राजू शेट्टी (वाढदिवस शुभेच्छा)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि लढवय्या शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा १ जून रोजी वाढदिवस. त्या.निमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आवाज उठवणारे राजू शेट्टी संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशातील समस्त शेतकरी वर्गाला सुपरिचित आहेत. एखादा प्रश्न हाती घेऊन, त्याचा अखेरपर्यंत मागोवा घेण्याची त्यांची हातोटी आहे. त्यांच्या या वृत्तीमुळे ते अल्पावधीत शेतकऱ्यांना भावले. म्हणूनच पहिल्याच प्रयत्नात ते आधी आमदार आणि नंतर खासदार म्हणूनही मोठ्या मतांनी निवडून आले.

शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी आणखी ऊर्जा मिळो, यासाठी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »