दुचाकी अपघातात बारामती ॲग्रोच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : बारामती ॲग्रो युनिट 1 चे सेन्ट्रीफ्युगल फिटर शेखर पवार यांचे सोमवारी अपघाती निधन झाले. ते अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आईवडील आहेत. दिवंगत शेखर त्यांचा एकुलता एक मुलगा होता. कमावत्या पुत्राचे अचानक निधन झाल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोळसला आहे.

शेखर व त्यांचे मित्र ऋषीकेश बंडगर ( अविवाहित ) हे काल 8/4 शिफ्ट करून घरी जात असताना रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांची मोटारसायकल अंदाजे 10 ते 12 फूट खोल ओढ्यात पडली. त्यात शेखर व ऋषीकेश दोघेही जखमी झाले. ऋषीकेशला कमी आघात झाला होता, त्याने ओढ्याच्या वर येऊन इतर लोकांना आवाज देऊन शेखरला वर काढण्यासाठी प्रयत्न केले.

दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र शेखर पवार यांना गंभीर दुखापत झाल्याने, त्यांची प्राणज्योत मालवली. ऋषीकेश बंडगरवर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »