सचिन घायाळ (वाढदिवस)

पैठण येथील सचिन घायाळ शुगर प्रा. लि. चे चेअरमन श्री. सचिन विक्रमराव घायाळ यांचा २४ ऑक्टोबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. श्री. सचिन घायाळ ऊर्फ सचिन भैय्या हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आहेत. युवा उद्योजक म्हणून ते सुपरिचित आहे. त्यांनी ‘सचिन घायाळ शुगर प्रा. लि.’ ची स्थापना करून २०१४ मध्ये साखर उद्योग क्षेत्रातही पाऊल ठेवले. तेव्हापासून ते संत एकनाथ सहकारी साखर कारखाना यशस्वीपणे चालवत असून, येथेही आपला ठसा उमटवला आहे.
त्यांना पुन्हा खूप खूप शुभेच्छा….