शेखर गायकवाड: वाढदिवस

सेवानिवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि नेहमी लोकाभिमुख प्रशासन राबवणारे श्री. शेखर गायकवाड यांचा 13 मे रोजी वाढदिवस. त्यांना खूप खूप शुभेच्छा.
पुणे पालिका आयुक्त म्हणून त्यांनी ऐन कडक लॉकडाऊनच्या काळात उत्तम काम केले. ते राज्याचे साखर आयुक्त या पदावरून निवृत्त झाले. त्यांची कारकीर्द सुवर्ण अक्षरांत नोंद घ्यावी अशी झाली. FRP साठी त्यांनी खूप चांगले निर्णय घेतले. साखर करखानदारीला ते चांगली शिस्त लावू शकले .
प्रशासकीय सेवेत असतानाही त्यांनी लेखनाचा छंद जोपासला आहे. त्यांनी आजवर 29 पुस्तके लिहिली आहेत. त्यातील प्रमुख पुस्तके शेतकऱ्यांच्या खूपच उपयोगाची आहेत.
श्री. गायकवाड यांनी शेतकरी वर्गाला त्यांच्या हक्काबद्दल जागृत करण्यासाठी विपुल लिखाण केले आहे. त्यांची ‘शेतीचे कायदे’, “जमीन व्यवहार नीती” सारखी अनेक पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत. माहितीपर पुस्तकांखेरीज त्यांनी साहित्यिक लिखाणदेखील केले आहे.
शुगरटुडे परिवाराकडून त्यांना पुन्हा खूप खूप शुभेच्छा.