अभियंता दिन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

शुक्रवार, सप्टेंबर १५, २०२३ युगाब्द : ५१२५
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर भाद्रपद २४ शके १९४५
सूर्योदय : ०६:२६
सूर्यास्त : १८:४१
चंद्रोदय : ०६:२९
चंद्रास्त : १९:०२
शक सम्वत : १९४५ शोभन
ऋतू : वर्षा
चंद्र माह : श्रावण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अमावस्या – ०७:०९ पर्यंत
नक्षत्र : उत्तराफाल्गुनी – पूर्ण रात्रि पर्यंत
योग : शुभ – ०३:४२, सप्टेंबर १६ पर्यंत
करण : नाग – ०७:०९ पर्यंत
द्वितीय करण : किंस्तुघ्न – २०:१५ पर्यंत
सूर्य राशि : सिंह
चंद्र राशि : सिंह – ११:३६ पर्यंत
राहुकाल : ११:०२ ते १२:३४
गुलिक काल : ०७:५८ ते ०९:३०
यमगण्ड : १५:३८ ते १७:०९
अभिजितमुहूर्त : १२:०९ ते १२:५८
दुर्मुहूर्त : ०८:५३ ते ०९:४२
दुर्मुहूर्त : १२:५८ ते १३:४७
अमृत काल : २३:३५ ते ०१:२२, सप्टेंबर १६
वर्ज्य : १२:५५ ते १४:४१

आज अभियंता दिन आहे

ज्ञान आणि विद्वत्ता याचे चालते बोलते विद्यापीठ : सरसंघचालक मा. सुदर्शनजी :-
सरसंघचालक होण्याअगोदर ते शाररिक प्रमुख होते. नंतर बौद्धिक प्रमुख आणि नंतर सह सरकार्यवाह होते.
भारतात प्रचलित असणाऱ्या जवळ जवळ सर्व भाषेत त्यांना सहजतेने बोलता यायचे आणि अनेक भाषा वर त्यांचे प्रभुत्व होते.
पूर्वांचल मध्ये आज खूप मोठा बदल दिसत आहे. एके काळी फुटीर चळवळी तेथे जोर धरत होत्या. घुसखोरीचा प्रश्न ,उल्फा चळवळ या सगळ्या काळात क्षेत्र प्रचारक म्हणून माननीय सुदर्शनजी यांनी केलेले काम आणि त्यांचे अनुभव त्यांच्या कडून ऐकताना एक मोठी प्रेरणा दायी गोष्ट असायची. पंजाब मध्ये शीख फुटीर चळवळ जोर धरत असताना” राष्ट्रीय शीख संगत ” या रूपाने समाजात शांत पणे हिंदू शीख ऐक्याची प्रक्रिया सुरू करताना त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. या दोन्ही समस्या आणि त्या वरील समाधान हा विषय मांडताना त्यांचा व्यासंग आणि त्यांची दूरदृष्टी या दोन्ही चा परिचय श्रोत्यांना होत असे.

पूजनीय सुदर्शन जी योगायोगाने चंद्रपूर येथे त्याच शाळेत शिकले जेथे पूजनीय गुरुजी शिकले आणि आताचे सरसंघचालक पूजनीय मोहनजी शिकले आहेत. त्या काळात इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन या विषयात पदवी घेतल्यावर ठरवले असते तर ते अत्यंत सुखाचे ,समृध्दी चे जीवन जगू शकले असते पण त्यांनी प्रचारक जाण्याचा निर्णय केला आणि त्यांच्यावर मध्य प्रदेश प्रांताची जबाबदारी आली. मग ईशान्य भारत ,उत्तर भारत असे क्षेत्र त्यांच्या कडे होते.

त्यांनी आपल्या कामाच्या पद्धतीतून संघाला तेथील वातावरण अनुकूल बनवलेच पण तेथील समस्या शोधून त्यावर उपाय शोधण्याचा पणं प्रयत्न त्यांच्या व्यासंगआणि बुद्धिमत्तेच्या जोरावर केला.

“भारतीय चर्च “ही कल्पना मांडून ख्रिश्चन धर्मगुरूंनी धर्मांतर न करता देशाच्या उभारणीत योगदान द्यावे म्हणून त्यांनी संवाद सुरू केला होता आणि त्यांच्या समोर बायबल वरचा त्यांचा अभ्यास उपस्थित धर्मगुरूंना अचंबित करणारा होता. या त्यांच्या अध्ययना मुळे सर्व पंथीय लोकात त्यांना खूप आदराचे स्थान होते.
संघाच्या ९५ वर्षाच्या वाटचालीत संघाच्या सरसंघचालकांनी आपल्या नेतृत्वात संघाचा हा रथ यशस्वीपणे पुढे नेला आणि त्यातूनच आज देशाची भाग्यरेषा बदलण्यास सुरुवात झाली आहे.

उथळ पणे संघावर आरोप करणाऱ्यांनी प्रामाणिक पणे जर ही जीवन चरित्रे अभ्यासली तर त्यांना संघ आणि संघ विचार हे समजणे सोपे जाईल आणि आम्हा स्वयंसेवकांना पण या जीवन चरित्राचे स्मरण करणे म्हणजे आपली संघ आयु बळकट करण्याचा मार्ग आहे.
पूजनीय सुदर्शनजींचा आज स्मृतिदिन !त्यांना नम्र अभिवादन !

• २०१२: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५वे सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांचे निधन. (जन्म: १८ जून १९३१)

सर मो. विश्वेश्वरैया – अभियांत्रिकीमध्ये स्नातक झाल्यावर,त्यांनी बॉम्बे (सध्याचे मुंबई) येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली.नंतर त्यांना भारतीय पाटबंधारे महामंडळ येथून निमंत्रण आले.त्यांनी, दख्खन क्षेत्रात पाटबंधाऱ्यांची एक अतीशय क्लिष्ट योजना राबविली.

त्यांनी ‘सांडव्याची स्वयंचलीत पूरनियंत्रण द्वार प्रणाली’ विकसीत केली व त्याचे पेटेंट घेतले जी सन १९०३ मध्ये पहिल्यांदा पुण्याजवळील खडकवासला धरणास लावण्यात आली. ही द्वारे,धरणातील साठ्याची पूरपातळी,पूर आल्यावर धरणास कोणताही धोका न होता, उच्चतम स्थितीस वाढविण्यास वापरण्यात आलीत.या द्वारांच्या कामात मिळालेल्या यशामुळे, ती टिग्रा धरण ग्वाल्हेर व कृष्णराज सागर धरण म्हैसूर येथे बसविण्यात आली. विश्वेश्वरैया यांनी हैदराबाद शहराचे पूरापासुन संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली त्याने त्यांना सत्कार मुर्ती झाले.विशाखापट्टणम बंदरास समुद्री पाण्यापासुन गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.

सर मो. विश्वेश्वरैया यांनी,कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरण बांधण्याच्या प्रस्तावापासुन ते उदघाटनापर्यंत सर्व कामांची देखरेख केली.या धरणाचे बांधकामाने,ते बांधल्या गेल्याच्या वेळचे,आशियातील सर्वात मोठे सरोवर निर्माण झाले. त्यांना यामुळे, ‘म्हैसूर राज्याचे पिता’ म्हणून ओळखले जायचे.त्यांचे म्हैसूर राज्याचे नोकरीदरम्यान,त्यांनी सरकारच्या नियंत्रणा खालील म्हैसूर सोप फॅक्टरी,,किटकनाशक प्रयोगशाळा,भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्,श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट,बंगलोर ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी,स्टेट बॅंक ऑफ मैसुर,सेंचुरी क्लब,मीसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे अगणीत औद्योगीक प्रकल्प सुरु केले. त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर दिला.ते, प्रामाणीकपणा, वेळेचे नियोजन,व एखाद्या कामात पूर्ण समर्पणासाठी ओळखले जात होते. तिरुमला-तिरुपती दरम्यानच्या रस्तेबांधणीतहेए त्यांनी योगदान केले.
भारतात, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी, १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो.

१८६१: भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल१९६२)

घटना :
१८१२ : नेपोलियन बोनापार्टचे नेतृत्वाखाली फ्रेंच सैन्य मॉस्को मधील क्रेमलिनला येऊन धडकले
१८२१ : कोस्टारिका, gwtemala , होंडुरास, निकाराग्वा , या देशांचा स्वातंत्र्य दिन
१९१६ : पहिल्या महायुद्धात पहिल्यांदाच रणगाड्यांचा वापर झाला
१९३५ : भारताचे पहिले पब्लिक स्कुल द डून स्कुल सुरु झाले
१९३५ : जर्मन देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले.
१९४८ : भारतीय सैन्याने निजामाचे वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले
१९४८ : F – ८६ sebrjet प्रकारच्या विमानाने ताशी १०८० किमी गती गाठून विक्रम प्रस्थापित केला
१९५३ : श्रीमती विजय लक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून निवड झाली.

१९५९ : दिल्ल्ली च्या उपनगरात काही नागरिक जमा झाले होते.त्यात शेतकरी,कामगार आणि काही विद्यार्थी होते .

एका छोट्या पडद्यावर रस्त्यावरील नियम कसे पाळायचे ,किफायतशीर शेती कशी करायची,कारखान्यात सुरक्षा कशी राखायची हे एका छोट्या पडद्यावर दाखवले जात होते , त्या हलणाऱ्या प्रतिमा ,बोलणारी माणसे पाहण्यात नागरिक दंग झाले होते तो दिवस होता १५ सप्टेंबर,१९५९ .
आज दूरदर्शनचा वर्धापनदिन म्हणजेच भारतात दूरदर्शन प्रक्षेपण सुरु झाले. प्रायोगिक तत्वावर भारतात दूरदर्शन सेवा सुरु झाली
१९६८ : सोव्हिएत संघाच्या ZOND 5 या अंतराळ यानाचे प्रक्षेपण
२००८ : लेहमन ब्रदर्स या अमेरिकन वित्तीय संस्थेने इतिहासातील सर्वात मोठी दिवाळखोरी जाहिर केली

• मृत्यू :
• १९९८: गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक विश्वनाथ लवंदे यांचे निधन.
• २००८: साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचे निधन. (जन्म: २५ ऑगस्ट १९२३)

• जन्म :
१८७६: बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९३८)
१९०५: नाटककार, समीक्षक व हिंदी कवी राजकुमार वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९९०)
१९०९: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९६९)
१९०९: स्वा. सैनिक, सहकारी चळवळीतील नेते रत्नाप्पा कुंभार यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९९८)
१९२१: रंगभूमी अभिनेते कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर २००६)
१९२६: विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचा आग्रा येथे जन्म. (मृत्यू : १७ नोव्हेंबर, २०१५ )
१९३५: सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक दगडू मारुती तथा दया पवार यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९९६)
१९३९: अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ सुब्रमण्यम स्वामी यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »