‘राजाराम’वर महाडिकांचीच सत्ता

चुरशीच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या पॅनलचा पराभव
कोल्हापूर – अत्यंत चुरशीने झालेल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी छत्रपती शाहू सहकार आघाडीने सर्व २१ जागा जिंकत कारखान्याची सत्ता कायम राखली.
माजी मंत्री आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचा दारूण पराभव झाला. महाडिक गटाने सतेज पाटील गटाला सलग तिसऱ्यांना पराभूत केले आहे.
विजयानंतर महादेवराव महाडिक, अमल महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. महाडिक यांनी आपल्या खास स्टाइलने शिट्टी वाजवत जल्लोष केला.
अनेक आरोप-प्रत्यारोपाने गाजलेल्या आणि टोकाची ईर्ष्या निर्माण झाल्यामुळे राजाराम कारखान्याच्या निवडणूक निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. 91.12 टक्के मतदान झाल्याने निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
दोन फेर्यांमध्ये मतमोजणी झाली. पहिल्या फेरीत 1 ते 29 तर दुसर्या फेरीत 30 ते 58 मतमोजणी केंद्रावरील मत मोजणी झाली. पहिल्या फेरीतील उत्पादक गट क्रमांक एकची मोजणी सकाळी साडेदहाच्या सुमारास पूर्ण झाली. यामध्ये सत्ताधारी आघाडीचे उमेदवार 800 हून अधिक मतांनी आघाडीवर राहिले.
पहिल्या फेरीतील उत्पादक गट क्रमांक 2 मधील सत्ताधारी आघाडीचे उमेदवार 800 हून अधिक मतांनी आघाडीवर होते. यानंतर गटनिहाय मतमोजणी सुरू राहिली. दुपारी दीडपर्यंत पहिल्या फेरीतील सर्व मतमोजणी पूर्ण होऊन सत्तारूढ आघाडीचे सर्व उमेदवार 624 ते 844 मतांनी आघाडीवर राहिले.
संस्था गटात केवळ 128 मतदान झाले होते. मतपत्रिकांचे 50 चे गठ्ठे करत असतानाच काहींनी छायाचित्रे, त्याचबरोबर चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. याला निवडणूक अधिकार्यांनी आक्षेप घेतला. यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली.
अवघ्या दहा मिनिटांत दोन वाजून दहा मिनिटांनी संस्था गटाचा निकाल जाहीर झाला. संस्था गटातून सलग सहा वेळा निवडून येत असलेले माजी आ. महादेवराव महाडिक यांनी पुन्हा एकदा या गटात वर्चस्व सिद्ध केले. या गटातून महादेवराव महाडिक 39 मतांनी विजयी झाले.
माजी पालकमंत्र्यांना चपराक -धनंजय महाडिक, खासदार
माजी पालकमंत्र्यांनी केवळ द्वेषभावनेतून ही निवडणूक लादली. प्रचार करण्याऐवजी त्यांनी वैयक्तिक आणि हीन पातळीवरची टीका केली. त्यामुळेच राजाराम कारखान्याच्या सभासदांनी माजी पालकमंत्र्यांना चपराक लगावली आहे. राजकारण, भ्रष्टाचार आणि डोनेशनमधून मिळविलेला पैसा विरोधकांनी राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत पाण्यासारखा ओतला. परंतु, त्याला न भाळता स्वाभिमानी सभासदांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवली.
जास्त दर देऊ – अमल महाडिक, माजी आमदार
विरोधकांनी कितीही चिखलफेक केली, तरी सभासदांचा माजी आ. महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे, हेच आजच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. येणाऱ्या पाच वर्षांत शब्द दिल्याप्रमाणे गाळप विस्तारीकरण आणि को-जनरेशन उभारून सभासदांना निश्चितपणे जास्तीत जास्त दर देऊ. या लढ्यामध्ये आ. विनय कोरे, आ. प्रकाश आवाडे, खा. धैर्यशील माने, आ. राजेंद्र पाटील- यड्रावकर, राजू शेट्टी यांची मदतही मोलाची ठरली.
खुनशी राजकारणाचा कंटाळा – शौमिका महाडिक, संचालक, गोकुळ
कसबा बावड्यामध्ये आम्हाला मिळालेली मते म्हणजे बावड्याच्या स्वाभिमानी लोकांनाही सतेज पाटील यांच्या खुनशी राजकारणाचा कंटाळा आला असल्याचे दिसून येते. शिरोलीकरांनी तर सतेज पाटील यांना मोठी चपराक लगावली असून त्यांनी यापुढे शिरोली आणि बावडा असा वाद लावण्याचा निरर्थक प्रयत्न करू नये..
\\
आत्मपरीक्षण करू -सतेज पाटील, आमदार
सभासदांनी दिलेला कौल मान्य करतो. पराभवाबद्दल आम्ही आत्मपरीक्षण करू. सभासदांना परिवर्तन हवे होते. परंतु केवळ मतदानासाठी नोंदविण्यात आलेले दोन हजारांवर सभासद आणि आमच्या प्रमुख २८ उमेदवारांचे छाननीत अपात्र ठरविण्यात आलेले अर्ज याचा फटका आम्हाला या निवडणुकीत बसला. दोन हजार वाढीव सभासद करूनही त्यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही, ही वस्तुस्थिती आहे. बोगस आधारकार्डद्वारे या निवडणुकीत मतदान झाले आहे. यासंदर्भात आम्ही तक्रार करणार आहे. निवडणुकीत पैशाचे वाटप झाले की नाही हे माझ्यापेक्षा महाडिकच अधिक सांगू शकतील.
अर्ज बादचा फटका – ऋतुराज पाटील, आमदार
कारखान्याची प्रगती आणि सभासदांच्या हिताची भूमिका घेऊन आम्ही या निवडणुकीत ऊस उत्पादक सभासदांसमोर गेलो. आपण स्वतः सात हजार सभासदांशी संपर्क साधला. लोकांचा प्रतिसादही चांगला होता. परंतु, ताकदीच्या उमेदवारांचे अर्ज छाननीत अपात्र ठरले. त्याचा परिणाम झाला. सभासदांनी दिलेला कौल मान्य आहे. यापुढेही सभासदांच्या हिताची भूमिका घेऊन राजाराम कारखान्याच्या विकासासाठी काम करत राहू.
निकाल असा…
उत्पादक गट नंबर १ :
एकूण मते : १२२०८
वैध मते : १२१०१, अवैध मते : १०७,
- विजयी.
विजय वसंत भोसले (रुकडी) ६८०३,
संजय बाळगोंडा मगदुम (रुई) ६६५१,
पराभूत - शालन बाबुराव बेनाडे (रुई) ५२९४,
किरण बाबासो भोसले (रुकडी) ५२३६.
उत्पादक गट नंबर २
- विजयी
शिवाजी रामा पाटील (लाटवले) ६६९२, - सर्जेराव बाबुराव भंडारे (नरंदे) ६५९८,
- अमल महादेवराव महाडिक (पेठवडगाव) ६९६३.
- पराभूत
- शिवाजी ज्ञानू किबीले (कुंभोज) ५०२३,
- दिलीप गणपतराव पाटील (टोप) ५१११,
- अभिजित सर्जेराव माने (भेंडवडे) ४७७५.
उत्पादक गट नंबर ३ :
विजयी
- मारुती भाऊसो किडगावकर (निगवे दु.) ६७६०,
- विलास यशवंत जाधव (शिये) ६५४८,
सर्जेराव कृष्णात पाटील – बोणे (वडणगे) ६४४६, - पराभूत
बळवंत रामचंद्र गायकवाड (आळवे) ४८६०, • विलास शंकर पाटील (भुये) ४८७५, - विठ्ठल हिंदूराव माने (वडणगे) ५०८५..
उत्पादक गट नंबर ४
विजयी
- तानाजी कृष्णा पाटील (मुडशिंगी) ६६३६
- दिलीपराव भगवान पाटील (पु. शिरोली) ६६६५
- मीनाक्षी भास्कर पाटील (वाशी) ६५९३
पराभूत - दिनकर भिवा पाटील ४७३१
- सुरेश भिवा पाटील ५२१८
- संभाजी शंकरराव पाटील (सर्व वाशी) ५०६०
उत्पादक गट नंबर ५
विजयी
- दिलीप यशवंत उलपे ६७४२
- नारायण बाळकृष्ण चव्हाण ६५४५
पराभूत - नेजदार विजयमाला विश्वास (माने) ५३५५
- सालपे मोहन रामचंद्र ५०८५
- अपक्ष : विजय रामकृष्ण चव्हाण ६६ (सर्व कसबा बावडा)
उत्पादक गट नंबर ६
विजयी
- गोविंद दादू चौगले (सो. शिरोली) ६७५५
- विश्वास सदाशिव बिडकर (धामोड) ६६१०
पराभूत - दगडू मारुती चौगले (धामोड) ५२७७
- शांताराम पांडुरंग पाटील (सावर्धन) ५२०६
महिला राखीव : एकूण मते : १२३३६
वैध मते : १२२२४ अवैध मते : ११२
विजयी
- वैष्णवी राजेश नाईक (कांडगाव) ६८३७
- कल्पना भगवानराव पाटील (टोप) ६८१२
पराभूत
निर्मला जयवंत पाटील (निगवे दु.) ५३२७
पुतळाबाई मारुती मगदुम (कांडगाव) ५२२६
इतर मागास प्रतिनिधी :
एकूण मते : १२३३६
वैध मते : १२२१२ अवैध मते : १२४
विजयी
- संतोष बाबूराव पाटील (यवलूज) ६८७०
पराभूत - मानसिंगराव दत्तू खोत (नरंदे) ५३४२
अनुसूचित जाती जमाती :
एकूण मते : १२३३६
वैध मते : १२०१७ अवैध मते : ११२
विजयी
नंदकुमार बाबूराव भोपळे (चोकात) ६५१९
पराभूत
- बाबासो थळोजी देशमुख (पु. शिरोली) ५३७२
- अपक्ष: दिगंबर लिंगाप्पा पोळ (वडगाव) ४३
भटक्या जाती विमुक्त जमाती :
एकूण मते : १२३३६
वैध मते : १२२२४ अवैध मते : ११२
विजयी
- सुरेश देवाप्पा तानगे (कुंभोज ) ६८८४
- पराभूत
- अण्णा विठू रामाण्णा धनगर (प. कडोली) ५३४०
संस्था गट :
एकूण मते : १२८, वैध मते : १२७ अवैध : १
महादेवराव रामचंद्र महाडिक
(पु. शिरोली) ८३ (विजयी)
पराभूत :
सचिन नरसगोंडा पाटील (वसगडे) ४४
विजयी उमेदवार

