‘भीमा पाटस’ चे पैसे कुल यांनी खाल्ले : संजय राऊत
पुणे : भीमा पाटस कारखान्यात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करत, आमदार राहुल कुल यांनी छोट्या-छोट्या व्यवहारातही पैसे खाल्ले, त्यांना मी सोडणार नाही, सीबीआयकडे तक्रार केलीच आहे, इडी आणि कोर्टातही जाऊ, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जाहीर सभेत दिला.
वरवंड (ता. दौंड) येथे शेतकरी कृती समितीच्या मेळाव्यात राऊत बोलत होते.
हा भ्रष्टाचाराचा लढा मी थांबवणार नाही. २०२४ साली महाराष्ट्रात आमचंच सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला कोण वाचवतो हेच पाहतो. आपण केलेल्या ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार पचू देणार नाही, असे राऊत म्हणाले.
माजी आमदार रमेश थोरात म्हणाले की, कुल यांनी भीमा पाटस कारखान्यांत भ्रष्टाचार केला आहे, परंतु एका ट्रॅक्टरवर पाच बँकांचे कर्ज घेऊन मोठी फसवणूक केलेली आहे. त्यामुळे जनता या लोकांना माफ करणार नाही.
आमदार रवींद्र धंगेकर, भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष नामदेव ताकवणे यांनीही कुल यांच्यावर जहरी टीका केली.
यावेळी सरपंच मीनाक्षी दिवेकर, अप्पासाहेब पवार, गुरुमुख नारंग, सोहेल खान, शरद सूर्यवंशी, माऊली शिंदे, योगिनी दिवेकर आदी उपस्थित होते.