आज दास नवमी

आज बुधवार, फेब्रुवारी ११, २०२६ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ २२, शके १९४७
सूर्योदय : ०७:०९ सूर्यास्त : १८:३७
चंद्रोदय : ०३:०३, फेब्रुवारी १२ चंद्रास्त : १३:११
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : माघ
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : नवमी – ०९:५८ पर्यंत
नक्षत्र : अनुराधा – १०:५३ पर्यंत
योग : व्याघात – ०२:३०, फेब्रुवारी १२ पर्यंत
करण : गर – ०९:५८ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – २३:१२ पर्यंत
सूर्य राशि : मकर
चंद्र राशि : वृश्चिक
राहुकाल : १२:५३ ते १४:१९
गुलिक काल : ११:२७ ते १२:५३
यमगण्ड : ०८:३५ ते १०:०१
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:३० ते १३:१६
अमृत काल : ०३:५२, फेब्रुवारी १२ ते ०५:३९, फेब्रुवारी १२
वर्ज्य : १७:०८ ते १८:५५
|| जयजय रघुवीर समर्थ ।।
श्री समर्थ रामदास स्वामीं
राष्ट्रोद्धाराचे आणि धर्मोद्धाराचे ध्येय समर्थांच्या पुढे होते.
ते ध्येय गाठण्यासाठी समर्थांनी आधी स्वत: १२ वर्षे तप:श्चर्या करून रामकृपा संपादन केली.
शारिरीक सामर्थ्य आणि तप:सामर्थ्य मिळविल्यानंतर १२ वर्षे अखंड भारतभ्रमण करून देशस्थिती आणि धर्मस्थिती अवलोकन केली. त्यांच्या लक्षात आले की अनेक शतके पारतंत्र्यात जखडून परकीयांच्या अत्याचाराला बळी पडून भारतीय समाज अत्यंत दीन झाला आहे. त्याच्यात आत्मविश्वास उरलेला नाही. वैदिक धर्म लोप पावून परधर्म लादला जातआहे. शक्ती असून ती संघटीत नसल्यामुळे परकीयांचा अत्याचार चालूच आहे. गुलामगिरीत राहून परकीयांची सेवा करण्यातच शूरांना धन्यता वाटत आहे.
या परिस्थितीला कलाटणी देण्यासाठी समर्थांनी कृष्णातीर हे कार्यक्षेत्र निवडले. जागोजागी मारुती स्थापना करून रामनवमीचे उत्सव सुरु केले. लोकांना प्रथम उपासनेला लावले. शिष्यपरिवार वाढल्यानंतर चाफळ येथे भव्य राममंदिर उभारुन समर्थ संप्रदायाचा पहिला मठ उभारला. आपल्या शिष्यांना युक्ती, बुद्धी, विवेक, विचार तसेच शक्ती यांनी युक्त केले. मनोबोध व दासबोध यांसारखे ग्रंथ रचले आणि आचरण संहिता तयार केली. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही अनेक ठिकाणी मठ स्थापन करून आपल्या अधिकारी शिष्यांना तेथे पाठविले व त्यांच्या मार्फत रामोपासना सर्वत्र रुजवली. लोकांचा आत्मविश्वास बळकट केला.
हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे आणि धर्मरक्षण व्हावे म्हणून
” तुझा तू वाढवी राजा । शीघ्र आम्हाची देखता “
अशी भवानी मातेला प्रार्थना केली व जागोजागी धर्मरक्षणार्थ कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली. समर्थांच्या तेजस्वी वाणीने महाराष्ट्रात नवचैतन्य निर्माण झाले. पारतंत्र्याची चीड येऊन स्वराज्य स्थापनेविषयी जनमानसात उत्कंठा निर्माण झाली.
मनाचे श्लोक, दासबोध व इतर अफाट वाङ्मय निर्माण करून देशभक्ती व ईशभक्तीचा प्रसार केला. शिष्यांना ज्ञान देऊन त्यांच्याकडून निष्काम कर्मयोग आचरवून धर्मस्थापनेचे कार्य करविले. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले आणि या शिवसमर्थ युतीमुळे वैदिक धर्माची पुनर्स्थापना झाली. समर्थांना अपेक्षित असे लोककल्याण महाराष्ट्रात झाले. त्यासाठी समर्थ वयाच्या बाराव्या वर्षापासून अखेरपर्यंत एकही क्षण व्यर्थ न घालवता बहुजन हितार्थ झटले आणि आपल्या मागे लोकांच्या मार्गदर्शनार्थ दासबोधादी अफाट ग्रंथवाङ्मय ठेवले.
आजही समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करून अनेक लोक कृतार्थ होत आहेत.
समर्थांनी पूर्वसूचना देऊन माघ वद्य नवमी शके सोळाशे तीन (सन १६८१) रोजी देह ठेवला. हीच दासनवमी होय.
आज दास नवमी आहे.
रुग्णांच्या अधिकारांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस उपचारादरम्यान रुग्णांना मिळणारी सुरक्षितता, माहितीचा अधिकार, गोपनीयता आणि सन्मानजनक वागणूक यांवर भर देतो. रुग्णांना सक्षम करणे आणि वैद्यकीय सेवेत पारदर्शकता आणणे हे याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
आज जागतिक रुग्णहक्क दिन आहे.
१९७७: भारताचे ५ वे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचे निधन. (जन्म: १३ मे १९०५)
भारतीय चित्रपटसृष्टीच्या गेल्या शतकावर आपल्या आशयसंपन्न छायालेखनाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ छायाचित्रकार त्यागराज पेंढारकर – बाबूराव पेंढारकर, भालजी पेंढारकर, लीलाबाई पेंढारकर, प्रभाकर पेंढारकर, व्ही. शांताराम ही चित्रपटांच्या उभारणीच्या कालखंडात अजरामर झालेली उत्तुंग कर्तृत्वाची माणसे. त्यांचाच वारसा संपन्न करणारे त्यागराज. संधी असूनही ते अभिनयाकडे वळले नाहीत.
उंचापुरा आणि भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा हा कलावंत चित्रपटसृष्टीला निश्चितच काहीतरी भरीव असे देऊन गेला असता; पण त्यांनी पडद्याआड काम करायचे ठरवले. कोल्हापूर सोडले, मुंबईत व्ही. शांताराम यांचा स्टुडिओ गाठला.
छायालेखनाची वेगळी वाट चोखाळणारे त्यागराज यांचे मोठेपण वेगळे ठरते ते त्यांनी केवळ कॅमेरा हातात घेतला यासाठी नव्हे, तर त्या कॅमेऱ्याची भाषा त्यांनी चित्रपटांबद्दल प्रचंड आकर्षण बाळगून असणाऱ्या प्रेक्षकाच्या थेट हृदयापर्यंत पोहोचवली. कॅमेऱ्याचे आणि एकूणच चित्रपटनिर्मितीचे तंत्र बाल्यावस्थेत असताना केवळ आणि केवळ आपल्या दमदार छायालेखनाच्या माध्यमाचा प्रभावी वापर करून त्यांनी सिनेमा जिवंत केला.
कृष्णधवल चित्रपटांच्या निर्मितीचे आव्हान पेललेच; शिवाय नंतरच्या काळात रंगीत चित्रपटांनाही तितक्याच समर्थपणे आपल्या कलेचे कोंदण दिले. साठच्या दशकात गाजलेला आणि आजही रसिकांना मोहिनी घालणारा ‘दो आँखे बारा हाथ’ हा त्यांचा पहिला चित्रपट. एक आव्हान म्हणून त्यांनी तो साकारला आणि या क्षेत्रात दमदार पाऊल टाकले. कथेबरोबरच तो लक्षात राहतो, त्यातील दृश्ये नजरेसमोरून हटत नाहीत ती त्यागराज यांच्या छायालेखनामुळेच.
१९६० मध्ये त्यांनी ‘नवरंग’ही गाजवला. राजकपूर यांचा ‘दिवाना’, जेमिनीचा ‘समाज को बदल डालो’, दादा कोंडके यांचा ‘आंधळा मारतो डोळा’, ‘राजा शिवछत्रपती’ या चित्रपटांनी त्यागराज पेंढारकर हे नाव चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ठळकपणे नोंदविले गेले. अनेक गुजराती, पंजाबी, कोकणी चित्रपटही त्यांनी यशस्वी केले. ते प्रसिद्धीपासून दूर राहिले.
१९२६ : ज्येष्ठ छायाचित्रकार त्यागराज बाबूराव पेंढारकर ज्येष्ठ छायाचित्रकार यांचा जन्म ( मृत्यू : २८ सप्टेंबर २०१८ )
बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज – तरूणपणीच जमनालाल यांना लोकमान्य टिळक, पंडित मदनमोहन मालवीय, रवींद्रनाथ टागोर इ. थोर व्यक्तींचा सहवास लाभला. लोकमान्यांचा केसरी ते लहानपणापासून वाचीत.
१९१५ मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून परत आल्यावर बजाज त्यांना भेटले. ते महात्माजींच्या विचारसरणीकडे आकृष्ट झाले. आणि आपणास ‘पाचवा मुलगा’ म्हणून स्वीकारावे, अशी त्यांनी गांधीजींना विनंती केली. (१९२०). बच्छराज यांच्याकडून लाभलेल्या संपत्तीचा त्यांनी अपरिग्रह वृत्तीने केवळ एक विश्वस्त म्हणून सांभाळ केला.
१९०८ मध्ये जमनालाल मानसेवी दंडाधिकारी झाले. पुढे त्यांना ‘रायबहादूर’ हा किताब मिळाला (१९१८). जमनालाल नागपूर येथील अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष झाले (१९२०). काँग्रेसचे खजिनदार म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. १९२० मध्ये त्यांनी असहकार चळवळीत भाग घेऊन आचार्य विनोबा भावे यांच्या नेतृत्वाखाली वर्धा येथे सत्याग्रह आश्रमाची स्थापना केली आणि काँग्रेसच्या ठरावानुसार रायबहादूर या उपाधीचा त्याग त्याच साली केला.
१९२३ मध्ये त्यांनी नागपूर येथे राष्ट्रध्वज सत्याग्रहाचे नेतृत्व केले. त्याबद्दल त्यांना १८ महिन्यांची शिक्षा झाली. त्याच वर्षी गांधीजीचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांच्या अनुपस्थितीत ‘गांधी सेवकसंघा’ची त्यांनी स्थापना केली. १९२४ मध्ये ते नागपूर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व १९२५ मध्ये चरखा संघाचे खजिनदार होते. त्यांनी समाजसेवेसाठी अनेक संस्था स्थापन केल्या आणि अस्पृश्यतानिवारण, गोवर्धन, शिक्षणसंस्था यांसाठी भरीव आर्थिक मदत केली. अनेक संस्थांचे ते अध्यक्ष व सचिव होते. ‘सस्ता साहित्य मंडळ’ याद्वारे त्यांनी राष्ट्रीय हिंदी साहित्य प्रकाशित केले.
अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते (१९३८). काँग्रेसच्या अस्पृश्यतानिवारण मोहिमेत त्यांनी सचिव या नात्याने पुढाकार घेऊन अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रचार केला. आणि वर्ध्याचे स्वतःच्या मालकीचे लक्ष्मीनारायण मंदिर हरिजनांना खुले केले (१९२८). विलेपार्ले (मुंबई) येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांच्याकडे होते(१९३०). या प्रसंगी त्यांच्या पत्नी जानकीदेवी व मुलगा कमलनयन यांनाही शिक्षा झाल्या.
जमनालाल यांनी वर्ध्याजवळील ‘सेगाव’ हे खेडे व तेथील जमीन गांधीना दिली. तेथे गांधीनी ‘सेवाग्राम आश्रम’ स्थापन केला(१९३६). जयपूरच्या संस्थानी प्रजेस राजकीय हक्क मिळावेत, म्हणून त्यांनी सत्याग्रह केला. त्यात त्यांना पुन्हा १९३९ मध्ये शिक्षा झाली. दुसऱ्या महायुध्दाकाळात युध्दविरोधी प्रचारांमुळे त्यांना अटक झाली (१९४१). वर्धा येथे ‘गोसेजा संघा’ची स्थापना त्यांनी केली होती
जमनालाल यांनी स्त्रीशिक्षणास अग्रक्रम देऊन स्त्रियांना समान हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्याकरिता वर्धा येथे त्यांनी मारवाडी शिक्षण मंडळाची स्थापना केली. तसेच गांधींच्या मूलोद्योग शिक्षणावर भर दिला आणि राष्ट्रीयतेची भावना जोपासली व अस्पृश्यतानिवारणाचे महान कार्य अंगीकारले. त्यांनी खिलाफत चळवळीतही भाग घेतला होता. अखेरच्या दिवसांत सेवाग्राम आणि गोसेवासंघ या कार्यास त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते.
गांधीवादी मार्गाने स्वराज्य मिळेल, यावर त्यांची दृढ श्रध्दा होती. म्हणूनच त्यांनी खादी, ग्रामोद्योग व गोसेवा यांचा पुरस्कार केला.
आधुनिक भारताच्या औद्योगिक क्षेत्रातही जमनालाल बजाज यांनी स्पृहणीय कामगिरी केली. त्यांनी १९२६ साली बजाज उद्योगसमूहाचा सुसंघटित पाया घातला आणि त्या उद्योगसमूहातर्फे पहिला साखर कारखाना सुरू केला(१९३१) तथापि एक विश्वस्त म्हणूनच ते बजाज उद्योगसमूहाचे काम पाहत असत.
• १९४२: प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)
- घटना :
६६०: सम्राट जिम्मु यांनी जपानचे राष्ट्र निर्माण केले.
१६६०: औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.
१७५२: पेनसिल्व्हानिया हॉस्पिटल या अमेरिकेतील पहिल्या हॉस्पिटलचे बेंजामिन फ्रँकलिनच्या हस्ते उद्घाटन झाले.
१८१८: इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.
१८२६: लंडन विद्यापीठाची स्थापना.
१८३०: मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.
१९११: हेन्र्री पिके याने हंटर जातीच्या विमानातून भारतातील पहिली एअर मेल अलाहाबादवरुन नैनी या १० किलोमीटर अंतरावरील गावाला वाहून नेली.
१९२९: पोप पायस (११ वा) आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झलेल्या लॅटेरान ट्रिटी या विशेष करारानुसार व्हॅटिकन सिटी हे शहर राष्ट्र इटालीतुन वेगळे करण्यात आले.
१९७९: पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
१९९०: २७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका.
२०११: १८ दिवसांच्या जनआंदोलनानंतर होस्नी मुबारक यांना इजिप्तची सत्ता सोडणे भाग पडले.
• मृत्यू :
• १९६८: तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते पण्डित दीनदयाळ उपाध्याय यांची अज्ञात मारेकर्याकडुन हत्या. (जन्म: २५ सप्टेंबर १९१६)
• १९९३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी सईद अमीर हैदर कमाल नक्वी ऊर्फ कमाल अमरोही यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९१८)
- जन्म :
१९४२: कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री गौरी देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च२००३)






