‘अंबाजोगाई साखर’च्या चेअरमनपदी रमेश आडसकर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बीड : अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी रमेश आडसकर आणि  व्हाइस चेअरमनपदी दत्ता पाटील यांची शनिवारच्या विशेष बैठकीत बिनविरोध निवड झाली.

बीड, लातूर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. कारखाना सध्या आर्थिक अडचणीत असून निवडणूकीचा खर्च परवडणारा नव्हता, यामुळे रमेश आडसकर यांनी कट्टर विरोधक दत्ता पाटील यांना सोबत घेऊन संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध काढली.

चेअरमन आणि  व्हाइस चेअरमन पदाच्या निवडीसाठी शनिवारी सकाळी कारखाना स्थळावर विशेष बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी सर्वानुमते चेअरमन पदासाठी आडसकर आणि व्हाइस चेअरमन पदासाठी दत्ता पाटील  यांची निवड झाली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »