‘सहकार शिरोमणी’चा गड कल्याणराव काळे यांनी राखला

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सोलापूर : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी अत्यंत चुरशीच्या वातावरणात अटतटीची निवडणूक झाली. कल्याणराव काळे यांनी कारखान्यावरील सत्ता कायम राखली. प्रारंभिक माहितीनुसर त्यांच्या नेतृत्वाखालील सहकार शिरोमणी वसंतदादा शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार दीड ते दोन हजार मताधिक्क्यांनी विजयी झाले.

विरोधकांनी प्रचंड आमिषे दाखवूनही मतदारांनी आमच्यावर विश्वास व्यक्त केला, त्यामुळे हा विजय सर्व सभासदांचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा आहे, असे प्रतिक्रिया कल्याणराव काळे यांनी व्यक्त केली.

विरोधकांना पैशाची मस्ती आली होती, ती मतदारांनी उतरवली, असेही ते निवडणूक निकालानंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. सभासद मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून, असे आश्वासनही त्यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने कल्याणराव काळे यांना आव्हान दिले होते. पाटील यांनीही ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. मात्र त्यांच्या पदरी निराशा आली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »