राजारामबापू कारखान्याची निवडणूक बिनविरोध
इस्लामपूर : माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजारामबापू साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली.
कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पी. आर. दादा पाटील हे यावेळी निवडणूक रिंगणाबाहेर राहिले. ते कारखान्याचे तब्बल ५१ वर्षे संचालक आणि २५ वर्षे चेअरमन होते. आता नवा चेअरमन कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमदार पाटील यांनी अर्ज काढून घेत, त्यांचे पुत्र प्रतीक यांना संधी दिली. अन्य १७ उमेदवारांनी शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
प्रतीक यांच्यासह तरुण, उच्चशिक्षित अशा १३ नव्या चेहऱ्यांची संचालक मंडळात एन्ट्री झाली आहे. तर जुन्या ८ संचालकांना पुन्हा संधी मिळाली.
बिनविरोध निवड झालेले गटवार संचालक :
इस्लामपूर गट क्र. १ :
प्रताप शामराव पाटील (तांदूळवाडी), शैलेश शामराव पाटील (इस्लामपूर),
बोरगाव
गट क्र.२ ः विजयराव बळवंत पाटील (साखराळे), विठ्ठल भगवान पाटील (बहे), कार्तिक मानसिंगराव पाटील (बोरगाव), आष्टा
गट क्र.३ :
प्रदीपकुमार विश्वासराव पाटील (शिगाव), रघुनाथ पांडुरंग जाधव (आष्टा), बबन जिनदत्त थोटे (आष्टा), कुरळप
गट क्र. ४ :
रामराव ज्ञानदेव पाटील (कार्वे), दीपक पांडुरंग पाटील (कुरळप), अमरसिंह शिवाजीराव साळुंखे (करंजवडे), पेठ
गट क्र. ५ :
प्रतीक जयंत पाटील (कासेगाव), अतुल सुधाकर पाटील (पेठ), कुंडल गट क्र.
गट क्र.६ :
सतीश ऊर्फ दादासाहेब यशवंत मोरे (रेठरेहरणाक्ष), प्रकाश रामचंद्र पवार (कुंडल).
ब वर्ग संस्था गट : देवराज जनार्दन पाटील (कासेगाव), अनुसूचित जाती : राजकुमार वसंत कांबळे (इस्लामपूर),
महिला राखीव गट :
मेघा मधुकर पाटील (शिगाव), डॉ. योजना सचिन शिंदे (कणेगाव),
भटक्या विमुक्त जाती-जमाती गट :
अप्पासो विष्णू हाके (कारंदवाडी),
इतर मागासवर्गीय गट : हणमंत शंकर माळी (इस्लामपूर).
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी जबाबदारी पाहिली. सहायक उपनिबंधक रंजना बारहाते, बी. डी. मोहिते, सहायक सोमनाथ साळवी यांनी सहकार्य केले. एकूण ६ गटांतून २१ संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अतुल पाटील (पेठ), दीपक पाटील (कुरळप), शैलेश पाटील (इस्लामपूर), अमरसिंह साळुंखे (करंजवडे), बबनराव थोटे (आष्टा), रघुनाथ जाधव (आष्टा), अप्पासो ऊर्फ रमेश हाके (कारंदवाडी), डॉ. योजना पाटील (इस्लामपूर), प्रताप पाटील (तांदूळवाडी), रामराव पाटील (कार्वे), राजकुमार कांबळे (इस्लामपूर), हणमंत माळी (इस्लामपूर) या नव्या व उच्चशिक्षित चेहऱ्यांना संचालक मंडळात संधी देण्यात आली.