पुणे कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज गुरुवार, जून १९, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ दिनांक २९ , शके १९४७
सूर्योदय : ०६:०२
सूर्यास्त : १९:१८
चंद्रोदय०१:१८, जून २०
चंद्रास्त१३:०८
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : ज्येष्ठ
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अष्टमी – ११:५५ पर्यंत
नक्षत्र : उत्तराभाद्रपदा – २३:१७ पर्यंत
योग : सौभाग्य – ०२:४६, जून २० पर्यंत
करण : कौलव – ११:५५ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – २२:५५ पर्यंत
सूर्य राशि : मिथुन
चंद्र राशि : मीन
राहुकाल : १४:२० ते १५:५९
गुलिक काल : ०९:२१ ते ११:००
यमगण्ड : ०६:०२ ते ०७:४१
अभिजित मुहूर्त : १२:१३ ते १३:०६
दुर्मुहूर्त : १०:२७ ते ११:२०
दुर्मुहूर्त : १५:४६ ते १६:३९
अमृत काल : १८:४२ ते २०:१३
वर्ज्य : ०९:३२ ते ११:०४

एखाद्याच्या जवळची व्यक्ती मरण पावते तेव्हा त्यांचं सांत्वन कसं करावं हे आपल्याला कळत नाही. कधीकधी अशा वेळी नेमकं काय बोलावं आणि काय करावं हेच आपल्याला सुचत नाही. त्यामुळे कित्येकदा काही न करता आपण गप्पच बसतो. पण अशा वेळी वेगवेगळ्या मार्गाने आपण त्यांची व्यावहारिक मदत करू शकतो.

अशा वेळी तुम्ही फक्त त्यांच्यासोबत असणं आणि “जे झालं त्याचं मला फार दुःख वाटतं” एवढे शब्द बोलणंही पुरेसं असतं. काही संस्कृतीत, दुःखी व्यक्तीला मिठी मारणं किंवा त्यांच्या खांद्यावर हात ठेवणं यानेही त्यांच्याबद्दल काळजी दाखवली जाते. जेव्हा ते बोलत असतात तेव्हा त्यांचं बोलणं सहानुभूतीने ऐका.

कित्येकदा दुःखात बुडालेल्या कुटुंबाला रोजची कामं करणंदेखील जड जाऊ शकतं. अशा वेळी आपण त्यांच्यासाठी जेवण बनवू शकतो, त्यांच्या मुलांना सांभाळू शकतो किंवा अंत्यविधीच्या तयारीसाठी काही मदत लागली तर त्यातसुद्धा हातभार लावू शकतो. चांगल्या शब्दांपेक्षा आपण केलेली मदत जास्त सांत्वनदायक ठरेल.

आज जागतिक सांत्वन दिन आहे.

गुरु हरगोविंद – (पंजाबी उच्चार: हरगोबिंद) हे शीख धर्मातले सहावे गुरु होते. त्यांचा जन्म १९ जुन १५९५ रोजी गुरु कि वडाली येथे झाला. ते शिखांचे पाचवे गुरु अर्जुनदेव यांचे पुत्र होते.

शिखांचा पंजाब आणि आसपासच्या प्रांतातला वाढत प्रभाव पाहुन मोगल बादशाह जहांगीर याने गुरु अर्जुनदेव यांना अटक केली. त्यांना इस्लाम स्वीकारण्यास सांगितले. त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांना छळ करून मृत्युदंड दिला.
अर्जुनदेव यांनी कारावासात असतानाच आपल्या मुलास म्हणजे हरगोविंद यांना ते फक्त ११ वर्षाचे असताना पुढचा गुरु म्हणुन नेमले. त्यासोबतच त्यांना आता स्वतः सुरक्षेसाठी शस्त्र हातात घेऊन नेहमी स्वतः जवळ शीख अंगरक्षक ठेवावेत असे सांगितले.

त्यानुसार गुरु हरगोविंद यांनी शीख समुदायात शस्त्रांचे प्रशिक्षण घेऊन स्वतःचे आणि समाजाचे रक्षण करण्यास सिद्ध होण्यास प्रोत्साहन दिले. त्यांनी स्वतः दोन तलवारी धारण केल्या. ह्या मिरी आणि पिरि शक्तीचे प्रतीक होत्या. मीर आणि पीर या शब्दावरून हे शब्द आले. मिरी म्हणजे भौतिक जगातली शक्ती, पिरि म्हणजे अध्यात्मिक जगातली शक्ती.
या दोन तलवारी प्रतीकात्मक होत्या. त्यांच्या अनुयायांनी भौतिक आणि अध्यात्मिक अशा दोन्ही प्रकारे सामर्थ्य मिळवावे असा त्यांचा संदेश होता.
त्यांनी अमृतसरच्या हरमंदिर साहिब गुरुद्वाऱ्यासमोर अकाल तख्तची स्थापना केली. इथे बसुन ते न्याय निवाडे करायचे, लोकांचे प्रश्न सोडवायचे.

जहांगीराने त्यांनासुद्धा अटक करून काही वर्ष तुरुंगात ठेवले होते. त्यांना अटक करण्यासाठी गुरु अर्जुनदेवांना पकडले तेव्हा त्यांना केलेला दंड त्यांनी भरलाच नाही असा बहाणा केला होता. पण नंतर मात्र त्यांची सुटका झाली.

जहांगीरानंतर त्याच्या गादीवर आलेला शहाजहान यानेसुद्धा शिखांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्याने गुरूंना मारण्याऐवजी शीख समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला.
गुरु हरगोविंद यांचा मुलगा बाबा गुरदित्ता यांचे निधन झाले. तेव्हा त्यांचा मोठा मुलगा म्हणजे गुरु हरगोविंद यांचा नातु धिरमल याला आपल्या बाजूने वळवण्यासाठी त्याला जमिनींचे इनाम दिले. तोच पुढे गुरु होईल आणि मग शिखांना नियंत्रित करता येईल अशी त्याची अटकळ होती.

गुरु हरगोविंद यांनी मात्र त्याचे प्रयत्न फोल ठरवले. त्यांनी धिरमल ऐवजी त्याचा धाकटा भाऊ हरराय याची पुढचा गुरु म्हणुन निवड केली.

१५९५ : गुरु हरगोविंद यांचा जन्म ( मृत्यू : २८ फेब्रुवारी १६४४ )

पाटील पांडुरंग चिमणाजी: महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कृषितज्ञ. जुन्या मुंबई राज्याचे पहिले भारतीय कृषी संचालक व पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य. त्यांनी कृषी अर्थशास्त्र या विषयात महत्त्वाचे कार्य केलेले आहे. त्यांचा जन्म कोल्हापूर संस्थानातील वडगाव येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे झाले.१९०५ साली शेतकीची एल्.एजी. ही पदवी परीक्षा ते प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुण्याच्या कृषी महाविद्यालयात त्यांची कृषिक्षेत्र अधिक्षक म्हणून नेमणूक झाली. पुढे १९०८ साली ते डेक्कन विभागाचे कृषी निरीक्षक झाले.

१९१२ मध्ये इंग्लंड, डेन्मार्क इ. देशांतील शेतीची पाहणी व अभ्यास करण्यासाठी त्यांना सरकारतर्फे पाठविण्यात आले. १९१४ साली कृषी विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांनतर कृषी अर्थशास्त्र या विषयाचा अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात अभ्यास करून त्यांनी १९२२ मध्ये एम्.एस्सी. पदवी मिळविली. ब्रिटिश सरकारने १९२४ मध्ये त्यांना रावबहादूर हा किताब दिला.

१९२५ साली पुण्याच्या कृषी महाविद्यालयात कृषी अर्थशास्त्र या विषयाची स्वतंत्र शाखा सुरू करण्यात येऊन पाटील यांची या विषयाचे पहिले प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याच वेळी ते कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही काम करीत होते व या महविद्यालयाला कृषी संशोधन संस्थेचे स्वरूप देण्यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली. ते मुंबई विद्यापीठाचे फेलो व काही वर्षे विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य होते. त्यांनी कृषी अर्थशास्त्राविषयी लिहिलेल्या संशोधनात्मक प्रबंधाला मान्यता देऊन मुंबई विद्यापीठाने त्यांना डी. एस्सी.ही पदवी व मूल सुवर्णपदक सन्मानपूर्वक दिले. १९३२ साली सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी ग्वाल्हेर संस्थानात कृषी, सहकार व विकास यांच्या पाहणीसाठी नेमलेल्या आयोगावर काम केले.

१९४१–४५ या काळात ते कोल्हापूर संस्थानाच्या राजप्रतिनिधी मंडळात शिक्षण, शेती, पशुसंवर्धन, सहकार व स्थानिक स्वराज्य या खात्यांचे मंत्री होते. त्या वेळी त्यांनी शिक्षण, शेती व सहकार या क्षेत्रांत बऱ्याच उपयुक्त सुधारणा घडवून आणल्या. मुंबई सरकारने नेमलेल्या मूलोद्योग शिक्षण समितीवर त्यांनी काम केले आणि त्या वेळी मूलोद्योग शिक्षणातील शेतीच्या शिक्षणाचे महत्त्व त्यांनी आवर्जून प्रतिपादन केले. त्यांच्या शताब्दी नंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कोल्हापूर येथे त्यांना त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ सन्माननीय डी. लिट्. ही पदवी खास समारंभपूर्वक अर्पण केली.

पाटील यांनी १९०८ मध्ये कृषी निरीक्षक म्हणून नेमणूक झाल्यावर शेतीच्या नव्या अवजारांच्या व शेतीविषयक नव्या संशोधनाच्या प्रचारकार्यास प्रारंभ केला. त्यांनी नव्या अवजारांच्या बरोबरच नव्या खतांचा व बियाणांचाही प्रचार केला. लोखंडी नांगर व इतर औतांच्या प्रत्यक्ष चाचण्या घेऊन त्यांत आवश्यक त्या सुधारणा सुचवून व त्याप्रमाणे किर्लोस्कर आदि कारखान्यांकडून सुधारित औते तयार करवून घेऊन त्यांचा शेतकऱ्यांमध्ये त्यांनी प्रसार केला. त्यांनी ‘रुंद सरीची मांजरी पद्धत’ ही उसाच्या लागवडीची नवीन पद्धत शोधून काढली व आज जवळजवळ सर्व महाराष्ट्रात हीच पद्धत वापरात आहे. किफायतशीरपणे मोठ्या प्रमाणावर गूळ तयार करण्यासाठी यांत्रिक चरकांचा व एकत्रित असलेल्या अनेक चुलाणांचा वापर त्यांनी सुरू केला. १९१९ साली अहमदनगर जिल्ह्यात बेलापूर येथे उभारण्यात आलेल्या साखर कारखान्याच्या उभारणीत पाटील यांच्या ऊसविषयक संशोधनाचा मोठा वाटा होता.

कृषी अर्थशास्त्रीय संशोधनावर आधारित अशा ४-५ पुस्तिका त्यांनी प्रसिद्ध केल्या. याशिवाय त्यांनी क्रॉप्स ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी वुइथ देअर जिऑग्राफी अँड स्टॅटिस्टिक्स (१९२१), फुड प्रॉब्लेम ऑफ इंडिया इन जनरल अँड कोल्हापूर स्टेट इन पर्टिक्युलर (१९४८), रिजनल सर्व्हे ऑफ इकाॅनॉमिक रिसोर्सेस, इंडिया, कोल्हापूर (१९४८) इ. ग्रंथही त्यांनी लिहिले. विविध क्षेत्रांतील आपले अनुभव त्यांनी माझ्या आठवणी (१९६४) या आत्मचरित्रपर ग्रंथात विशद केले आहेत.

मराठा समाजाची संघटना व्हावी व त्याचात शिक्षणाचा प्रसार व्हावा याकरिता त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. सत्यशोधक समाज, शिवाजी मराठा सोसायटी, डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी, रयत शिक्षण संस्था इ. अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ते कोल्हापूर येथे मृत्यू पावले.

१८७७: पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील यांचा जन्म. (मृत्यू:७ ऑगस्ट १९७८)

  • घटना :
    १६७६: शिवाजी महाराजांनी प्श्चात्त्पादग्ध सरनोबत नेताजी पालकर यांना विधीपूर्वक शुद्ध करून हिंदू धर्मात पुन्हा समाविष्ट केले.
    १८६२: अमेरिकेने गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली.
    १८६५: अमेरिकेतील गॅल्व्हेस्टन येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून जून्टीन्थ या नावाने साजरा केला जातो.
    १९१२: अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.
    १९४९: चार्लोट मोटर स्पीडवे येथे पहिल्यांदा नासकारची स्पर्धा आयोजित केली गेली.
    १९६१: कुवेतला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.
    १९६६: शिवसेनेची स्थापना.
    १९७७: ट्रान्स अलास्कन पाइपलाइन मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.
    १९७८: गारफील्डया कार्टून व्यक्तिमत्त्वाचे वर्तमानपत्रात पदार्पण.
    १९८१: भारताच्या ‘अॅपल’ उपग्रहाचे प्रक्षेपण.
    १९९९: मैत्रेयी एक्स्प्रेस या कोलकाता ते ढाका बस सेवेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी उद्घाटन केले.

• मृत्यू :

• १९३२: मराठी संतवाङमयाचे अभ्यासक आणि प्रचारक रेव्ह. जस्टिन एडवर्ड यांचे निधन.
• १९४९: भारतीय तत्त्वज्ञ सैयद जफरुल हसन यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी१८८५)
• १९९६: समाजसेविका कमलाबाई पाध्ये यांचे निधन.
• १९९८: प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक रमेश मंत्री यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी ,१९२५)
• २०००: मराठी- हिंदी रंगभूमी चित्रपट अभिनेत्री माणिक मुदलियार तथा माणिक कदम यांचे निधन.
• २००८: बंगाली पत्रकार बरुण सेनगुप्ता यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी, १९३४)

  • जन्म :
    १५९५: सहावे सिख गुरु गुरु हर गोविंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च , १६४४)
    १९३५ : रा.स्व. संघाचे केंद्रीय अधिकारी, डॉ . श्रीपती शास्त्री यांचा जन्म ( मृत्यू : २७ फेब्रुवारी, २०१० )
    १९७०: राहुल गांधी यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »