सरदार वल्लभभाई पटेल

आज शुक्रवार, ऑक्टोबर ३१, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक ९, शके १९४७
सूर्योदय :०६:३८ सूर्यास्त : १८:०५
चंद्रोदय : १४:२३ चंद्रास्त : २६:११+
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : शरद्
चंद्र माह : कार्तिक
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : नवमी – १०:०३ पर्यंत
नक्षत्र : धनिष्ठा – १८:५१ पर्यंत
योग : वृद्धि – २८:३२+ पर्यंत
करण : कौलव – १०:०३ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – २१:४३ पर्यंत
सूर्य राशि : तूळ
चंद्र राशि : मकर – ०६:४८ पर्यंत
राहुकाल : १०:५६ ते १२:२२
गुलिक काल : ०८:०४ ते ०९:३०
यमगण्ड : १५:१४ ते १६:४०
अभिजित मुहूर्त : ११:५९ ते १२:४५
दुर्मुहूर्त : ०८:५६ ते ०९:४२
दुर्मुहूर्त : १२:४५ ते १३:३१
अमृत काल : ०८:१९ ते ०९:५६
वर्ज्य : २५:५४+ ते २७:२८+
चांगले जीवनमान मिळविण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेची घडी सुरळीत चालण्यासाठी पैसे वाचवणे महत्वाचे आहे. विश्वास ठेवा अथवा नका ठेऊ, तुमची बचत तुमच्या उठण्या-बसण्याच्या, चालण्याबोलण्याच्या पध्द्तीमध्ये झळकत असते. थोडक्यात, तुमच्या शारीरिक हालचाली आणि आत्मविश्वासामधून तुमची बचत काय असेल याचा अंदाज येतो.
बचतशुन्य माणूस सतत कशाच्यातरी मागे पळताना दिसतो. समोर आलेली नोकरीची पाहिली संधी त्याला मुकाटपणे स्विकारण्याशिवाय पर्याय नसतो. आयुष्याने दिलेल्या सन्मानाच्या शिखरावर देखील तो सावधपणे बसतो. कारण येणारं छोटंसं संकटही त्याला लाचार बनवू शकतं….
हा दिवस ३१ ऑक्टोबर १९२४ रोजी मिलानो, इटली येथील पहिल्या ‘आंतरराष्ट्रीय कॉंग्रेस बचत बँक (बचत बँकांच्या जागतिक सोसायटी)’ दरम्यान स्थापित करण्यात आला. इटालियन प्राध्यापक ‘फिलिपो रॅव्हिझा’ यांनी हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय बचत दिन’ म्हणून जाहीर केला….
आज जागतिक बचत दिन आहे.
आज राष्ट्रीय एकता दिन आहे.
लोह पुरुष : पेशाने वकील असणारे वल्लभभाई पटेल – वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा, बोरसद आणि बारडोली गावाच्या खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते.
१९३४ व १९३७च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.
वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणार्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले.
फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतिस्थापनेकरिताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरूष म्हणून ओळखले जातात. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते.
१८७५: भारतरत्न (मरणोत्तर) स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९५०)
इंदिरा गांधी – ह्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका, १४ प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या घटना होत्या.
१९७७ साली त्यानी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८० पर्यंत त्या सत्तेपासून दूर राहिल्या. १९८० च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी त्यांना अशांत पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या २ सुरक्षारक्षकांकडून त्यांची हत्या झाली.
१९८४: पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या. (जन्म : १९ नोव्हेंबर, १९१७ )
- घटना :
१८७६: भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार.
१८८०: धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) च्या दिवशी पुण्यातील आनंदोद्भव थिएटरमधे किर्लोस्करांच्या संगीत शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९२०: नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
१९८४: भारताचे ६वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.
२०११: जागतिक लोकसंख्या सात अब्जांपर्यंत पोचली.
• मृत्यू :
• १९७५: संगीतकार व गायक सचिन देव बर्मन याचं निधन. (जन्म: १ ऑक्टोबर, १९०६)
• १९८६: लेखिका, बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के याचं निधन. (जन्म: ३ जून, १८९२)
• २००५: पंजाबी लेखिका आणि कवयित्री अमृता प्रीतम याचं निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट, १९१९)
• २००९: मराठी ज्येष्ठ अभिनेत्री सुमती गुप्ते याचं निधन.
- जन्म :
१८९५: क्रिकेटपटू सी. के. नायडू यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर, १९६७)
१९४६: क्रिकेटपटू रामनाथ पारकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट, १९९९)






