शेखर गायकवाड -वाढदिवस

“यशदा”चे अतिरिक्त महासंचालक , निवृत्त साखर आयुक्त , ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि नेहमी लोकाभिमुख प्रशासन राबवून , आपल्या कामाचे वेगळे मॉडेल निर्माण करणारे श्री. शेखर गायकवाड यांचा 13 मे रोजी वाढदिवस.
प्रशासकीय सेवेत असतानाही त्यांनी लेखनाचा छंद जोपासला. त्यांनी आजवर ३२ पुस्तके लिहिली आहेत. त्यातील प्रमुख पुस्तके शेतकऱ्यांच्या खूपच उपयोगाची आहेत.
महाराष्ट्रात विविध ठिकाणी त्यांनी सेवा बजावताना आपला खास ठसा उमटवला. सांगलीचे जिल्हाधिकारी असताना नदी पुनरुज्जीवनाचे अशक्य काम त्यांनी करून दाखवले.
त्यांना खूप खूप शुभेच्छा.
श्री. गायकवाड यांनी शेतकरी वर्गाला त्यांच्या हक्काबद्दल जागृत करण्यासाठी विपुल लिखाण केले आहे. त्यांची “जमीन व्यवहार नीती” सारखी अनेक पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत. माहितीपर पुस्तकांखेरीज त्यांनी साहित्यिक लिखाणदेखील केले आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा रू. एक लाखाचा साहित्य पुरस्कारही अलीकडेच मिळाला.
अशा या बहुआयामी, अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला शुगरटुडे परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा.