
शेतकऱ्यानो सावधान
Original price was: ₹30.00.₹25.00Current price is: ₹25.00.
आयएएस शेखर गायकवाड यांच्या लेखणीतून, शेती आणि कायदा – शेतकऱ्याना जागे करणारी माहिती
आपल्या कृषिप्रधान देशात खुल्या अर्थव्यवस्थेचे वारे वाहत असताना आणि गॅट करारामुळे संपूर्ण जग ही एक बाजारपेठ होत असताना प्रचंड कष्ट करून व त्याला प्रगत कृषिशास्त्राची साथ मिळूनसुद्धा सामान्य शेतकऱ्याची आर्थिक उन्नती ही चढत्या महागाईत उतरती होत आहे. चीन व जपान या देशातील शेतीच्या प्रगतीचे एक रहस्य म्हणजे शेतीच्या तंत्रापासून ते संबंधित कायद्यापर्यत सर्व बाबी या देशांनी प्रथम मातृभाषेत लिहून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या.
श्री. शेखर गायकवाड यांच्या मध्ये कृषिशास्त्रातील ज्ञान, महसूल खात्यातील अनुभव आणि त्यांचा शेतकरी कुटुंबाचा जन्मजात वारसा, यांचा सुरेख त्रिवेणी संगम झालाय. नोकरीतील बहुविध अनुभवातून शेतकऱ्याला नेहमी लागणाऱ्या कायदेशीर ज्ञानाचे छोट्या छोट्या मुद्यांवरील स्पष्टीकरण फारच उपयुक्त आहे.






Reviews
There are no reviews yet.