होलिकादहन
आज गुरुवार, मार्च १३, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर फाल्गुन २२ , शके १९४६
सूर्योदय : ०६:४८ सूर्यास्त : १८:४८
चंद्रोदय: १८:०९ चंद्रास्त : ०६:४५, मार्च १४
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : फाल्गुन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : चतुर्दशी – १०:३५ पर्यंत
नक्षत्र : पूर्वाफाल्गुनी – ०६:१९, मार्च १४ पर्यंत
योग : धृति – १३:०३ पर्यंत
करण : वणिज – १०:३५ पर्यंत
द्वितीय करणविष्टि – २३:२६ पर्यंत
सूर्य राशि : कुंभ
चंद्र राशिसिंह
राहुकाल : १४:१८ ते १५:४८
गुलिक काल : ०९:४८ ते ११:१८
यमगण्ड : ०६:४८ ते ०८:१८
अभिजित मुहूर्त : १२:२४ ते १३:१२
दुर्मुहूर्त : १०:४८ ते ११:३६
दुर्मुहूर्त : १५:३६ ते १६:२४
अमृत काल : २३:१९ ते ०१:०४, मार्च १४
वर्ज्य : १२:५० ते १४:३५
भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा होतो. ह्या उत्सवाला “होलिकादहन” किंवा “होळी”, “शिमगा”, “हुताशनी महोत्सव”, “दोलायात्रा”, “कामदहन” अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिग्मो किंवा शिग्मा म्हणतात.
आज होळी आहे.
१३ एप्रिल, १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले.
जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामधे ३७९ लोकांचा मृत्यू झाला. अनाधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा १,००० हून अधिक आहे.
भारतभर या हत्याकांडाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नोबेल पारितोषिक विजेते गुरू रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांना इंग्रजांनी दिलेली ‘सर’ ही पदवी परत केली. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतीकारक सरसावले
शहिद उधम सिंग (जे स्वतः या हत्याकांडामधे जखमी झाले होते) यांनी १३ मार्च १९४० या दिवशी या हत्याकांडाचे उत्तर म्हणून मिशाएल ओ’डायर (जो या हत्याकांडाचा सुत्रधार होता) यांवर बंदुकितून गोळ्या झाडुन वध केला.
१९४०: अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.
बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस – पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. नाना फडणवीस हे नुसतेच शहाणे होते, योद्धे नव्हते यास्तव पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी ते अर्धे शहाणे समजले जात.
नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. त्यांचा जन्म फेब्रुवारी १२, इ.स. १७४२ रोजी सातारा येथे झाला. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या २०व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले.
आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.
अखबारनवीसांची (बातम्या आणणाऱ्यांची) प्रथा मराठ्यांच्या राज्यात अगोदरपासूनच होती. मराठी सत्तेचा हिंदुस्थानभर राज्यविस्तार झाल्यावर अखबारनवीसही प्रांताप्रांतांत ठिकठिकाणी नेमले गेले.. प्रसिद्ध पानिपतच्या युद्धकाळात “बातम्या” वेळेवर न मिळाल्याने मराठ्यांचे फार मोठे नुकसान झाले.
नाना फडणीस यांनी पानिपत प्रत्यक्षात पाहिले होते. बहुदा यातूनच धडा घेऊन मराठेशाहीतील मुत्सद्दी नाना फडणीस यांनी त्यांच्या कारकिर्दीत अखबारनवीस आणि नजरबाज यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविली. या कारणामुळे नानांना हिंदुस्थानातीलच नाही तर परदेशातीलही बातम्या अत्यंत जलद कळत असत.
थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा रुळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचे वर्चस्व टिकवून ठेवले, पुण्याचे वैभव वाढवले. सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. पुढे आजारपणात मार्च १३, इ.स. १८०० रोजी त्यांचा अंत झाला. वाई येथे नाना फडणीसांचा वाडा आजही आहे. पुण्यातही नानावाडा आहे.
१८००: पेशवे दरबारातील एक मंत्री नानासाहेब फडणवीस यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १७४२ – सातारा)
- घटना :
१७८१: विल्यम हर्षेल यांनी युरेनसचा शोध लावला.
१८९७: सॅन डीयेगो विद्यापीठाची स्थापना झाली.
१९१०: पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.
१९३०: क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग यांनी प्लुटो ग्रह शोधल्याचे हार्वर्ड विद्यापीठातील वेधशाळेला कळवले.
१९९९: कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन झाले.
२००३: मुंबई शहरातील लोकल रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले.
• मृत्यू :
• १८९९: दत्तात्रेय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त यांचे निधन. (जन्म: २७ जून १८७५)
• १९६९: गणितशास्रज्ञ रँग्लर मोहिनीराज लक्ष्मण चंद्रात्रेय यांचे निधन.
• १९९४: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व सिटू या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते श्रीपाद यशवंत कोल्हटकर यांचे निधन.
• १९९६: अभिनेते आणि नाट्यनिर्माते शफी इनामदार यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १९४५)
• १९९७: राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू शीला इराणी यांचे निधन.
• २००४: सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९२८)
- जन्म :
१८९६: प्राच्यविद्या संशोधक महामहोपाध्याय डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल१९८५)
१९२६: ललित लेखक रवींद्र पिंगे यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर २००८)