सकल जगत मे खालसा पंथ गाजे….

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शुक्रवार, डिसेंबर २६, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष ५, शके १९४७
सूर्योदय : ०७:१० सूर्यास्त : १८:०९
चंद्रोदय : ११:३२ चंद्रास्त : २३:४४
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसूसकल जगतमे खालसा पंथ गाजे….
उत्तरायण
ऋतु : हेमंत
चंद्र माहपौष
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : षष्ठी – १३:४३ पर्यंत
नक्षत्र : शतभिषज – ०९:०० पर्यंत
योग : सिद्धि – १४:०१ पर्यंत
करण : तैतिल – १३:४३ पर्यंत
द्वितीय करण : गर – ०१:३१, डिसेंबर २७ पर्यंत
सूर्य राशि : धनु
चंद्र राशि : कुंभ – ०३:१०, डिसेंबर २७ पर्यंत
राहुकाल : ११:१७ ते १२:३९
गुलिक काल : ०८:३२ ते ०९:५४
यमगण्ड : १५:२४ ते १६:४६
अभिजित मुहूर्त : १२:१७ ते १३:०१
दुर्मुहूर्त : ०९:२१ ते १०:०५
दुर्मुहूर्त : १३:०१ ते १३:४५
अमृत काल : ०१:०६, डिसेंबर २७ ते ०२:४३, डिसेंबर २७
वर्ज्य : १५:२७ ते १७:०३

गुरूंगोविंदसिंहजी यांचे दोन लहान पुत्र…. फतेहसिंग आणि जोरावरसिंग…
वय वर्ष मात्र ६ आणि ८…. नबाब वजीरखान त्यांना सांगतात इस्लाम धर्म स्वीकारा अन्यथा मरणाला तयार रहा…. फतेहसिंह तेव्हढ्याच बाणेदार पणे विचारतात की इस्लाम धर्म स्वीकारला तर मरण येणार नाही का?… आणि मरण येणारच असेल तर आपल्याच धर्मात राहून धर्मासाठी बलिदान करत मरण पत्करू…. काय धीरोदात्त बाणेदारपणा आणि धर्मनिष्ठा या फक्त ६ / ८ वर्षांच्या मुलांमध्ये होती…..!! आणि या सहा वर्षाच्या गुरुपुत्रांना भिंतीत चिणून मारण्यात आले….. त्यावेळचा प्रसंग तर अवर्णनीय…. फतेहसिंह च्या मानेपर्यंत विटा बांधून झाल्या त्यावेळी जोरावरसिंह रडायला लागले…. कारण काय तर तू माझ्यापेक्षा लहान आणि या जगात नंतर आलास आणि माझ्या आधीच चाललास म्हणून…… ६/ ८ वर्षाच्या मुलांची धैर्य आणि बलिदानाची ही उंची!!!!….. ही घटना दि २६ डिसेंबर ची.

फतेहसिंग आणि जोरावरसिंग यांचे अतुलनीय बलिदान झाले त्याच्या दुसऱ्याच दिवशी माता गुजरीजी यांनीही आपले प्राण त्यागले….
अन्य पुत्र अजितसिंह आणि जुझारसिंह यांचे ही याच काळात बलिदान झाले. गुरुजींना बादशहाने खोटी आश्वासने देऊन त्यांना किल्ल्यातून बाहेर यायला लावले आणि त्यांच्यावर भ्याडपणे हल्ला केला….. त्यातच त्यांचेही बलिदान झाले….

देश, धर्म, समाज यांच्यासाठी गुरूंच्या सर्व परिवाराने बलिदान दिले…. त्यांच्या या बलिदानामुळेच आजही आपला धर्म आणि देश आणि आपण अजूनही टिकून आहोत…. दुर्दैव की हा जाज्वल्य, पराक्रमी आणि स्फूर्तिदायी इतिहास आम्हाला माहितीच नाही……

सकल जगतमे खालसा पंथ गाजे….
जगे धर्म हिंदू सकल भंड भाजे….

गुरूंनी आणि सर्व परिवाराने याचसाठी बलिदान दिले!!!
मुलांसाठी आदर्श याहून काही वेगळा असू शकतो का??…. स्वतःलाच प्रश्न विचारा आणि स्वतःलाच उत्तर द्या….. आणि हा आदर्श बालांपुढे ठेवला की आमची सेक्युलरवादाची झापडं आड यायला लागतात आणि आम्हाला यात अजेंडा दिसायला लागतो….

खरं म्हणजे केवळ २६ डिसेंबर चे हे बलिदानच नव्हे तर दि. २१ ते २७ डिसेंबर या कालावधीत गुरूंच्या सर्व परिवाराने धर्मासाठी बलिदान केले आहे.

हिंदू धर्म आणि राष्ट्र रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या गुरूंच्या सर्व परिवारास मानाचा मुजरा !!!

आज…. २६ डिसेंबर रोजी वीर बाल दिवस म्हणून पळूयात आणि बाल आणि तरुण पिढीच नव्हे तर आपणही या बाल वीरांच्या बलिदानाच्या इतिहासाचा अभ्यास करूयात, त्या वीरांना मानवंदना देऊयात…. आणि त्यांची धर्म आणि राष्ट्र निष्ठा स्वतः मध्ये रुजविण्याचा प्रयत्न करूयात…

• १९९९: भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९१८)

वनयोगी बालासाहब देशपाण्डे : स्वातंत्र्योत्तर काळात जशपूर (सध्या झारखंड राज्याचा भाग) या तत्कालीन मध्य प्रदेश आणि बरार प्रांतातील गावात या संघटनेची स्थापना झाली. अशा प्रकारची संघटना स्थापन करणे आवश्यक का वाटले, त्याची पार्श्वभूमी : स्वातंत्र्यानंतर म्हणजे १९५२ सालची एक घटना. तत्कालीन मध्य प्रदेश प्रांताचे मुख्यमंत्री पंडीत रविशंकर शुक्ल यांनी या भागास भेट दिली. अन्य ठिकाणी त्यांचे चांगले स्वागत झाले असले तरी जशपूरनगर येथे मात्र त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. हा प्रामुख्याने आदिवासी लोकसंख्येचा प्रदेश होता आणि ख्रिश्चन मिशनरी या सर्व प्रकारामागे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावर तोडगा काढण्यासाठी आदिवासी भागात काम करणाऱ्या ठक्कर बाप्पा यांच्याकडे सल्ला मागितला. त्यांनी या भागात भारतीय लोकांची संस्था असावी, असे सांगितले. त्यानुसार ‘पिछडा वर्ग समाज कल्याण विभाग’ १९४८ साली स्थापन करण्यात आला.

ठक्कर बाप्प्पा यांनी आपले विश्वासू सहकारी पांडुरंग गोविंद वणीकर यांना या कामाची जबाबदारी दिली.
जशपूर येथे काम सुरू करणे हे अवघड आहे, याची वणीकर यांना जाणीव होती. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि नागपूर येथील रामटेक या ठिकाणी वकिली व्यवसाय करणाऱ्या रमाकांत केशव देशपांडे यांना जशपूर येथील कामाची जबाबदारी दिली. त्यानुसार देशपांडे जशपूर येथे आले आणि प्रवासाला सुरुवात केली. शासनाने सुरुवातीला आठ शाळा, जनजागृती आणि अन्य कार्य यासाठी आवश्यक असे अंदाजपत्रक संमत केले होते, मात्र देशपांडे यांनी अत्यंत आग्रहाने तब्बल १०० शाळांसाठी तरतूद करून घेतली. अवघ्या वर्षभरात त्यांनी १०० शाळांचे आपले उद्दिष्ट पूर्ण करून दाखवले. याचा दृश्य परिणामही लगेच समोर यायला लागला. ज्या भागातील लोक भारताला आपला देशच मानत नव्हते त्या भागात आता ‘भारत माता की जय’ या घोषणा ऐकू यायला लागल्या. आदिवासी समाजास पुन्हा राष्ट्रीय प्रवाहात आणण्याची सुरुवात देशपांडे यांनी यशस्वीपणे केली होती.

जानेवारी १९५१ मध्ये ठक्कर बाप्पा यांचे निधन झाले. दरम्यानच्या काळात कामाची व्याप्तीही मोठ्या प्रमाणात वाढली होती. शासकीय चौकटीत राहून काम करणे अवघड बनत चालले होते. त्यामुळे आता स्वतंत्र अशी संस्था बनवण्याचे विचार देशपांडे यांच्या मनात होतेच. दरम्यान एका महत्वाच्या घटनेचा उल्लेख करणे आवश्यक आहे.

संविधान लागू झाल्यानंतर १९५२ साली निवडणुकांची घोषणा झाली. प्रदेशातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना कदाचित देशपांडे यांची अडचण वाटली असावी, त्यामुळे देशपांडे यांची चौकशी करण्याच्या नावाखाली त्यांना चंद्रपूर येथे स्थानबद्ध केले आणि निवडणुकीपासून दूर ठेवले. निवडणुकीनंतर देशपांडे यांनी आपल्या सरकारी पदाचा राजीनामा दिला आणि जशपूर येथे वकिली व्यवसायाला प्रारंभ केला.
जशपूर येथे पुन्हा येण्यापूर्वी देशपांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी (माधव सदाशिव गोळवलकर) यांच्याची विचारविनिमय केला. त्यांनीही एक स्वतंत्र संस्था स्थापन करण्याविषयी सांगितले आणि देशपांडे यांच्या मदतीसाठी संघाचे प्रचारक मोरेश्वर केतकर यांना पाठवले.

सुरूवातीला वसतीगृहाची स्थापना करून कामाला सुरूवात करण्याचे ठरले त्यानुसार जशपुर येथील राजा विजयभुषण सिंह जुदेव यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी आपल्या वापरात नसलेल्या राजमहालाच्या काही खोल्या लगेचच वापरायला दिल्या आणि २६ डिसेंबर १९५२ रोजी वसतीगृहाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर १९५३ साली राजा जुदेव यांनी संस्थेचे औपचारिक नाव असावे असे सुचवले आणि त्यांच्या सांगण्यानुसार ‘कल्याण आश्रम’ हे नाव निश्चित झाले. अशा प्रकारे १९५२ सालात या संस्थेची स्थापना झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या सांगण्यावरून १९७७ साली ‘कल्याण आश्रम’ या संस्थेस अखिल भारतीय स्वरूप देण्याचे ठरले आणि ‘अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम’ या नावाने संस्थेची नोंदणी करण्यात आली.
या सर्व प्रवासात जशपूरचे राजा विजयभूषण सिंह जुदेव यांनी सर्वांत मोठे सहकार्य केले. संस्था स्थापनेची प्रेरणा, आर्थिक मदत, जागेची मदत अशा सर्व अडचणी त्यांनी सोडवल्या. या संस्थेच्या वाटचालीमध्ये यांचा वाटा फार मोठा आहे.

वनवासी कल्याण आश्रमाचे प्रमुख काम म्हणजे आदिवासी समाजास मुख्य प्रवाहात आणणे. समाजाचा सर्वांगीण विकास साधतानाच त्यांच्या ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांना जपणे. त्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांच्यातूनच नेतृत्व उभे राहील हे पाहणे. एकूणच आदिवासी समाज आणि अन्य समाज यातील दरी बुजवण्याचे काम वनवासी कल्याण आश्रम मुख्यतः करत आहे.
वनवासी कल्याण आश्रमाची वाटचाल प्रेरणादायक असली तरी वनवासी क्षेत्रात अद्यापही समस्यांचा डोंगर उभा आहे. पूर्वीची आव्हाने तर आहेतच, पण त्यात काळानुरूप नव्याने भर पडत आहे. या साऱ्या समस्यांचा सामना करून वनवासी समाजाला अधिक शक्तिशाली बनवण्याचे कार्य आपण सर्वाना मिळून पूर्ण करायचे आहे. आतापर्यंतची वाटचाल हजारो हातांच्या बळावर शक्य झाली पण या क्षेत्रातील समस्या पाहता आता लाखो हातांची आवश्यकता भासणार आहे. या कार्यात आपण तन-मन-धनाने सहभागी व्हावे असे वनवासी कल्याण आश्रमाचे आवाहन आहे.

१९१३ : वनवासी कल्याण आश्रमाचे संस्थापक वनयोगी बाळासाहेब देशपांडे यांचा जन्म दिवस ( मृत्यू : २१ एप्रिल, १९९५ )

  • घटना :
    १८९५: लुईस आणि ऑगस्ट लुइम यांनी तिकीट विक्री करून पहिल्या चित्रपटाचा पहिला शो पॅरिस येथे प्रदर्शित केला.
    १८९८: मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.
    १९७५: मॅक २ पेक्षा जोरात उडणारे जगातील पहिले व्यावसायिक सुपरसॉनिक टु – १४४ विमानसेवा सुरू झाली.
    १९७६: कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.
    १९८२: टाइम (TIME) मासिकातर्फे दिला जाणारा मॅन ऑफ द इयर पुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC) या एका अमानवी वस्तूस देण्यात आला.
    १९९१: सोव्हिएत युनियन औपचारिकरित्या बरखास्त करण्यात आले.
    १९९७: विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार.
    २००४: ९.३ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड त्सूनामी लाट निर्माण होऊन भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलँड, मलेशिया, मालदीव आणि इतर अनेक देशात सुमारे २,३०,००० लोक मृत्युमुखी पडले.

• मृत्यू :

• १९८९: व्यंगचित्रकार व लेखक केशवा तथा के. शंकर पिल्ले यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९०२ – कायमकुलम, केरळ)
• १९७७ : गायक व अभिनेते पंडित राव नगरकर यांचे निधन (जन्म : २६ डिसेंबर १९१०)
• २०००: नाटककार आणि साहित्यिक प्रा. शंकर गोविंद साठे यांचे निधन.
• २००६: अभिनेते कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९२१)
• २०११: कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री सरेकोपा बंगारप्पा यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९३३)

  • जन्म :

  • १९१४: कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी २००८)
    १९१४: स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री डॉ. सुशीला नायर यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी २०००)
    १९१७: साहित्यिक डॉ. प्रभाकर माचवे यांचा जन्म.
    १९२५: शास्त्रीय गायक, संगीतकार व शिक्षक पं. कृष्णा गुंडोपंत तथा के. जी. गिंडे यांचा जन्म. (मृत्यू: १३ जुलै १९९४)
    १९३५: रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुउद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका डॉ. मेबल आरोळे यांचा जन्म. (मृत्यू: २७ डिसेंबर १९९९)
    १९४१: रंगभूमीवरील कलाकार लालन सारंग यांचा जन्म.
    १९४८: जंगली अनाथ प्राण्यांचा आधार पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. प्रकाश आमटे यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »