शेखर गायकवाड यांच्या पुस्तकाचे शुक्रवारी प्रकाशन

पुणे : राज्याचे माजी साखर आयुक्त आणि निवृत्त आयएएस अधिकारी शेखर गायकवाड आणि साखर सहसंचालक मंगेश तिटकारे यांनी लिहिलेल्या ‘इक्षुदंड ते इथेनॉल’ या पुस्तकाचे प्रकाशन १५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता साखर संकुल येथे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
ऊस आणि साखर उद्योगाचा पाच हजार वर्षांपासूनचा इतिहास शब्दबद्ध करणारे हे पुस्तक आहे. साखरेची उत्पत्ती आणि इतिहास, जागतिक साखर उद्योग, भारतीय साखर उद्योग, महाराष्ट्रातील सहकारी चळवळ, ऊस व साखरेचे उपपदार्थ आदी विषयांची सविस्तर मांडणी पुस्तकात करण्यात आली आहे.
इक्षूदंड ते इथेनॉल हे पुस्तक हवं आहे कसे मिळू शकेल
मो 7776860709
Apla patta kalawlyas postage kharch kiti lagel yacha andaj kadhta yeil