गायकवाड यांची कार्यशैली शेतकरीभिमुख : अनुपकुमार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सेवागौरव कार्यक्रमात अपर मुख्य सचिवांचे उद्‌गार

पुणे – साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेत शेतकरीभिमुख कारभाराचा आदर्श नमुना सर्वांसमोर उभा केला, असे गौरवौद्गार राज्याचे सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी काढले.

आयुक्तालयाच्या कामकाजाचा चेहरा-मोहरा बदलून ऊसाची एफआरपीची रक्कम वेळेवर देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेत शेतकरीभिमुख कामकाज केले. त्यामुळे मंत्रालय स्तरापर्यंत ऊस आणि साखरेबाबतच्या कोणत्याच अडचणी जाणवल्या नाहीत, याची दक्षता त्यांनी घेतली, असेही अनुप कुमार म्हणाले.

साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि साखर संचालक (प्रशासन) उत्तम इंदलकर हे ३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने साखर संकुल येथे ३१ रोजीच दोघांना कर्मचाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी अनुपकुमार होते. या वेळी गायकवाड व इंदलकर यांचा सपत्निक सत्कार अनुप कुमार यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून सहकार आयुक्त अनिल कवडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

shekhar gaikwad

या वेळी साखर उद्योगातील सुधारणा व लिगल फ्रेमवर्क ऑफ शुगरइंडस्ट्री या दोन पुस्तकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेखर गायकवाड यांनी साखर आयुक्तालयातील कारकिर्दीत घेतलेले नवीन निर्णय, त्यांची अंमलबजावणी, एफआरपी आदींचा आढावा घेतला. इंदलकर यांनीही मनोगत व्यक्त करताना सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »