट्रेलिया सरकारने आपला सर्वोच्च नागरिक सम्मान ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ ने सन्मानित केले आहे.
२०१० पर्यंत, TIME मासिकाच्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये मुझुमदार-शॉ यांचे नाव होते. 2011 फायनान्शियल टाईम्सच्या व्यवसायाच्या यादीत ती टॉप ५० महिलांमध्ये आहे. २०१४ पर्यंत, तिला फोर्ब्सने जगातील ९२ वी सर्वात शक्तिशाली महिला म्हणून सूचीबद्ध केले होते. २०१५ मध्ये, ती फोर्ब्सच्या क्रमवारीत ८५ व्या स्थानावर पोहोचली होती. २०१२ मध्ये तिला फार्मा लीडर्स मॅगझिनने जागतिक भारतीय म्हणून निवडले होते.
₹७२ कोटी (US$१० दशलक्ष) देणगीसाठी तिला हुरुन इंडिया फिलान्थ्रॉपी लिस्ट २०१९ मध्ये १४ वे स्थान देण्यात आले आणि हुरुन रिपोर्ट इंडिया फिलान्थ्रॉपी लिस्ट २०१९ द्वारे २०१९ च्या महिला परोपकारी यादीत २ क्रमांकावर होता.
जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील तिच्या कार्यामुळे तिला भारत सरकारकडून पद्मश्री (१९८९) आणि पद्मभूषण (२००५) यासह अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तिला २००४ मध्ये ‘बिझनेसवुमन ऑफ द इयर’ साठी इकॉनॉमिक टाइम्स पुरस्कार देण्यात आला. फार्मालीडर्स फार्मास्युटिकल लीडरशिप समिटमध्ये तिला “ग्लोबल इंडियन वुमन ऑफ द इयर” (२०१२) असे नाव देण्यात आले; तिला २००९ मध्ये “डायनॅमिक एंटरप्रेन्योर” साठी एक्सप्रेस फार्मास्युटिकल लीडरशिप समिट अवॉर्ड देखील मिळाला. इंडियन मर्चंट्स चेंबर डायमंड ज्युबिली एंडोमेंट ट्रस्टचा प्रतिष्ठित उद्योगपती पुरस्कार २००६ मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल एस. एम. कृष्णा यांच्या हस्ते किरण मुझुमदार-शॉ यांना प्रदान करण्यात आला. तिला इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड (२००५), अमेरिकन इंडिया फाउंडेशन (२००५) तर्फे ‘कॉर्पोरेट लीडरशिप अवॉर्ड’ देखील मिळाला आहे आणि कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार (२००२).
मुझुमदार-शॉ यांना २००४ मध्ये त्यांच्या अल्मा मॅटर, बल्लारट विद्यापीठाकडून बायोटेक्नॉलॉजीमधील योगदानाबद्दल मानद डॉक्टरेट मिळाली. तिला युनिव्हर्सिटी ऑफ एबर्टे, डंडी, यूके (२००७), युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो, यूके (२००८), हेरियट-वॅट युनिव्हर्सिटी, एडिनबर्ग, यूके (२००८) आणि युनिव्हर्सिटी कॉलेज कॉर्क, आयर्लंड (२००८) कडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील तिच्या योगदानाबद्दल तिला जुलै २०१३ च्या पहिल्या दीक्षांत समारंभात भारतातील दावणगेरे विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्राप्त झाली.
१९५३ : भारतातील प्रसिद्ध उद्योजिका व बायोकॉन या विख्यात औषध कंपनीच्या अध्यक्षा किरण मजूमदार-शॉ यांचा जन्म.
घटना :
१८३९: बोस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात ओ. के. या शब्दाचा पहिला छापील उपयोग झाला.
१८५७: न्यूयॉर्क शहरात पहिली लिफ्ट सुरू करण्यात आली.
१८६८: कॅलिफोर्निया विद्यापीठाची ओकलंड येथे स्थापना झाली.
१९१९: बेनिटो मुसोलिनी यांनी मिलान इटली मध्ये हुकूमशाही राजकीय चळवळ सुरूकेली.
१९३१: भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.
१९४०: संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत.
१९५६: पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.
१९८०: ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा प्रकाश पदुकोन यांनी पहिले भारतीय म्हणून जिंकली.
१९९८: अभिनेते दिलीपकुमार यांना निशान-ए-इम्तियाज हा पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
१९९९: पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना पद्मविभूषण सन्मानाने गौरविेण्यात आले.
१९९९: क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला.
२००१: रशियाचे मिर हे अंतराळ स्थानक पृथ्वीवर कोसळले.
२०२१ : आफ्रिका खंडातील देश नायजरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण गोळीबारामुळे एका गावाचे स्मशानात रुपांतर झाले. दुचाकीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन तासांत १३७ जण ठार झालेत. दहशतवाद्यांनी अनेक घरांनाही आग लावली.
• मृत्यू :
२००७: मराठी कथालेखक व कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी, १९१३)
२००८: मराठी चित्रपट अभिनेते गणपत पाटील यांचे निधन.
जन्म :
१९२९: भारतीय रेडिओ खगोलशास्त्रज्ञ गोविंद स्वरूप यांचा जन्म. (निधन: ७ सप्टेंबर २०२०)
१८८३: कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै यांचा जन्म. (मृत्यू: ६ सप्टेंबर १९६३)
१८९३: भारतीय व्यापारी गोपालस्वामी दुराईस्वामी नायडू यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९७४)
१८९८: आसामी कवयित्री आणि लेखिका नलिनीबाला देवी यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९७७)
१९१०: समाजवादी नेते आणि विख्यात संसदपटू डॉ. राममनोहर लोहिया यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९६७)
१९१६: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य हरकिशन सिंग सुरजित यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट २००८)
१९२३: क्रांतिकारक हेमू कलाणी यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९४३)
१९७६: भारतीय अभिनेत्री, निर्माता आणि राजकारणी स्मृती इराणी यांचा जन्म.
१९८७: अभिनेत्री कंगना रणावत यांचा जन्म.