पेट्रोल, डिझेल दोन रुपयांनी स्वस्त

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारच्या अख्त्यारीतील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात केली आहे. नवे दर १५ मार्च २०२४ रोजी सकाळी सहा वाजल्यापासून लागू होतील.

यंदाचा ऊस गळीत हंगाम शेवटच्या टप्प्यात असल्याने, साखर उद्योगाला या निर्णयाचा फायदा होणार नाही.

नवे दर पावणदोन ते सव्वा दोन रुपयांनी कमी असतील. पेट्रोलियम कंपन्यांनी १४ मार्च रोजी रात्री याबाबत घोषणा केली. पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ‘मोदी का परिवार’ अशी टॅगलाइन टाकत या निर्णयाचे समर्थन केले आहे.

युक्रेन – रशिया युद्धामुळे जगभरात पेट्रोलियमचे दर वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर डिझेल आणि पेट्रोलचे दर गेल्या दोन वर्षात कमी करणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे, असे पुरी यांनी म्हटले आहे.

नव्या दरानुसार मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर १०६.३१ रुपयांवरून १०४,२१ पर्यंत कमी असतील. दिल्लीत ९६.७२ वरून ९५.७२ एवढे कमी असतील.
डिझेलरचे दर मुंबईत ९४.२७ रुपयांवरून ९२.१५ रुपये एवढे कमी करण्यात आले आहेत, तर नवी दिल्लीत ८९.६२ वरून ८७.६२ अशी दरकपात करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे महागाईवर नियंत्रणात राहील, तसेच शेतकऱ्यांचा शेतीवरील खर्च कमी होण्यास मदत होईल, असा दावा पेट्रोलियम मंत्रालयाने केला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »