साखर उद्योगाचा महाग्रंथ ‘इक्षुदंड ते इथेनॉल’

आवडल्यास ही बातमी शेअर करा

शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे : ‘इक्षुदंड ते इथेनॉल -साखर उद्योगाची भरारी’ या साखर उद्योग धंद्यावरील महाग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ नेते खासदार श्री. शरद पवार यांच्या हस्ते वसंतदादा साखर संशोधन संस्था (व्हीएसआय, मांजरी) येथे शुक्रवारी झाले.

हे पुस्तक माजी साखर आयुक्त, भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी शेखर गायकवाड आणि सहसंचालक (साखर) मंगेश तिटकारे यांनी लिहिले आहे .

या कार्यक्रमाला सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील, माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, राजेश टोपे, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, वसंतदादा साखर संशोधन संस्थेचे महासंचालक संभाजी कडू पाटील आणि सन्माननीय सदस्य उपस्थित होते..

खरेतर हे पुस्तक नसून महाग्रंथच आहे. साखरेची उत्पत्ती आणि इतिहास, जागतिक साखर उद्योग, भारतीय साखर उद्योग, महाराष्ट्रातील सहकारी चळवळ, ऊस व साखरेचे उपपदार्थ आदी विषयांची सविस्तर मांडणी पुस्तकात करण्यात आली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »