तुकाराम महाराज बीज

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज रविवार, मार्च १६, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर फाल्गुन २५ , शके १९४६
सूर्योदय०६:४६ सूर्यास्त१८:४८
चंद्रोदय२०:३३ चंद्रास्त०७:४७
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : फाल्गुन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : द्वितीया – १६:५८ पर्यंत
नक्षत्र : हस्त – ११:४५ पर्यंत
योग : वृद्धि – १४:४९ पर्यंत
करण : गर – १६:५८ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – ०६:१४, मार्च १७ पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : कन्या – ०१:१५, मार्च १७ पर्यंत
राहुकाल : १७:१८ ते १८:४८
गुलिक काल : १५:४८ ते १७:१८
यमगण्ड : १२:४७ ते १४:१७
अभिजितमुहूर्त : १२:२३ ते १३:११
दुर्मुहूर्त : १७:१२ ते १८:००
वर्ज्य : २०:४६ ते २२:३४

! जे का रंजले गांजले ! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा ! देव तेथेची जाणावा !

संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो.
या दिवशी तुकाराम महाराजांचे साधक संतश्रेष्ठाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते.

संत तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले. संत तुकाराम हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत, कवी होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला देहु गावात झाला. पंढरपूरचे विठ्ठूल माऊली हे हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी ‘जगद्गुरु ‘ म्हणून ओळखतात.

आज तुकाराम महाराज बीज आहे.

आज मल्हारराव होळकर यांची जयंती. हा योद्धा त्याच्या कर्तुत्वाने मराठा साम्राज्यातील एक महत्वाचा सरदार बनला. पेशवाई ज्यांनी आपल्या भक्कम हातांवर तोलून धरली त्या होळकर आणि शिंदे घराण्यापैकी होळकर घराण्याची स्थापना करणारा हा मूळ पुरुष. मल्हारराव होळकर हे अटकेपार झेंडा रोवाण्यापासून ते पानिपतच्या निर्णायक लढाई पर्यंत मराठा साम्राज्यासाठी लढत राहिले. एक महत्वाची व्यक्ती म्हणून इतिहास त्यांना कधीही विसरणार नाही.

६ मार्च १६९३ साली मल्हाररावांचा जन्म झाला. त्याचं गाव पुणे नजीकचं ‘होळ’. या गावावरून त्यांना होळकर हे नाव मिळालं. धनगर कुटुंबात जन्मलेले मल्हारराव हे कोणत्याही घराणेशाहीचा आधार न घेता आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठेशाहीचे आधारस्तंभ बनले. तो काळच पराक्रमाचा होता. तुमच्यातलं शौर्य तुमची ओळख बनत असे.

दाभाड्यांचा सरदार कंठाजी कदमबांडे याच्या पेंढारी टोळीत मल्हाररावांनी शिपाई म्हणून काम केलं. याच काळात बाजीराव पेशवे आणि मल्हारराव यांची मैत्री झाली. यानंतर मल्हाररावांनी कधीच मागे वळून बघितलं नाही. त्यांनी शिपाई ते थेट सरदार असा प्रवास केला. त्यांच्या पराक्रमाच्या जोरावर त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळाली.

१७२८ ची निजामाबरोबरची महत्वाची लढाई असो किंवा १७३७ ची दिल्लीची लढाई असो, तसेच १७३८ सालची भोपाळची लढाई असो मल्हाररावांची समशेर कायम तळपत राहिली. त्यांचा दबदबा तयार झाला आणि त्यांना ‘किंग मेकर’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. याच काळात इंदोरची रियासत होळकर घराण्याकडे आली.

मराठा साम्राज्यातील एक सोनेरी पान म्हणजे ‘अटके पार झेंडा’. पाकिस्तानातील अटक पर्यंत भगवा झेंडा जाऊन पोहोचला होता. यात राघोबादादांबरोबर खांद्याला खांदा भिडवून मल्हारराव आघाडीवर होते. अटक काबीज करण्याआधी १७५८ साली सरहिंद आणि लाहौर देखील काबीज करण्यात आलं होतं. या नंतर एक म्हण मराठीत कायमची रुजली, ‘अटके पार झेंडा रोवणे.’

१६ जानेवारी १७६१ साली पानिपतची लढाई झाली. त्या दिवशी खऱ्या अर्थाने संक्रांत कोसळली. या महत्वाच्या लढाईत मल्हारराव पळून गेल्याचा आरोप त्यांच्यावर अनेकांनी केला आहे. पण काही इतिहासकारांच्या मते जेव्हा पानिपत मध्ये पराभव स्पष्ट दिसत होता तेव्हा सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी त्यांच्या पार्वती बाईंना यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याची विनंती मल्हाररावांकडे केली. त्यानुसार ते पार्वती बाईंना घेऊन निघून गेले. यानंतर सदाशिवराव भाऊ यांना मृत्यूने गाठले.

पानिपत नंतर स्वराज्य पुन्हा उभारण्याच्या हेतूने त्यांनी अनेक मोहिमा आखल्या. तो पर्यंत नानासाहेब पेशव्यांचे धाकटे चिरंजीव ‘माधवराव’ पेशवे झाले होते. या मोहिमांच्या धामधुमीतच आलामपूर येथे २० मे, १७६६ रोजी मल्हाररावांनी अखेरचा श्वास घेतला.

स्वराज्य राखण्यात आणि ते वाढवण्यात मल्हाररावांनी आपलं आयुष्य पणाला लावलं. मराठा साम्राज्याच्या कक्षा रुंदावण्यात त्यांचा मोठा हात होता.

१६९३: इंदूर राज्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांचा जन्म. (मृत्यू: २० मे, १७६६)

भारताचे ७ वे सरन्यायाधीश – प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर यांचा जन्म १६ मार्च १९०१ रोजी सातारा , बॉम्बे प्रेसिडेन्सी येथील देशस्थ माधव ब्राह्मण कुटुंबात झाला . ] गजेंद्रगडकरांचे कुटुंब कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील गजेंद्रगड येथून सातारा (आता महाराष्ट्राचा भाग) येथे स्थलांतरित झाले .

गजेंद्रगडकर यांचे वडील बाल – आचार्य ( शिक्षक ) हे संस्कृत विद्वान (विद्वान) होते . बाल -आचार्य यांचे धाकटे पुत्र पी.बी. गजेंद्रगडकर यांनी गजेंद्र-गडकर या कुटुंबाच्या नावाची कीर्ती पसरवली. त्यांनी त्यांचे मोठे भाऊ अश्वत्थामा-आचार्य यांच्या मागे मुंबईला गेले आणि न्याय (कायदा) मध्ये गजेंद्रगडकर परंपरेची मशाल पश्चिमेकडील जगात नेली. त्यांनी १९२४ मध्ये डेक्कन कॉलेज (पुणे) येथून एम.ए. आणि एल.एल.बी. पदवी प्राप्त केली. १९२६ मध्ये आयएलएस लॉ कॉलेजमधून सन्मानाने पदवी मिळवली आणि अपीलीय बाजूने बॉम्बे बारमध्ये सामील झाले.

सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘हिंदू लॉ क्वार्टरली’चे संपादन केले. ‘दत्तक मीमांसा’ या क्लासिकच्या त्यांच्या टीकात्मक आवृत्तीमुळे त्यांना विद्वत्तेसाठी मोठी प्रतिष्ठा मिळाली. ते बॉम्बे बारचे मान्यवर नेते बनले, जे त्यांच्या न्यायवैद्यकीय कौशल्यासाठी आणि कायदेशीर कौशल्यासाठी प्रसिद्ध होते. जवाहरलाल नेहरूंच्या तर्कशुद्धता आणि विद्वत्तावादाने त्यांच्यावर प्रभाव पडला.

१९४५ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. जानेवारी १९५६ मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात बढती देण्यात आली आणि १९६४ मध्ये ते भारताचे मुख्य न्यायाधीश बनले. संवैधानिक आणि औद्योगिक कायद्याच्या विकासातील त्यांचे योगदान महान आणि अद्वितीय मानले जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ४९४ निकाल लिहिले आणि १,३३७ खंडपीठांवर बसले.

भारत सरकारच्या विनंतीवरून त्यांनी केंद्रीय कायदा आयोग, राष्ट्रीय कामगार आयोग आणि बँक पुरस्कार आयोग अशा अनेक आयोगांचे अध्यक्षपद भूषवले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विनंतीवरून त्यांनी दक्षिण भारतातील गांधीग्राम ग्रामीण संस्थेचे मानद पद भूषवले.
त्यांनी सामाजिक सुधारणा परिषदेचे अध्यक्ष म्हणून दोनदा काम केले आणि राष्ट्रीय एकात्मता आणि एकता वाढविण्यासाठी जातिवाद, अस्पृश्यता, अंधश्रद्धा आणि अंधश्रद्धा या दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन करण्यासाठी मोहिमा आयोजित केल्या.

१९६७ मध्ये त्यांची मुंबई विद्यापीठाचे मानद कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९७२ मध्ये, गजेंद्रगडकर यांना भारत सरकारकडून पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

१९०१: भारताचे ७वे सरन्यायाधीश, पद्मविभूषण प्र. बा. गजेंद्रगडकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून , १९८१)

  • घटना :
    १५२१: फर्डिनांड मॅगेलन जगप्रदक्षिणा करीत फिलिपाईन्सला पोहोचला.
    १५२८: फत्तेपूर सिक्री येथे राणा संग आणि बाबर यांच्यात युद्ध होऊन राणा संग यांचा पराभव झाला.
    १६४९: शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा
    मुलगा) यास पत्र लिहीले.
    १८४१ : पहिले मराठी छापील पंचांग १६ मार्च १८४१ रोजी गणपत कृष्णाजी पाटील यांनी शिळाप्रेसवर छापून प्रसिद्ध केले.
    १९११: भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला.
    १९३७: महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा दलितांना हक्क असण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.
    १९४३: प्रभात चा नई कहानी हा चित्रपट रिलीज झाला.
    १९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला.

• मृत्यू :
• १९४५: अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर उर्फ ग. दा. सावरकर यांचे निधन. (जन्म: १३ जून १८७९)

• १९४६: जयपूर अत्रोली घराण्याचे गायक उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे मुंबई येथे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट, १८५५)
• १९९०: संत वाङ्मयाचे अभ्यासक आणि रोहयोचे जनक वि. स. पागे यांचे निधन. (जन्म: २१ जुलै , १९१०)

  • जन्म :
    १९१०: ८वे पतौडी नवाब इफ्तिखार अली खान पतौडी यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी , १९५२)
    १९१९: केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजित गुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी, २००१)
    १९३६: संगीतकार भास्कर चंदावरकर यांचा जन्म. (मृत्यू : २६ जुलै , २००९)
    १९३६: चित्रकार आणि कोरा कॅनव्हास चे लेखक प्रभाकर बर्वे यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर, १९९५ )

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »