बारामती ॲग्रो, गंगामाई शुगरच्या बरोबरीने उसाला दर देणार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पैठण : श्री संत एकनाथ सचिन घायाळ शुगर पैठण या कारखान्याचा गळीत हंगाम २०२३-२४ चा शुभारंभ, श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तुषार (भाऊ) शिसोदे, जेष्ठ संचालक श्री. विक्रमकाका घायाळ, सचिन घायाळ शुगरचे चेअरमन सीए श्री. सचिन घायाळ यांच्या हस्ते करण्यात आला.

आम्ही सर्व कामे चोखपणे करणार आहोत, आमच्या कारखान्याच्या वजनकाट्यामध्ये तफावत आढळली, तर रोख एक लाखाचे बक्षीस जागेवर देण्यात येईल, अशी घोषणा चेअरमन घायाळ भैय्या यांनी केली.

चेअरमन सचिन घायाळ गळीत शुभारंभ प्रसंगी म्हणाले, ‘कारखाना गळीत हंगाम सुरु करण्यास सज्ज झालेला असुन, १ नोव्हेंबर २०२३ पासून गाळप सुरु होणार आहे. आम्ही कोणत्याही बाबतीत कमी पडणार नाही. बारामती ॲग्रो कन्नड, गंगामाई शुगर घोटण, छत्रपती संभाजी शुगर चित्ते पिंपळगांव, मुक्तेश्वर शुगर धामोरी गंगापुर या कारखान्याचा जो ऊसाचा भाव राहील त्याच बरोबरीने सचिन घायाळ शुगर ऊसाला भाव देणार आहे.’

गळीत हंगाम २०२३-२४ करीता ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा ५०० बैलटायर, १६० मिनी ट्रॅक्टर व ८० वाहनटोळी या यंत्रणेला १२ कोटी रुपयांचा अॅडव्हान्स वाटप केलेला असून, पैठण तालुक्यातील प्रत्येक गावात ऊस तोड यंत्रणा कार्यान्वित राहील. तसेच हार्वेस्टरचे वाहने खाली करण्याकरीता नवीन ६० टनी क्षमतेचे ट्रिपलर बसविण्यात आले आहे. त्यामुळे सचिन घायाळ शुगर कारखान्याचे प्रतिदिन ३००० मे. टन गाळप होणार आहे व गळीत हंगाम २०२३-२४ करीता ३ लाख ५० हजार मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे, असे चेअरमन CA घायाळ यांनी सांगितले.

सचिन घायाळ शुगर पैठण येथे भरुन येणाऱ्या वाहनाने कोठेही बाहेरील प्रमाणित वजनकाट्यावर ऊसाचे वजन करुन आणावे , आमच्या येथे वजनात काही फरक निघाल्यास १ लाख रुपयांचे बक्षीस रोख अदा करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

ज्या शेतकऱ्यांना तर कारखान्यांना आपला ऊस द्यावयाचा असेल त्यांच्यासाठी देखील सचिन घायाळ शुगर पैठण येथील वजन काट्यावर ऊसाचे वजन मोफत करुन देण्यात येईल व त्याची अधिकृत पावतीही (स्लिप) देण्यात येईल. जेणेकरून सचिन घायाळ शुगर वजनकाटा व ईतर कारखाना वजन काटा यातील फरक स्पष्ट दिसून येईल, असे त्यांनी जाहीर करताच, उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

याप्रसंगी श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. अक्षय भाऊ शिसोदे, श्री.
प्रल्हाद तात्या औटे, श्री. दत्तात्रय आम्ले, श्री. डिगृतात्या गोर्डे, श्री. आबासाहेब मोरे, श्री. रमेश पा. क्षिरसागर, श्री. कचरु तात्या बोबडे, राष्ट्रवादीचे नेते श्री. दत्ताभाऊ गोर्डे, अंकुश रंधे, पैठण तालुका कॉंग्रेस अध्यक्ष विनोदभाऊ तांबे, भाऊसाहेब पिसे, आप्पासाहेब गायकवाड, अशोकनाना औटे, अशोकदादा एरंडे, हरिपंडित नवथर, दत्तात्रय वाकडे, योगेश टेकाळे विजुभाऊ बोबडे, किशोर शिरवत, योगेश जोशी, कैलास फासाटे, एकनाथ नवले, राजुमामा बोबडे, राजु मोहिते, राजेंद्र नवथर, शिवनाथ उघडे, माणिक थोरात, अरुण किर्जत, ज्ञानेश्वर नलावडे, पुंजाराम पातकळ, नंदु फासाटे, कादर शेख, राजुभाऊ नवथर, नानासाहेब मते, बद्री पा. गोर्डे, दादासाहेब मुळे, विशाल थोटे, विलास तुपकरी, महेश पवार, गणेश पवार, आरेफ पठाण, भरतआप्पा घायाळ तसेच कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, सर्व अधिकारी व कर्मचारी कामगार तोडणी वाहतुक कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. –

आभार प्रदर्शन मुख्य शेतकी अधिकारी श्री. यशवंत कदम यांनी केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »