जागतिक ग्राहक दिन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शनिवार, मार्च १५, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर फाल्गुन २४ , शके १९४६
सूर्योदय : ०६:४७ सूर्यास्त : १८:४८
चंद्रोदय : १९:४५ चंद्रास्त : ०७:१६
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : फाल्गुन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : प्रतिपदा – १४:३३ पर्यंत
नक्षत्र : उत्तराफाल्गुनी – ०८:५४ पर्यंत
योग : गण्ड – १४:०० पर्यंत
करण : कौलव – १४:३३ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – ०३:४४, मार्च १६ पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : कन्या
राहुकाल : ०९:४७ ते ११:१७
गुलिक काल : ०६:४७ ते ०८:१७
यमगण्ड : १४:१८ ते १५:४८
अभिजित मुहूर्त : १२:२३ ते १३:११
दुर्मुहूर्त : ०६:४७ ते ०७:३५
दुर्मुहूर्त : ०७:३५ ते ०८:२३
अमृत काल : ०५:०२, मार्च १६ ते ०६:५०, मार्च १६
वर्ज्य : १८:१८ ते २०:०५

आज जागतिक ग्राहक दिन आहे.

डॉ. कल्लम अंजी रेड्डी हे एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ, उद्योजक आणि परोपकारी होते.

एक विद्वान आणि देशभक्त दूरदर्शी, त्यांनी परवडणारी औषधे बनवण्यासाठी १९८४ मध्ये डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजची स्थापना केली आणि डॉ. रेड्डीजला फार्मसीमधील संशोधनाचे केंद्र बनवण्यासाठी काम केले.
डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज स्थापन केल्यानंतर सुमारे एक दशकानंतर, भारताच्या आर्थिक विकासाचे फायदे इतरांनाही वाटून घेण्यास आणि त्यांचा लाभ घेण्यास मदत करण्याच्या शक्यतांमुळे त्यांना प्रोत्साहन मिळाले.

त्यांनी १९९६ मध्ये डॉ. रेड्डीज फाउंडेशनची सुरुवात केली, ज्याचा उद्देश तरुण वंचित व्यक्तींना दर्जेदार शिक्षण मिळण्यास आणि आधुनिक काळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी कौशल्ये विकसित करण्यास मदत करणे हा होता.
डॉ. अंजी रेड्डी यांना २००१ मध्ये पद्मश्री आणि नंतर भारतीय औषध उद्योगातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार मिळाला.

• २०१३: डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे स्थापक डॉ. काल्लाम अंजी रेड्डी यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९३९)

पं बच्छराज व्यास – अत्यंत हुशार विद्यार्थी अशी महाविद्यालयात ओळख. BA ऑनर्स , LLB शिक्षण घेऊन नागपुरात वकिली सुरु केली. शक्यतो दोन्ही पक्षांची समजूत घालून आणि आपल्या पक्षकारांचे हित सांभाळून ” समझोता करणारा वकील ” अशी त्यांची ओळख निर्माण झाली.

त्यांच्या कामाचा व्याप फार मोठा होता. तडफ़दारीत ते पहिल्या क्रमांकावर . पैशाची कुणाही अशिलाकडून मागणी करायची नाही, पण पैशाची वाण ( चणचण ) त्यांना कधीच पडली नाही.

१९३५ – ३६ मध्ये त्यांचा डॉ हेडगेवार आणि श्री बाळासाहेब देवरस यांचेशी संपर्क आला. आणि संघमय झाले. संघकामाकरिता आपल्या आवडी निवडी बाजूला ठेवणे आणि आपल्या नियमांचा संघ कार्यात अडथळा नको हा भाव ते ठेवीत. संघाच्या वातावरणातून समरसतेचा विचार व आचार कसा सहज रुजतो व वाढतो याचे उदाहरण म्हणजे पं बच्छराज व्यास.

बौद्धिक वर्गातील आपल्या भाषणातून ” सुविचार हेच सूत्र असावे ” असे ते आग्रहाने सांगत. आपल्या राजकीय जीवनात त्यांनी याच सूत्राने वाटचाल केली व पालन केले. त्यामुळे त्या काळी नागपुरातील सर्वच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यात बच्छराजजी हे समन्वय साधणारे पुढारी म्हणून नावलौकिकास आले.

संघ कार्यात संघ आर्थिक स्थितीत स्वयंपूर्ण असला तरी अनेक महत्वाची कार्ये करणाऱ्या अनेक संघटना संघाकडून कार्यकर्त्यांबरोबर धनाचीही अपेक्षा ठेवत. अशावेळी श्रीगुरुजी ती जबाबदारी बच्छराज व्यास यांचे कडे सोपवत.” गुरुजी बताओ -जान हाजीर हैं ” असे म्हणत बच्छराज व्यास ती जबाबदारी सहजपणे पार पडत. मात्र यात बच्छराज व्यास यांचा कोठेही उल्लेख नसे. ही कार्ये पार पाडण्यासाठी आपल्या वकिलीच्या कामाची जबाबदारी आपल्या सहकाऱ्यांवर सोपवून देशभर प्रवास असे.

” गरिबांचे हितचिंतक असलेले बच्छराजजी धनवंतांचेही मित्र होते. ते त्यांना उचित सल्ला देऊन , त्यांच्या धनाचा सदुपयोग करवून घेण्यात अतिशय निपुण होते.

” गरिबांचे हितचिंतक असलेले बच्छराजजी धनवंतांचेही मित्र होते. ते त्यांना उचित सल्ला देऊन , त्यांच्या धनाचा सदुपयोग करवून घेण्यात अतिशय निपुण होते.

बच्छराजजी गृहस्थाश्रमी असूनहि त्यांना राजस्थानात संघ प्रचारक म्हणून पाठवण्यात आले. राजस्थानात त्याकाळी अनेक संस्थाने असल्यामुळे तेथे संघकार्य कमी होते. ते वाढवण्यासाठी बुध्धीमान, निष्ठावान, मधुरभाषी , व व्यवहारचतुर अशा कार्यकर्त्याचा शोध चालू असताना बच्छराजजी यांचे नाव पुढे आले. ती जबाबदारी त्यांनी आनंदाने स्वीकारून राजस्थानात संघ कार्य वृद्धिंगत केले. त्यासाठी आपला संसार तसेच वकिलीचा व्य्सवसाय सुध्दा बाजूला ठेवला.
प्रचारक म्हणून परत आल्यावर त्यांचेवर अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या.

१९४८ च्या संघबंदीत नागपूरला संघाच्या केंद्र स्थानाची जबाबदारी सांभाळून देशभर मार्गदर्शन केले.
बंदीनंतर श्रीगुरुजींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून संघाची पुनः उभारणी करणे, १९६५ चे जनसंघाचे अ .भा. अध्यक्षपद , पदवीधर मतदार संघातून निवडून येऊन १४ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेत आमदारकीची जबाबदारी, त्यांनी सांभाळली.
बच्छराजजी यांच्या जीवनाचे अनेक पैलू असून ते सारेच तेजस्वी आहेत.

ते एक आदर्श शिवभक्त , उत्तम कवी , पण होते. पण हा बहुगुणी पुरुष प्रथम संघ स्वयंसेवक व नंतर सर्व काही होता.

लोकसेवा हाच जीवन धर्म मानून ते जीवन प्रत्यक्ष जगणारा असा निःस्पृह , निराभिमानी देव दुर्लभ कार्यकर्ता होता.
१९७२ : जनसंघाचे अध्यक्ष पं बच्छराज व्यास यांचे निधन ( जन्म : २४ सप्टेंबर, १९१६ )

*घटना :
१४९३: भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरुन स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरुन परत गेला होता.
१५६४: मुघल सम्राट अकबर याने हिंदूंवरील जिझिया कर रद्द केला.
१६८०: शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह.
१८३१: मुंबई येथे गणपत कृष्णाजी यांनी मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीला सुरु झाले.
१८७७: इंग्लंड व ऑस्ट्रेलियात जगातील पहिला अधिकृत क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.
१८९२: लिव्हरपूल एफ.सी. ची स्थापना झाली.
१९०६: रोल्स रॉईस या अलिशान कार कंपनीची सुरवात झाली.
१९१९: हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्घाटन झाले.
१९३९: दुसरे महायुद्ध – जर्मनीने झेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केले.
१९८५: symbolics.com या इंटरनेट वरील पहिल्या डोमेन नावाची नोंद झाली.
१९९०: सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.
२०११: सीरियन युद्ध सुरु झाले.

• मृत्यू :

• १९९२: हिंदी आणि उर्दू कवी डॉ. राही मासूम रझा यांचे निधन.
• २०००: विचारवंत आणि कलासमीक्षक राणी मुखर्जी यांचे निधन.
• २००२: इंडियन नॅशनल थिएटरचे संस्थापक दामुभाई जव्हेरी यांचे निधन.
• २००३: मुंबईतील कायदेतज्ज्ञ रवींद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन.
• २०१३: डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे स्थापक डॉ. काल्लाम अंजी रेड्डी यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९३९)
• २०१५: भारतीय लेखक नारायण देसाई यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १९२४)

डॉ. ह. वि. सरदेसाई – पुणेकरांचे ‘ फॅमिली डॉक्टर ‘ समजले जाणारे , १९५८ मध्ये एम डी मेडिसिन पदवी घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी लंडनला जाऊन स्त्री रोग व प्रसूती शास्त्र ह्यात सुवर्ण पदक प्राप्त केले. मेंदू, मज्जा संस्था आदींशी निगडित न्यूरॉलॉजि विषयात एम. डी. पदवी घेऊन भारतात परतले. पुण्यात वैद्यकीय व्यवसाय सुरु केल्यानंतर लेखन व व्याख्याने , माध्यमातुन आरोग्य विषयक जागृतता निर्माण केली. हे सर्व करीत असताना मराठी भाषेतून प्रचार केला. तसेच औषधे सुद्धा मराठी भाषेतून, तसेच सर्वांना समजतील अशा सूचना मराठी भाषेतूनच असत. डॉक्टरांनी ३० हुन अधिक आरोग्य विषयक पुस्तके लिहिली. वैद्यकीय क्षेत्रात ऋषितुल्य व्यक्तिमत्व मानले जात होते. पुण्य भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
२०२० : डॉ. ह. वि. सरदेसाई यांचे निधन ( जन्म : १० एप्रिल, १९३३ )

  • जन्म :
    १९०१: पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रशिक्षक विजयपाल लालाराम उर्फ गुरु हनुमान यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १९९९)

• १९३७: रंगभूमीवरील अभिनेते आणि गायक बापूराव पेंढारकर यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर १८९२)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »