शशी कपूर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज मंगळवार, मार्च १८, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर फाल्गुन २८, , शके १९४६
सूर्योदय : ०६:४४ सूर्यास्त : १८:४९
चंद्रोदय : २२:१३ चंद्रास्त : ०८:५३
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : फाल्गुन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : चतुर्थी – २२:०९ पर्यंत
नक्षत्र : स्वाती – १७:५२ पर्यंत
योग : व्याघात – १६:४४ पर्यंत
करण : बव – ०८:५१ पर्यंत
द्वितीय करण : बालव – २२:०९ पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : तूळ
राहुकाल : १५:४८ ते १७:१८
गुलिक काल : १२:४७ ते १४:१७
यमगण्ड : ०९:४५ ते ११:१६
अभिजितमुहूर्त : १२:२२ ते १३:११
दुर्मुहूर्त : ०९:०९ ते ०९:५७
दुर्मुहूर्त : २३:३५ ते ००:२२, मार्च १९
अमृत काल : ०७:५६ ते ०९:४४
वर्ज्य : ००:०९, मार्च १९ ते ०१:५७, मार्च १९

  • ‘मेरे पास मां हैं’ – “शशी कपूर* – हे हिंदी चित्रपटसृष्टीतले एक अभिनेते आणि दिग्दर्शक होते. त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि मोठे बंधू राज कपूर यांच्यामुळे त्यांच्या घरात पहिल्यापासून सिनेमा होताच.

शशी कपूर यांचे यांचे खरे नाव बलबीरराज कपूर होते. त्यांचे शिक्षण मुंबईत डॉन बॉस्को शाळेत झाले. त्यांनी १९४० पासून बालकलाकार म्हणून चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. १९४०मध्ये शशीराज, १९४१मध्ये मीना आणि १९४५मध्ये बचपन या चित्रपटांत त्यांनी काम केले. त्यांतील महत्त्वाचे चित्रपट म्हणजे १९४८मध्ये आलेला आग आणि १९५१मध्ये आलेला आवारा. १९४० ते १९५४ या काळात त्यांनी १९ चित्रपटांत बालकालाकार म्हणून काम केल्यानंतर १९६१मध्ये आलेल्या धर्मपुत्र या चित्रपटात त्यांना नायकाची भूमिका मिळाली. त्यांनी आयुष्यभरात सुमारे ११६ सिनेमांमध्ये काम केले, त्यांपैकी तब्बल ६१ सिनेमांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या.

बिग बी अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या जोडीला तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. ‘दीवार’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘नमक हलाल’, ‘सुहाग’, आणि ‘त्रिशूल’ हे त्यांचे चित्रपट सुपरहीट झाले. दीवार चित्रपटातील ‘मेरे पास मां हैं’ हा त्यांचा संवाद आजही लोकांच्या ओठांवर आहे.

‘धर्मपुत्र’नंतर शशी कपूर यांचे ‘चारदीवारी’ आणि ‘प्रेमपत्र’ यांसारखे चित्रपट मात्र अपयशी ठरले होते. त्यानंतर त्यांचे ‘मेहंदी लगी मेरे हाथ’, ‘मोहब्बत इसको कहते हैं, ‘नींद हमारी ख्वाब तुम्हारे’, ‘जुआरी’, ‘कन्यादान’, ‘हसीना मान जाएगी’ असे चित्रपट आले. मात्र तेही यशस्वी होऊ शकले नाहीत.
‘जब जब फूल खिले’ या चित्रपटाद्वारे मात्र शशी कपूर यांच्या यशाचा प्रवास सुरू झाला. हा चित्रपट गोल्डन जुबली झाला.

शशी कपूर यांनी हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटिश आणि अमेरिकी चित्रपटांमधून देखील काम केले. यात ‘द हाउसहोल्डर’, ‘शेक्सपियरवाला’, ‘बॉम्बे टॉकीज’, आणि ‘हिट ऐंड डस्ट’ या चित्रपटांचा समावेश आहे.

२०११मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. २०१५मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याआधी त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि बंधू राज कपूर यांनाही हा सन्मान मिळाला होता. चित्रपट सृष्टीतील हा महत्त्वाचा सन्मान मिळवणारे कपूर परिवारातील ते तिसरे सदस्य ठरले होते.

१९३८: अभिनेता बलबीरराज पृथ्वीराज कपूर तथा शशी कपूर यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर २०१७)

  • घटना :

१८५०: हेन्री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी अमेरिकन एक्सप्रेस ची स्थापना केली.
१९२२: महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास,
१९४४: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या शान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला.
१९६५: अवकाशयात्री अलेक्सए लेओनोव १२ मिनिटे अंतराळात चालणारे पहिले व्यक्ती ठरली.

• मृत्यू :

२००१: चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचे निधन. ( जन्म : १८ एप्रिल, १९१० )

  • जन्म :
    १५९४: शहाजी राजे भोसले यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी , १६६४)
    १८६७: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट महादेव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्म. त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल ब्रिटिश सरकारने धुरंधरांना रावबहादूर हा किताब दिला. (मृत्यू: १ जून, १९४४)
    १८८१: स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तान चे संपादक वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून , १९५६)
    १९०१: शब्दकोशकार, अनेक शैक्षणिक संस्थांचे संस्थापक कृष्णाजी भास्कर तथा तात्यासाहेब वीरकर यांचा जन्म.
    १९०५: लेखिका मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे, २००१)
    १९२१: भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे यांचा जन्म. (मृत्यू: १ एप्रिल , २०१२)
    १९४८: अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून, २००५)
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »