मला भुतानं पछाडलं!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

गाडी झाली, बंगला झाला,ऑफिस झाले|
मागं पुढं नोकर चाकर धावायले||
आता पैसा हेच परमेश्वर जाहले|
मला श्रीमंतीच्या भुतानेच पछाडलं||१||

चेअरमन झालो,सरपंचही झालो|
आमदार झालो नामदार पण झालो||
जनतेलाही भेंडी गवार समजलो|
मला आता सत्तेच्या भुताने पछाडलं||२||

कस्पटासमान वाटले सर्व सोबती|
कूचकामी वाटले गणपती हैबती||
हुशारी फक्त तेवढी माझ्याकडे होती|
मला आता गर्वाच्या भुताने पछाडलं||३||

अफु झाली,चरस झाला गांजाही झाले|
देशी विदेशी बाटल्या पालथ्या घातले||
कोकेन  हेराईन  नशेला वापरले ||
मलाआता नशेच्या भुताने पछाडलं||४||

आता नाही कोणी माझ्यासारखा हुशार|
आता मला नाही कोणी पण जोडीदार||
एकटेपणा खातो माझा मगज फार|
एकटेपणाच्या भुतानेच पछाडलं||५||

सत्ता संपत्ती नाही अंतिम साथीदार|
गर्व आणि नशाही उतरे भराभर ||
संतवाणी, सत्यवचनाची साथ कर|
मला आता ईश्वर भक्तीने पछाडलं||६||


कवी: रघुनंदन नाशिक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »